श्रद्धा यांचे रंगीबेरंगी पान

सिंगापुरातली फूडकोर्टं आणि तिथली खाद्यसंस्कृती

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

२००९ ते २०१३ अशी चार वर्षं सिंगापुरात राहताना मी आणि नवर्‍याने मिळून सिंगापुरातली खाण्याची बरीच इंटरेस्टिंग ठिकाणं शोधून काढली होती. आम्हां दोघांमध्ये तो चिकन, पोर्क, बीफपासून बेडूक, सॅगो वर्म्सपर्यंत सर्व काही खाणारा आणि मी अंडंही न खाणारी शाकाहारी! त्यामुळे आम्हां दोघांना सिंगापुरातले 'रॉकी-मयूर' (संदर्भ : हायवे ऑन माय प्लेट) म्हणायला हरकत नाही. Proud सिंगापुरात ठिकठिकाणी दिसणार्‍या फूडकोर्टांबद्दलची रंजक माहितीही नॅशनल लायब्ररीत पुस्तकं चाळताना हाती लागली होती.

प्रकार: 

मी, अन्या आणि लग्न वगैरे... - संपूर्ण

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

ही कथा जुन्या मायबोलीतलीच आहे. बर्‍याच काळाने धूळ झटकून, जरा ठाकठीक करून नवीन मायबोलीवर आणत आहे.
**************************

तो घरात ज्या पद्धतीने आला ते पाहूनच मला जाणवलं स्वारी अस्वस्थ आहे आज. पायातले फ्लोटर्स त्याने भर्रकन काढून कोपर्‍यात भिरकावले. डोक्यावरची कॅप काढून टीपॉयवर फेकली आणि खिडकीजवळच्या दिवाणावर धप्पकन येऊन बसत त्याने फर्मावलं, "देवू, पाणी आण गार." आणि लगेच माझ्याकडे चमकून पाहात "ओह, तू ऑलरेडी पाणी घेऊनच आलीयेस की!" म्हणून पाण्याची बाटली हिसकावून घेत घटाघटा पाणी प्यायला.

"कुठे उनाडक्या करून येतोयस?" मी त्याच्याशेजारी बसत म्हणाले.

प्रकार: 

'मायनी' माई मुंडेरपे तेरी बोल रहा है कागा..

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

फार फार फार्फारचफार पूर्वी एक मायन आटपाट नगर होतं. तिथे एक मायन राजा होता. त्याला एक राणी (मायना[१]) व मायनी[२] नावाची मुलगी होती. मायनी जन्माला येण्याअगोदर कालगणना अस्तित्वात नव्हती. पण मायनी जन्माला आल्यावर तिचा सोळावा वाढदिवस (तेव्हाही सोळाव्या वरसाला फारचफार महत्त्व होते!) नक्की कधी करायचा, असा गहन प्रश्न पडल्याने राजाने लगेचच कॅलेंडर तयार करण्याचा निर्णय घेतला.[३] या प्रोजेक्टसाठी आधी स्थानिक लोकांकडून अर्ज मागवण्यात आले पण ते सगळे क्यांडिडेट इंटरव्ह्यूत फेल गेले. मग शेजारच्या राज्यातून एम१(मायन१) व्हिशावर (कमी पैशात) एकास घेण्यात आले.

विषय: 
प्रकार: 

'नातिसरामि' - स्वेतलाना आर. भाट

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

जी वाचायला मिळावी म्हणून १८ वर्षांखाली वय असलेल्यांनादेखील आपण सज्ञान असल्याचे अ‍ॅफिडेविट करायची इच्छा प्रबळ व्हावी, अशी एखादीच कादंबरी अचानक आढळते. तीही अनेक दशकांतून एखाददाच! प्रसिद्ध होण्याआधीच लाखभर प्रतींची आगाऊ नोंदणी झालेली 'नातिसरामि' ही अशीच कादंबरी आहे. ती अफाट आहे. 'सर' आणि त्यांच्या सात वादळी प्रकरणांची ही कथा. या सातही प्रकरणांत सर स्वतःला पूर्णपणे झोकून देतात, पण काही काळानंतर तितक्याच अलिप्तपणे ते त्यातून बाहेरही पडतात. हे प्रकरणातून बाहेर पडणं शेवटच्या प्रकरणाच्या बाबतीत अतिशय अफलातून पद्धतीने मांडलं आहे. सातवं प्रकरण आणि त्या प्रकरणाचा शेवट, ही कल्पनाच केवळ लाजवाब आहे.

विषय: 
प्रकार: 

आर्त आळवणी, विनवणी, वगैरे

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

अवतरली हितगुजावर
तव कवितांची त्सुनामी
आवरी रे जरा त्यांना
विनविते पुन्हा पुन्हा मी

लिहिसी तत्काळ कविता,
सेकंद मोकळे मिळता
सर्वत्र त्याच दिसाव्या
केला काय गुन्हा मी...

कविता खूप अप्रतिम(!!!!),
पण काव्यडोस अति झाला...

विषय: 
प्रकार: 
Subscribe to RSS - श्रद्धा यांचे रंगीबेरंगी पान