चित्रपट

तू झोप...मी जागा आहे (?)

Submitted by लसावि on 7 November, 2011 - 03:38

'काय एशिझेड काय?' 'नाय आर्केलॉजिचे काम हाय'.
देउळच्या या पहिल्या संवादातच हा सिनेमा कशाबद्दल बोलणार आहे, लेखक-दिग्दर्शकाचा नव्या ग्रामिण अवकाशाचा अभ्यास, त्याची नर्मविनोदी शैली सगळं एकदम समोर येतं. आणि सिनेमा तुमची एकदम पकड घेतो.
वळू आणि विहिरमधून दिसलेले पश्चिम महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपर्‍यातले गाव. कोरडे,उजाड, प्रचंड माळ. इरसाल, बेरकी, भोळी; माणसासारखी खरीखुरी माणसं. वळू आणि विहिरी प्रमाणेच 'देऊळ' कथानकाचा मुख्य मुद्दाही आणि रुपकही. तारशहनाईच्या आसमंत भरुन टाकणार्‍या लकेरीही तशाच.

विषय: 

.

Submitted by हणमंतअण्णा रावळ... on 6 November, 2011 - 01:08

धा गा उ ड व ला आ हे धा गा उ ड व ला आ हे धा गा उ ड व ला आ हे

विषय: 

देऊळ

Submitted by मी मुक्ता.. on 5 November, 2011 - 11:46

"ज्याला देव हवा आहे त्यानं तो आपापला शोधावा.. ज्याला नको आहे त्यानं शोधू नये, हे स्वातंत्र्य सगळ्यांना आहे" हे जितकं खरं आहे तितकंच हे ही खरं आहे की ज्याला कथा हवी असते, त्याला ती कुठेही मिळते, तो ती मांडतो.. ती पाहण्याचं किंवा न पाहण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे.. पण लोकहो, हे स्वातंत्र्य घ्या आणि 'देऊळ' नक्की पहा. मध्यंतरापर्यंत फार्सिकल टोन असलेला सिनेमा, मध्यंतरानंतर बराच गंभीर होतो. सिनेमाचं नाव आणि टॅग लाइन वाचून काही आडाखे बांधले असतील तर ते बर्‍यापैकी खरे निघतात पण खरी गंमत कथेच्या मांडणीत आहे.

विषय: 

"देऊळ" प्रिमियर — "फोटो वृत्तांत"

Submitted by जिप्सी on 4 November, 2011 - 14:51

'देऊळ' आणि मायबोली' नविन लेखनात दिसले आणि मायबोलीने एका दर्जेदार चित्रनिर्मितीमध्ये माध्यम प्रायोजकत्व स्विकारल्याचे वाचुन खरंच खूप अभिमान वाटला. या उपक्रमाचा एक भाग म्हणुन मायबोलीवर विविध स्पर्धा घेण्यात आल्या. अपेक्षेप्रमाणे त्याला मायबोलीकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातच प्रकाशचित्र स्पर्धेची घोषणा झाली. यातील दुसर्‍या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा विजेता म्हणुन माझं नाव घोषित झाले :-).

आत्ताच बघून आलोय....देऊळ

Submitted by संदीप आहेर on 4 November, 2011 - 07:53

सह्याद्रीच्या कुशीत लपलेलं पिवळं सोनं ....... पाणी नसेल तरी बहारदार तोर्‍यात हलणारं ते पिवळ गवत नि ती ऐन दुपारची वेळ ....... उन्हं किती कडक याचं चित्रण एकदम झकास (जी मुलं नेहमी उन्हाळ्याच्या सुट्टीतच गावी जातात ना त्यांना नेहमी ही उन्हं, ते पिवळ गवत नि उजाड डोंगर याचीच सवय होऊन जाते.... नि काहींना ते मनापासून आवडू लागतं........गिरीश कुलकर्णीना ही सवय नि ती आवड असावी... म्हणूनच ही पिवळाई
डोळे थंड करणारी हिरवाई हून अधिकच मनाला भावते)

विषय: 

देऊळ प्रिमियर

Submitted by मंजूडी on 4 November, 2011 - 05:38

"एका दर्जेदार चित्रनिर्मितीमध्ये माध्यम प्रायोजक म्हणून सहभागी होणं, हे 'मायबोली'साठी अतिशय आनंददायक आणि अभिमानास्पद आहे."

