कंस अकेला

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

प्रौढ 'सा'क्षरवार्ता: कंस अकेला

अकोला ते अमेरिका (व्हाया मुंबई, पुणे आणि सिंगापूर)एकट्याने प्रवास केलेल्या कंसाची ही अकेली कहाणी. 'विशुद्ध प्रेम म्हणजे नक्की काय?' यावर भांडारकर संस्थेतली पुस्तके चाळू जाता नेमकी हवी ती पुस्तके 'इतर लोकां'नी पळवून नेल्याचे त्याला दिसले. त्यामुळे ही संशोधनाची वाट आपल्याला एकट्यानेच काटायची आहे, हे उमगल्यावर त्याच्या जाणिवेत जो लख्ख प्रकाश पडला, त्याचे परावर्तित रूप म्हणजेच 'कंस अकेला'. या परावर्तनाच्या प्रक्रियेत त्याच्या मनाच्या आरशावर विखुरलेले काही कवडसे नाजूक आहेत तर काही काचेरी.. काही दुष्ट तर काही हळुवार. तेजस्वी सूर्याच्या वितळलेल्या तेजाने न्हायलेल्या पाऊलवाटा आपल्याला या कहाणीत ठायीठायी भेटतात. वाटेवरल्या वळणांवर भेटलेल्या राधा, अवनी, रमा, कालिंदी, विनता, प्रियंवदा यांचंही या कहाणीत मोलाचं योगदान आहे. कंस शेवटी अकेलाच असला तरी ही कहाणी त्याच्या अकेल्याची नसून या सहाजणींचीही आहे. सहाजणी भेटूनही एकीलाही आपल्या आयुष्याचा कायमस्वरुपी भाग बनवू न शकलेला कंस 'अस्ति आणि प्राप्ती' यांची तर वाट सदैव पाहत नव्हता ना, असे विचार आपल्या मनात फेर धरून राहतात. कंस एकटाच राहिला हे त्याचे सुदैव आणि हीच त्याची शोकांतिका असे शांग्रिला विद्यापिठातील सहजीवनशास्त्राचे प्राध्यापक प्रा.झिंग ला हा म्हणतात, त्यात काहीसे तथ्य असावे, असे आपल्याला वाटायला लागते. या रंजक, प्रक्षोभक आणि काही अंशी बेधडक पुस्तकातला हा काही भाग:

समोरच्या काचेतून दिसणारा विस्तीर्ण विमानतळ. इमिग्रेशन वगैरे सोपस्कार आटोपून मी अमेरिकेला जाणार्‍या विमानाची वाट बघत आहे. रात्रीचा दीड वाजलेला. लोक जांभया देत बसले आहेत आजूबाजूला. समोरच्या खुर्च्यांवर एक जोडपे. नवपरिणीत असावे. तिने लाल पंजाबी ड्रेस घातलाय. हातात पंजाब्यांचा टिपिकल लालपांढरा चुडा. तो मधूनच तिला जवळ ओढतो. चिम********. ती लाजते. तिच्याकडे पाहून कालिंदी आठवते. एकदा हातात हिरव्या बांगड्या भरून ती अशीच लाजली होती. तेव्हा माझा वैताग झालेला. 'हे सगळे फालतू आहे कालिंदी. हा चुडा काय, आपले लग्न काय आणि नंतरचे सगळे काय? लग्न हवे कशाला?', मी बोललो होतो फटकन. तिच्या संसाराच्या काचेरी स्वप्नावर मी ओढलेला तो चरचरीत ओरखडा. स्पष्ट दिसणारा, विद्रूप. तिचे काळेभोर डोळे पाण्याने तुडुंब भरून आले असताना, आपण आणखी यात गुंतायला नको म्हणून मी फट्टकन दरवाजा आपटून तिथून निघालो तो कायमचाच. पुढे एका नटाशी लग्न केलेली कालिंदी पेपरातल्या फोटोत जीवघेणी देखणी दिसत होती, तेव्हा हे सौंदर्य आपल्या आसपास ******************** आत्ताआत्तापर्यंत वावरत होते, हे जाणवूनही काही न वाटण्याइतका मी कोडगा झालो होतो. मी कंस... एकटा.. कंस अकेला.

