घरातल्या विजयाबाई - सायली राजाध्यक्ष
श्रीमती विजयाबाई राजाध्यक्ष यांचा आज ८२वा वाढदिवस. त्यानिमित्त सायली राजाध्यक्ष यांनी लिहिलेला हा अतिशय हृद्य लेख मायबोलीवर पुनर्प्रकाशित करत आहोत.
विजयाबाईंना वाढदिवसानिमित्त मायबोली.कॉमचा मानाचा मुजरा!
लेख
श्रीमती विजयाबाई राजाध्यक्ष यांचा आज ८२वा वाढदिवस. त्यानिमित्त सायली राजाध्यक्ष यांनी लिहिलेला हा अतिशय हृद्य लेख मायबोलीवर पुनर्प्रकाशित करत आहोत.
विजयाबाईंना वाढदिवसानिमित्त मायबोली.कॉमचा मानाचा मुजरा!
माझ्याबरोबर आयुष्यभर सतत प्रवास करणारं, वेदना आणि आकर्षण निर्माण करणारं शरीर. माझं आणि माझ्यासोबत येणाऱ्या अनेकांचं. तीळ, लव, जन्मखुणा, हजारो लाखो रंध्रं, पोकळ्या. नितळ आणि केसाळ. उंच, सपाट, थुलथुलीत, बलदंड आणि पुष्ट. शरीरावरची वळणं, शरीरावरचे उंचसखल, मऊ आणि विस्तीर्ण प्रदेश. गुहा. त्यातून सातत्याने वाहणारे अनेकधर्मी स्राव. प्रत्येक शरीराचे आपापले गंध. अगदी स्वतःचे असे. एकाच शरीरातले त्वचेचे असंख्य पोत. कानाच्या पाळीच्या मऊ आरक्त त्वचेपासून टाचांवरचे खरबरीत पोत आणि नखं त्वचेला मिळतात तिथले गाडीसारखे फुगीर पोत. माझ्या शरीराची आणि माझी नीट ओळखही नाही.
महाराष्ट्रातल्या नाट्यचळवळीला एक वेगळी दिशा देण्यात ज्या संस्थांचा महत्त्वाचा वाटा आहे, त्यांत पुण्याच्या ’आसक्त’ या संस्थेचं नाव अग्रभागी घ्यावं लागेल. 'तू', 'गार्बो', 'मात्र रात्र', 'काश्मीर काश्मीर', ’गजब कहानी’, ’उणे पुरे शहर एक’, ’चारशे कोटी विसरभोळे’, ’बेड के नीचे रहनेवाली’, ’F1/105’, ’तिची सतरा प्रकरणे’ अशी अत्यंत दर्जेदार नाटकं आजवर ’आसक्त’नं सादर केली आहेत. देशभरातल्या नामवंत रंगमहोत्सवांमध्ये ही नाटकं वाखाणली गेली आहेत. ’आसक्त’च्या नाटकांमुळे उत्तम प्रेक्षक तयार होण्यास मोठी मदत झाली आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही.
'गीतरामायण' या महाराष्ट्रवाल्मिकी ग.दि.माडगूळकर आणि ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके या द्वयीने अजरामर केलेल्या कलाकृतीचं हे हीरक-महोत्सवी वर्ष! गेली साठ वर्षं महाराष्ट्रात, भारतात आणि परदेशातही 'गीतरामायण' रसिकांच्या हृदयसिंहासनावर अधिराज्य गाजवत आहे. गीतरामायणातून प्रेरणा घेऊन श्री. श्रीराम रानडे यांनी 'रामचरितगुणगान' ही स्वतंत्र गीतरचना केली.
गदिमा, बाबूजी यांच्या प्रतिभेला आणि गीतरामायणाला अभिवादन करण्याचा त्यांचा प्रयत्न, त्यांच्या गीतलेखनाचा हा प्रवास, त्यांच्याच लेखणीतून...
२००९ ते २०१३ अशी चार वर्षं सिंगापुरात राहताना मी आणि नवर्याने मिळून सिंगापुरातली खाण्याची बरीच इंटरेस्टिंग ठिकाणं शोधून काढली होती. आम्हां दोघांमध्ये तो चिकन, पोर्क, बीफपासून बेडूक, सॅगो वर्म्सपर्यंत सर्व काही खाणारा आणि मी अंडंही न खाणारी शाकाहारी! त्यामुळे आम्हां दोघांना सिंगापुरातले 'रॉकी-मयूर' (संदर्भ : हायवे ऑन माय प्लेट) म्हणायला हरकत नाही. सिंगापुरात ठिकठिकाणी दिसणार्या फूडकोर्टांबद्दलची रंजक माहितीही नॅशनल लायब्ररीत पुस्तकं चाळताना हाती लागली होती.