३ नोव्हेंबर, २०११ रोजी झालेल्या 'देऊळ' सिनेमाचा प्रिमियर बघताना याची पुरेपूर प्रचिती आली. अतिशय उत्तमरीत्या निर्माण केलेल्या या चित्रपटाच्या प्रिमियर शोला, अर्थात, 'फर्स्ट डे फर्स्ट शो'ला मायबोली.कॉमचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याची अभिनव संधी आम्हाला दिली याबद्दल मायबोली, अ‍ॅडमिन आणि टीम माध्यम_प्रायोजक यांचे अनेक अनेक आभार!

'पाऊलवाट' - घोषणा

Submitted by माध्यम_प्रायोजक on 2 November, 2011 - 02:07

paulwaat-30x40-02.jpg

अनंत देव हा सांगलीहून मुंबईला पार्श्वगायक होण्यासाठी आलेला तरुण. सर्वस्वी एकाकी असणार्‍या गोदूआक्कांकडे अनंता राहायला लागतो, आणि आपल्या स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठी त्याची धडपड सुरू होते. अनंताच्या या प्रवासाची आणि त्याला या प्रवासादरम्यान भेटलेल्या व्यक्तींची हृद्य कथा म्हणजे ’पाऊलवाट’.

ही कथा आहे नात्यांची..ही कथा आहे भोगांची, त्यागाची, अपेक्षांची, स्वप्नांची, स्वप्नभंगांची, जयपराजयाची, वास्तवाची..ही कथा आहे जगण्याची...!

निर्माते - स्टेट ऑफ द आर्ट फिल्म्स

विषय: 

'देऊळ' - प्रकाशचित्र स्पर्धा निकाल

Submitted by माध्यम_प्रायोजक on 1 November, 2011 - 21:48

४ नोव्हेंबर, २०११ रोजी 'देऊळ' हा मराठी चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होतो आहे. मायबोलीने माध्यम प्रायोजकत्व स्वीकारलेला हा पहिलाच चित्रपट. यानिमित्ताने मायबोलीवर प्रकाशचित्र स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या नव्या उपक्रमाला मायबोलीकरांचा नेहमीप्रमाणेच उत्तम प्रतिसाद लाभला. त्याबद्दल सर्व मायबोलीकरांचे आभार!

या स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे -

प्रकाशचित्र स्पर्धा क्रमांक १ -

१. पहिले बक्षीस - गजानन
२. दुसरे बक्षीस - झकासराव
३. तिसरे बक्षीस- अमित मोहरे

प्रकाशचित्र स्पर्धा क्रमांक २ -

१. पहिले बक्षीस - जिप्सी
२. दुसरे बक्षीस - प्रकाश काळेल
३. तिसरे बक्षीस - माधव

विषय: 

'देऊळ'च्या निमित्ताने गिरीश कुलकर्णी यांच्याशी गप्पा

Submitted by माध्यम_प्रायोजक on 1 November, 2011 - 01:44

एक प्रतिभावान पटकथालेखक आणि ताकदीचे अभिनेते म्हणून गिरीश कुलकर्णी प्रसिद्ध आहेत. 'गिरणी', 'वळू', 'गाभ्रीचा पाऊस', 'विहीर' अशा लघुपटांतला-चित्रपटांतला अभिनय असो, किंवा 'वळू', 'विहीर' या चित्रपटांचं लेखन, गिरीश कुलकर्णी यांनी कायमच समीक्षकांना आणि रसिकांना आपल्या कामानं प्रभावित केलं आहे. 'देऊळ' या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद त्यांनीच लिहिले आहेत, शिवाय एक महत्त्वाची व्यक्तिरेखाही त्यांनी साकारली आहे.

'देऊळ'बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी गिरीश कुलकर्णी यांच्याशी केलेली ही बातचीत...

विषय: 

Pages

Subscribe to RSS - चित्रपट