निळ्या मानससरोवरासारखे निळे डोळे असलेली विनता. तिच्या निळ्या डोळ्यांमध्ये मरियाना गर्तेची खोली होती. खेरीज ती व्हायोलिन वाजवत असे. बाहेर निष्पर्ण झाडे हिमवर्षाव झेलीत असता, तिच्या बंगल्यातल्या खोलीत, शेकोटीच्या उबेत तिने छेडलेले ते व्हायोलिनाचे आर्त सूर. शेजारच्या स्वैंपाकघरातून येत असलेला चहाचा मंद दरवळ. समोर टेबलावर ठेवलेले पुष्पपात्र. रिकामेच. माझ्या त्यावेळी असलेल्या मन:स्थितीचे प्रतीकच ते जणू. 'तू जाणार तर...' व्हायोलिन थांबल्याचे मला लक्षात आलेच नाही चटकन. मी मान हलवली तेव्हा तिच्या निळ्या डोळ्यांतून ओघळले खळकन दोन आसवांचे मोती. आणि खोलीभर मग वादळासारखे भरून राहिले ते व्हायोलिनावर छेडलेले 'तू ना जा मेरे बादशाह एक वादे के लिये, एक वादा तोड के..' हे सूर. पण मला अमिताभ किंवा श्रीदेवी कुणीच आवडत नसल्याने माझे जाणे अटळ आहे, हे सत्य वारंवार तिला सांगून मी तिच्या भाळी विरहाची रेषा कायमची रेखून ठेवली. आज माझ्यासोबत आहे ते तिचे शेवटचे वाक्य 'तुला चहा आवडत नाही, हे माझ्या लक्षात राहिलंच नाही रे...' वादळी रात्री झालेल्या आमच्या पहिल्या भेटीच्या वेळी तिने कपात ओतलेले ते तपकिरी इत्यादी रंगाचे पेय... तेव्हा मात्र त्या पेयाकडे लक्ष देण्यापेक्षा मला इतर गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या. मी ******************
*****************************************************
*****************************************************
*****************************************************
*****************************************************

प्रियंवदा. नुस्ते नाव घेत रहावे तिचे. तिच्या नि माझ्या त्या पहिल्या भेटीच्यावेळीही मी एवढा एकच शब्द फक्त उच्चारू शकलो. हजारो गुलाब पाकळ्या पाकळ्या होऊन तुमच्यावर उधळले जावेत, तसे तिचे ते अस्तित्व.
'खिल के बिखर जायेगा ये गुलाब, खुशबू भी बिखर जायेगी...
तेरे चारों तरफ हूं मै ही मै, अब मुझसे दूर कहां जायेगी...'
हा अश्रफ गुलाबाबादी (लखनौ से दो मील) यांचा शेर मी तिला ऐकवला तेव्हा आपले काळेभोर डोळे माझ्या तपकिरी डोळ्यांत गुंतवून ती 'कुठेच नाही' असे अस्फुट स्वरांत म्हटली तेव्हा आकाशगंगेचे काठ दिसेनासे व्हावेत, तशी काहीशी माझी स्थिती झाली होती.
'भोवताली लाख मेणबत्त्या, उजेड दिसेना कोठे
परतीची दिसेना वाट, गहन अरण्य मोठे'
तिच्या आठवणींना केवड्याचा सुगंध, तिच्या सहवासाला चंदनाचा वास आहे. आणि मी मलाच विचारतो पुन्हा, प्रियंवदा हे सत्य की भास आहे?
तिच्या भेटींना*********************************************
****************************************************
****************************************************
****************************************************

(*या चिन्हांचा अर्थ: अ‍ॅडमिनांच्या विपुमध्ये तक्रार जाऊ नये, म्हणून प्रक्षोभक (आणि अश्लील) भाग गाळला आहे. उत्सुकता असणार्‍यांनी पुस्तक विकत घेऊन वाचावे. मला आता * टाईप करण्याचा कंटाळा आला आहे. पानेच्या पाने भरून * आहेत.)
टंकलेखन साहाय्य: कुणीच नाही. इतके प्रक्षोभक पुस्तक हातात धरायलाही कुणी तयार झालेले नाही. मी हातमोजे घालून कष्टाने ही पाने टाईप केली आहेत.

मान्यवरांची पुस्तकाबद्दलची मते:

श्री. प्रमोद पत्रे: इतके प्रक्षोभक पुस्तक गेल्या दहा हजार वर्षांत झाले नाही आणि येत्या दहा हजार वर्षांत होणार नाही.

