"बजरंगी भाईजान" ने प्रेरीत होऊन त्याचा मराठी रिमेक बनवायचे एका मराठी चित्रपट निर्मात्याने घोषित केले आहे.
चित्रपटाचे नाव "मारुती भाऊ" असे असेल आणि मुंबईत हरवलेल्या पुणेकर मुलीला एक मुंबईकर कशी मदत करतो हे दाखविले जाईल.
पुण्यात मुलीला सोडताना त्याला ज्या अडचणी येतात, जसे की तुसडेपणाने बोलणारे पुणेकर, पत्ता विचारल्यावर तोंड वाकडं करणारे पुणेकर अशा अनेक अडचणी दाखविल्या जातील.
याशिवाय एक विशेष साहस द्रुष्य असेल ज्यात सिग्नल तोडुन नो एन्ट्री मधे घुसणार्या एका पुणेकराच्या दुचाकी पासुन मारुती भाऊ त्या मुक्या मुलीला वाचवतो.
फिल्मी रेकॉर्ड
कुणी तरी बनवुन जातो
बाकीचे मग मोडत बसतात
वेग-वेगळ्या कमाईने
नवा रेकॉर्ड जोडत असतात
कुणी दुसर्याचे तर कुणी
स्वत:चेच तोडत असतात
पण त्यांचे रेकॉर्ड घडवण्यासाठी
प्रेक्षकच धडपडत असतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
श्री. सुनील बर्वे यांचा अभिनयक्षेत्रातला प्रवेश रंगभूमीवरून झाला. 'अफलातून', 'चारचौघी', 'श्री तशी सौ', 'वन रूम किचन', 'मोरूची मावशी', 'लग्नाची बेडी', 'हीच तर प्रेमाची गंमत आहे' अशा अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. अभिनयातील कारकिर्दीला पंचवीस वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं श्री. सुनील बर्वे यांनी आपल्या 'सुबक' या संस्थेद्वारे 'हर्बेरियम' हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला. मराठी रंगभूमी गाजवलेल्या पाच नाटकांचं पुनरुज्जीवन त्यांनी केलं. प्रेक्षकांचा जबरदस्त पाठिंबा या नाटकांना मिळाला.
अनेकदा पुण्यात जावून सुद्धा या महान ऐ तिहासिक आणि सांन्स्कृतिक स्थळाचे दर्शन केले नाही … तरी ते करण्याचा इरादा आहे.
माझे काही मित्र ( जुने मुंबईकर आता पुणेकर ) हे ऐकताच थर थर कपू लागले .
" अरे X%^&(* झालास कि काय ? चाल घरी ये बिअर पिलावतो . असे हि म्हणाले ( ते चहाच नाही तर मद्य देतायत - म्हणजेच हे मुल पुणेकर नाहीत हे कळले आसेल्च.
तरी माझी विनंती खालील गोष्टी / सल्ला / सेवा मिळतील काय?
१) नकाशा - अचूक नकाशा मिळेल काय ? कारण इथे कोणीही पत्ता विचारले कि अपमान करतात !
२) गेंड्याच्या कातडीचा शर्ट - अपमान पचवायला !
....................आजच्या वीस - बावीस वर्षांच्या तरुणांना प्रेम म्हणजे काही भव्यदिव्य वाटत नसतं. या वयात येईपर्यंत, बर्याच होतकरू आणि प्रायोगिक प्रेमप्रकरणांचे ते प्रमुख सल्लागार बनलेले असतात. अशीच एक तरूणी, जी कायम प्रेमात पडत असते, आणि तिचे उठसूट ब्रेकअपही होत असतात, ती या नाटकाची प्रोटॅगोनिस्ट आहे. नाही, हे नाटक तिच्या अफेअर्स विषयी जरी सारखं सारखं भाष्य करून तरुणांना प्रेमाबद्दल डोस पाजत असलं, तरी एक्झॅक्ट्ली त्याबद्दल नाहीये. ती तिच्या सध्याच्या बॉयफ्रेंडबरोबर मिळून एक नाटकातलं नाटक लिहितीये, त्यातल्या चाळीशी पार केलेल्या जोडप्याच्या एक्स्ट्रा मॅरीटल अफेअरबद्दल आहे.
सात ते सतरा वयोगटातली अंदाजे २३० मुलं. त्यांचे वीस गट. प्रत्येक गटाने एकेक नाटिका बसवली. नाटिकांच्या विषयांत, मांडणींत, संवाद-प्रसंगांत अनेकदा बदल झाले. जवळपास चार महिने तयारी चालू होती, तालमी होत होत्या. सगळी लगबग, गडबड सुरू होती...
मराठी माणसांची शान,...
महाराष्ट्राची शान मराठी
महाराष्ट्राची जान मराठी
मराठी माणसांची अस्मिता
महाराष्ट्राची त्राण मराठी
जगभरात माय मराठीचा
गौरवणारा झेंडा आहे
मराठी माणसांची शान
मराठीचा अजेंडा आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
माणूसकीचे मारेकरी
माणसांकडून निष्ठूरतेच्या
हद्दी ओलांडल्या गेल्यात
गतानुगतिकतेच्या भावना
माणसांतुन कोलांडल्या गेल्यात
इथे माणूसकीचे मारेकरी
मना-मनात जागत आहेत
माणसांशी वागताना माणसं
माणसांप्रमाणे ना वागत आहेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३