आर्त आळवणी, विनवणी, वगैरे
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
9
अवतरली हितगुजावर
तव कवितांची त्सुनामी
आवरी रे जरा त्यांना
विनविते पुन्हा पुन्हा मी
लिहिसी तत्काळ कविता,
सेकंद मोकळे मिळता
सर्वत्र त्याच दिसाव्या
केला काय गुन्हा मी...
कविता खूप अप्रतिम(!!!!),
पण काव्यडोस अति झाला...
तो कमी करावा म्हणून शरण
धरुनी दाती तृणा मी...
आता कवितांचा हा
महापूर सोसवेना..
ही व्यथा रे तुजविण
सांगू तरी कुणा मी?
विषय:
प्रकार:
शेअर करा
०००००००१,
०००००००१, श्र, पुणे.
कवितेचं नाव 'त्सुनामी' हवं होतं असं वाटलं. तुमची आळवणी, विनवणी अगदी र्हुदयाला भिडली.
पण कविता म्हणलं की तिचा गाभा गूढ गर्भ हवा. त्याशिवाय कवितेला वजन येत नाही.
~~~~~~~~~

~~~~~~~~~
हीहीही!!!
हीहीही!!! व्यथा पोचली बरं !!!
श्रद्धा..
श्रद्धा..
नवरात्रीच्या मुहूर्तावर साक्षात मातेनेच मातेला साकडं घातलं वाटतं.
मीनू, त्सुनामी नावाची आणखी एक कविता आहेच इथं. त्यामूळे हे नाव दिले असेल.
अन ते ०००००००१ नको. ००७ पाहिजे. मग आपोआप वजन येईल.
म्हणजे माय नेम इज के. श्रद्धा-के. असं जमेल.
--
आठवांच्या पारूंबीला, बांधू एक झुला गं..
माझा झुला तुला घे, तुझा झुला मला!!
(No subject)
नवकवींना
नवकवींना आवरा म्हणून सांगायला सुद्धा एक कविता लिहावी लागली....
श्रद्धा,
श्रद्धा, मस्तच
कळल्या ग
कळल्या ग तुझ्या भावना
पण काय करावे सांग ना
'नको कविता' सांगण्यासही
झाली कविता आधार तुझा
आता
आता कवितांचा हा
महापूर सोसवेना..
तो कमी करावा म्हणून शरण
धरुनी दाती तृणा मी...
ही रचना जास्त योग्य वाटते.
महापुरे झाडे जाती, मागे ऊरती लव्हाळी !
छान आहे.
आर्त
आर्त आळवणी, विनवणी, वगैरे इतके सारे केले
अगदी र्हुदयाला भिडली.
विनविते ओ पुन्हा पुन्हा मी
लिहिसी तत्काळ कविता