श्रीमती वनमाला रामदेवराय: कुठल्याही थोड्या भल्या माणसाला देवपण सतत चिकटतंच.. कंस शतकाशतकांतून एखादाच होतो. आपल्यातल्या कंसाला ओळखण्याची वृत्ती असणारा आणि बेधडकपणे लोकांसमोर मांडणारा हा कंस मात्र त्यांतही आगळा. पुस्तक संग्रही ठेवावे असे. (मात्र ज्वलनशील पदार्थांपासून लांब ठेवा.)

श्री. स्लार्टी बार्टफास्ट: जनीनामक एकाच प्रेमपात्राशी बाह्यतः तरी एकनिष्ठ असल्याने मला कंसाचे उघड कौतुक करता येत नसले तरी मनातून मला त्याचा आदरच आहे.

श्री. बंटी फातर्पेकर: कंस रॉऑऑऑऑऑऑऑऑक्स... 'कंस अकेला' ज्याम सह्ह्ह्ह्ही आहे. एका बैठकीत वाचून काढली.

*हे लेखन मी एक 'मैलाचा दगड' असलेली कादंबरी माबोकरांपर्यंत पोचावी या उदात्त भावनेने केले असल्याने त्याच्या अश्लीलतेबद्दल चर्चा होऊ नये. त्यामागचा प्रामाणिक हेतू कृपया बघावा.

विषय: 
प्रकार: 

Lol
माते, अशक्य आहेस! Lol

मत क्र. २ ) Rofl नावापासूनच भन्नाट पंचेस !! खल्लास !!
हे काम करून अनेकांना प्रौढ साक्षर केल्याबद्दल अनेक धन्यवाद. कंस यांचे साक्षरतेविषयी काम ज्ञात होतेच, पण या प्रौढकामाची ओळख करून दिल्याबद्दल श्र यांना धन्यवाद.

    ***
    ही शून्याकार आग, ही जळती मोकळीक रोजचीच आहे
    ही सर्वस्वी सर्कस तुझीच आहे

    Lol Lol
    -----------------------------------------------
    I was born a Hindu. Soon I converted to Narcissism! Happy

    Rofl
    ----------------------------------------
    मै जिंदगी का साथ निभाता चला गया ...

    Lol ह्या कंसाला चांगलीच 'स्टार' व्हॅल्यू आहे म्हणायची!

    कंस अकेला) वाचायलाच हवं ... जाम उत्सुकता वाटतेय तुझा लेख वाचून. हे पुस्तक आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल तुमचे लाखो आभार श्रद्धाके.
    LOL Lol Proud

    Lol Lol
    कंसाच्या 'कंसी' बद्दल पण काही काही गोष्टी कानावर आल्या होत्या, त्याच्या ह्या पुस्तकात अनुल्लेख केलाय वाट्टे Proud

    वा - आधी अभंग आणिक आता अकेला. Lol
    >>कंसाच्या 'कंसी' बद्दल पण काही काही गोष्टी कानावर आल्या होत्या
    तिचे आडनाव कानडा आहे काय?

    स्तरी ही फक्त उपभोगायचीच वस्तु आहे असे सुचवणारे हे पुस्तक आणि अशा पुस्तकाचा उदोउदो करणार्या या लेखाचा निषेध. आमच्या सन्स्क्रुतीत स्तरीला देवी मानले जाते. श्री कन्स जितक्या सहजतेने त्याम्च्या 'गर्लफ्रेन्द्स' बदलतात तितके तर आम्ही चपलाही बदलत नाही. मी श्री कन्स यान्ना 'गाथा पुराणी' आणी 'आपण सारे परजुन' ही पुस्तके सुचवते. गाथा पुराणी वाचले तर स्तरीला किती मान असतो हे लक्षात येइल. आपण सारे वाचुन शब्द हे शस्त्र आहेत, ते कसे योग्य रितिरिवाजाने परजावेत हे समजेल.

    श्री श्र, असले पुस्तक मैलाचा दगड नाही, मैल्याचा दगड मानले पाहिजे. मी श्रीश्र या दोन्हीतला फरक कलावा म्हनुन 'चान्गभलं' आनि 'घंटी कोणाची मारु' ही पुस्तके सुचवते. तसेच सहा सांगुन तिनच जणींबद्दल लिहिले आहे. त्याम्न्चे गणीत कच्चे असल्याने 'इ. पहिली गणित' हे म.रा. पापु याम्चे पुस्तक सुचवते. (त्यान्नी उरलेल्या तीनेबद्दलही लिहावे, म्हनजे गणीत पक्के आहे हे कळेल.)

