कबीर. एका संपन्न घरातला, बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा. थोडा मनस्वी. अजून सडाफटिंग. पण नुकताच एका इंटेरियर डिझायनरला प्रपोज 'करून बसलाय'. आपली दोघांची कामे एकमेकांना पुरक आहेत- त्यामुळे आपले जमेल असे तो तिला सांगतोय. तीही खुश. एवढे तिला सांगितले हेच नशीब. कारण हा थोडा अबोल, इंट्रोव्हर्ट. मनातलं सहज दुसर्याला न सांगणारा.
भारतीय समाज एकसाची, एकरंगी कधीच नव्हता. अनेक धर्म आणि त्यांच्या वेगवेगळ्या संस्कृती सातत्याने या समाजात झिरपत राहिल्या. या संस्कृतींचे थर एकमेकांवर रचले गेले आणि त्यातून आजचा समाज घडत गेला. भारतीय संस्कृतींचे हे अनेक स्तर अभ्यासण्याची संधी सहज मिळू शकते ती फक्त हिंदी सिनेमांमधून. हिंदी सिनेमाच्या माध्यमातून भारतातल्या सर्व संस्कृतींमधल्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचं फार महत्वाचं दस्तावेजीकरण झालं आहे. हे वैशिष्ट्य फक्त भारतीय समाजाचे आणि भारतीय सिनेमांचेच.
हिंदी सिनेमांमधलं, अनेक पिढ्या बिदाई, घुंगट आणि पतीपरमेश्वर याच्या आसपासच घोटाळत राहिलेलं लग्न नव्या, तरुण दिग्दर्शकांच्या सिनेमांमधून बर्यापैकी ताजा आणि मोकळा श्वास घ्यायला लागलं. पती-पत्नी नात्यांमधल्या ताण तणावांना न बिचकता, थेट हाताळण्याचं धाडस करण्याचा प्रयत्न यांपैकी अनेकांनी केला. झाडांभोवती फिरत रोमान्स करणारे हिंदी सिनेमांमधले नायक नायिका अशा प्रयत्नांमुळे जरा वैचारिक दृष्ट्या मॅच्युअर्ड वाटायला लागले आणि नशिबाने असे प्रयत्न समजुन घेणार्या मॅच्युअर्ड प्रेक्षकांची साथही त्यांना मिळाली.
"लग्न"-१ इथे.
हिंदी सिनेमांमधल्या लग्नांचा प्रवास सुरु होतो ’ पहली मुलाकात’ पासून. आता ही टिपिकल मुलाकात सुद्धा कशी तर ’तिला’ पाहून ’त्याने’ प्रेमात पडायचे आणि तिने मात्र दुर्लक्ष करायचे. रागवायचे, अगदी तुसड्यासारखे वागायचे. असं केल्याशिवाय छेडछाडीचा स्कोप कसा मिळणार? क्वचित दोघेही एकमेकांना पाहून डायरेक्ट प्रेमातच पडल्याचीही उदाहरणे आहेत.. आंखो ही आंखो में.. असं म्हणत.
पण थोडक्यात काय तर पहली मुलाकात आवश्यकच.
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.
काल स्टॅनले का डब्बा पाहिला. खूप सुंदर सिनेमा आहे.
अवघ्या पावणेदोन तासांचा चित्रपट आहे. ह्या चित्रपटाद्वारे अमोल गुप्तेने समाजातील एका मोठ्या प्रश्नाकडे आपलं लक्ष वेधलं आहे. चित्रपट पडद्यावर उलगडत असताना आपलं मनोरंजन होतच असतं पण आपल्याही नकळत आपण ज्याचा शोध घेत असतो ते वास्तव अचानकपणे चित्रपट संपतासंपता आपल्यासमोर येऊन उभं ठाकतं आणि आपण सुन्न होऊन जातो.
चित्रपटातून मांडलेल्या प्रश्नावर आपण ह्याआधी इतक्या गंभीरपणे विचार केलाही नसेल कदाचित, पण हा चित्रपट त्या सामाजिक प्रश्नाची दखल घ्यायला भाग पाडतो.
पायरेटस ऑफ द कॅराबियन - ऑन स्ट्रेंजर टाईडस चित्रपट विरंगुळा म्हणून बरा वाटला. चित्रपट आवडणे हे रिलेटिव्ह आहे त्यामुळे कोणास चित्रपट आवडला नाही तरी हरकत नाही. काही अ आणि अ गोष्टी आहेत पण त्या झाल्या नाहीतर तो पायरेटस कसा? आम्ही काही ठळक गोष्टी मांडायचा प्रयत्न करू. पण सगळ्या अ आणि अ गोष्टींसाठी चित्रपटास जाणे बरे, कसे? म्हणजे तेवढीच तुमचीही करमणूक!
गद्यातलं हे माझं पहिलं (आणि एकमेव ) लिखाण आहे
आज नॅशनल वर मदर इंडिया बघायचा होता. पण सतत फोन, घरातली कामं यात तो सलग पाहता आलाच नाही. बाहेरून येईपर्यंत सिनेमा संपला होता. असंच सर्फिंग करतांना झी स्टुडिओ या चॅनेलवर एट बिलो हा सिनेमा चालू होता. मी पुढे जाणार इतक्यात बाबांनी मला थांबायची खूण करत हा सगळं काम सोडून हा सिनेमा पहा अशी आज्ञा केली...
सुरूवात चुकली होती. ती बाबांकडून कळाली. अंटार्क्टिकामधे मोहीमेसाठी एक अमेरिकन पथक गेलेलं असतं. स्टेशनपासून लांब बर्फात फिरतांना नायक बर्फाच्या घळईत अडकतो. वर बर्फ जमा होऊन त्याची तिथंच हिमसमाधी बांधली जाण्याचा धोका निर्माण होतो.
कोणी हा चित्रपट बघितला आहे का? सुबोध भावे च्या सकाळ मधील लेखनामुळे खूप उत्सुकता वाढली आहे.