डिसेंबर .. म्हणजे वर्षाचा शेवट! निरोप!! गुड-बाय!!! असं म्हणताना खूप वाईट वाटतं पण नाही त्याचबरोबर डिसेंबर म्हणजे लखलखता-झगमगता नाताळ, नवीन वर्षाचे धुमधडाक्याने होणारे आगमन, नाच गाणी आणि पार्ट्या, थोडे जुने.. थोडे नवीन संकल्प, नवीन स्वप्न रंगवायला.. पाहिलेल्या स्वप्नांना खरे रुप द्यायला मिळालेले आणखी एक करकरीत वर्ष!
मायबोलिवरील समस्त सभासदांना आणि ह्या चराचर सृष्टीतील प्रत्येक जिवाला २०१५ च्या अनेक अनेक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला गोड जावो!
दिडेक वर्षांपूर्वी ’केसरी’चे जुने, स्वातंत्र्यपूर्व काळातले अंक चाळत होतो. काही तत्कालीन संदर्भ शोधण्यासाठी. त्या पिवळ्याजीर्ण कागदांमध्ये ओळखीच्या आणि अनोळखी अशा अनेक व्यक्ती आणि घटना नेहमीच भेटतात. शिवाय प्रत्येक पानावर भरपूर जाहिराती असतात. या जाहिराती वाचणंही मौजेचं. आयुर्वेदिय चूर्णं, मोटारगाड्या, पातळंपंचे, वजन वाढवण्याची औषधं आणि लंडनच्या सफरी असं कायकाय त्या जाहिरातींमध्ये असतं. त्या दिवशीही मी सावकाश एकेक पान वाचत बसलो होतो. एका जाहिरातीनं माझं लक्ष वेधून घेतलं. कॅडबरीच्या बोर्न-व्हिटाची ती जाहिरात होती. १९३७ सालच्या ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध झालेली.
फार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात विवेकवादाचा जागर करणार्या आगरकरांनी लिहून ठेवलं होतं - 'मानसिक धैर्य म्हणजे काय? तर स्वतंत्रतेने विचार करून जे आपणास तथ्य वाटेल ते बिनदिक्कत बोलून दाखविणे आणि त्या बोलण्याप्रमाणे आचरण करणे. खरा शूर आहे तो जसा शत्रूंच्या संख्येची पर्वा न करता त्यांच्यावर बेलाशक तुटून पडतो व धारातीर्थी पतन पावण्याचा उत्साह बाळगतो, त्याप्रमाणेच मानसिक धैर्य त्याच्या ठायी पुरे वास करीत आहे तो पुरुष प्रतिपक्षांच्या आक्षेपास किंवा निंदकाच्या निर्भर्त्सनेस खुशाल एकीकडे गुंडाळून ठेवतो आणि आपल्या मताचे नि:शंकपणे प्रतिपादन करून त्याप्रमाणे आचरणही करण्यास चुकत नाही.
आमच्याकडे विदर्भात खास करुन अकोल्यात आणि आजूबाजूच्या गावात कुणाच्या भेटीला एखादी स्त्रि गेली असेल आणि ती जर जवळची असेल तर तिला ब्लाऊज पीस देतात. आमच्याघरी जेंव्हा कपाट नव्हते तेंव्हा आई वेगवेगळ्या रंगाचे ब्लाऊज पीस एखाद्या कापडी पिशवीत नाहीतर पेटीत बोचकून ठेवून द्यायची. बर्याचदा तेच ब्लाऊज पीस आई इतर कुणाला द्यायची. दुकानदाराकडे जर तुम्ही डझनानी ब्लाऊज पीस विकत घ्यावयास गेलात तर ते आधी विचारत कुणाला द्यायला वगैरे असेल तर दुसरे पीस दाखवतो. ही दुसरी पीसे म्हणजे कमी किमतीची, सुती, आणि ६०-६५ सेंटीमीटरची असत.
आज आमच्या कंपनीतर्फे आम्ही २०/२५ स्वयंसेवकांनी एका NGO ला भेट दिली. वृक्षारोपण, सौरदिव्यांचं रोपण, तिथल्या मुलींसाठी घेतल्या गेलेल्या मेहंदीवर्ग, सौंदर्य प्रसाधन, संगणक वर्ग, इ. वर्गांमध्ये सहभाग घेतला. कंपनीने त्यांच्या सध्या चालू असलेल्या/ नजीकच्या काळात सुरू होऊ घातलेल्या नियोजित प्रकल्पांकरताच्या खर्चाचा काही वाटा उचलला.