    विनादाच्या नावाखाली असले अश्लील खपवुन घेणार्या इथल्या लोकांचा सभतेचा बुरखा फादला पाहिजे. सभ्य, सत्शील विनोद आनि असला चवट विनोद यातील फरक कळला पाहिजे. इथे खोखो हसनार्या तथाकथित सभ्य लोकासाठी मी 'उष्टे-खरकटे' हे पुस्तक सुचवते.

    म हा न Rofl

    -------------------------------------------
    रखरखीत हा रस्ता प्रवास करण्याचा,
    शेवट त्याचा मिळेल तोवर बोलू काही...

    श्री. कंस याने एकट्यानी प्रवास केला तर पुस्तक रंजक होते आणि इतर काही लोक एकटीने प्रवास कर्तात त्यान्ना इथे नावे ठेवतात. अकोला-पुणे थेट बस आहे, आमच्या गावावरून जाते. विमानात्सुद्धा बसावे लागत नाही. इतर लेखिकन्ना नावे ठेवताना आधी स्वतः प्रवास करावे.
    आमच्या महिलाम्न्डळात आम्ही हे पुस्तक वाचनार नाही.

    कुलु 'ती' नाहीये 'तो' आहे Lol

    अगदी हल्लाबोलच Proud
    --------------------------------------------
    रखरखीत हा रस्ता प्रवास करण्याचा,
    शेवट त्याचा मिळेल तोवर बोलू काही...

    आमच्या गावातुन औरंगाबाद-कल्याण थेट बस आहे. आमच्या गावाचे नाव श्रीरामपूर आहे.

    सहीच...
    अरे ही मनाली आली इथे. म्हणजे आता कुलू आणि सिमला पण येतील..

    ----------------------
    हलके घ्या, जड घ्या
    दिवे घ्या, अंधार घ्या
    घ्या, घेऊ नका
    तुमचा प्रश्न आहे!

    नी सिमला आलीये की वर Lol

    --------------------------------------------
    रखरखीत हा रस्ता प्रवास करण्याचा,
    शेवट त्याचा मिळेल तोवर बोलू काही...

    Rofl तूफान आहे.

    मिस्/श्रीमती/सौ. मनाली यांचा अभिप्राय तर डोळ्यात अंजन घालणारा. त्यांचेही कौतुक. Lol अजून मिस्/श्रीमती/सौ. कुलु यांच्या प्रतिक्रीया कशा आल्या नाही?) असे म्हणत असताना आल्या सुध्दा.

    सिमलाताई म्हणतात ते अगदी खरे आहे. विशुद्ध प्रेम भांडारकर संस्थेत थोडीच मिळते ? म्हणजे तिथल्य पुस्तकांत मिळत नाही. श्री कन्स यान्नी जे इतक्या अश्लील भाषेत लिहिले आहे तेच एका लेखकाने एका पुस्तकात कित्ती छान मान्डले आहे पहा - पोरगी म्हणजे वार्याची झुळूक. अन्गावरून जाते, अमाप सुख देऊन जाते, पन धरून ठेवता येत नाही. कित्ती सन्यत !
    शिवाय, त्याच लेखकाचे 'दोन गरजाम्ची स्पर्धा म्हणजे आयुश्य. ज्याची गरज अगोदर सम्पते, तो तुम्हाला सोडून जातो.........' हे आयुश्याचं खोल तत्त्वज्ञान श्री कन्स यांच्या मैत्रिनींना कळले नाही. मी मैत्रिनीन्साठी गोविन्दा आनि सलमानखान, कत्रिन कैफ, लारादत्ता याम्चा चित्रपट सुचवते.

    मला हे पुस्तक अधिवेशनात मिळाले नाही. म्हणजे होते तिथे एका स्टॉलवर, एकच कॉपी उरली होती, मी उचलणार होते तर बरोबरच्या पार्लेकरणीने तुच्छ नजरेने माझ्याकडे पाहिले, मग मी खजील होऊन परत ठेवले. Sad नंतर जाऊन हळूच घ्यावे म्हटले तर ते मला म्हणाले की मघाशी तुमच्याबरोबर ज्या बाई होत्या त्या येऊन घेऊन गेल्या! Angry
    मनाली, तुम्ही सांगितलेली पुस्तके कोठे मिळतील?

    ह्म्म वाचायलाच हवे Happy माते किती * आहेत?

    *********************

    My true love hath my heart and I have his,
    By just exchange one for another given:
    I hold his dear, and mine he cannot miss
    There never was a better bargain driven
    My true love hath my heart and I have his.

    Pages