"जन गण मन" या चित्रपटाच्या मुंबई प्रिमिअरला जायचा योग अॅडमिन कृपेने आला आणि मी, देवकाका, शर्मिला फडके, अनिताताई आणि ईंद्रधनुष्य असे ५ मायबोलीकर ईंफिनिटी मॉलला या निमित्ताने भेटलो.
मी, अनिताताई, देवकाका आणि शर्मिलाजी अगदी ६.१५ पासूनच तिथे हजर होतो... मालगुडी डेजमध्ये चहा कॉफी घेऊन अगदी ७.३० पर्यंत वाट पाहिली तरी कार्यक्रम सुरू व्हायचा पत्ताच नाही. नाही म्हणायला काही तुरळक मराठमोळे चेहरे हळूहळू जमत होते. ईंद्रा प्रचंड ट्रॅफिकमध्ये अडकला होता.
तो नववीत आहे. आपणही नववीतच आहोत. त्याचा वर्ग, मुख्याध्यापक अप्पा, बेंद्रीण बाई, परांजपे बाई, मांजरेकर सर, घंटा देणारा शिपाई असं सगळं कंटा़ळवाणं विश्व आहे. आपलंही असणार! सुर्या, फावड्या, चित्र्या हे जानी दोस्त आणि मिसाळ, बिबिकर, सुकडी, आंबेकर असे ठळक नमुने! हे सगळेही आपलेच! त्याची टिपिकल आई, अंबाबाई, पोराला चक्क समजून घेणारे वडील, त्याचा लाडका नरूमामा - हे तर आपलेच सगे! पण.... त्याला वर्गातली एक मुलगी ज्ज्जाम आवडते. ही गोष्ट तो सगळ्यांपासून लपवतो.
Las acasias - Spain - 85 min - 2010
नाटक आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभ्यासू नट म्हणजे नंदू माधव. ’भूमिका जगणं’ म्हणजे काय, हे त्यांनी साकारलेल्या भूमिका बघून कळतं. ’दुसरा सामना’, ’डॉक्टर, तुम्हीसुद्धा?’ अशी नाटकं असोत, किंवा ’हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ’वळू’, ’बनगरवाडी’, ’शूल’ असे चित्रपट असोत, नंदू माधव यांचा अभिनय कायमच वाखाणला गेला आहे. आपली सामाजिक आस्था सदैव सजग ठेवून आजवर त्यांनी अभिनयक्षेत्रातला प्रवास केला आहे.
Times and winds (Bes vakit) - Turkey - 2006 - 111 min
तुमचं कधी असं होतं का? झोपेतनं उठता तरीही झोपेत बघितलेल्या स्वप्नाचा परिणाम जाणवत राहतो. स्वप्नात भेटलेली लोकं, त्यांनी आग्रहाने सांगितलेलं काहितरी, कसलं तरी विचित्र वातावरण, हे लगेच मनावेगळं करून आपण नव्या दिवसाला लगेच सामोरं जाउ शकतोच असे नाही. जागेपणीच्या वातावरणाशी जुळवून घ्यायला थोडा वेळ नक्की लागतो. स्वप्न होतं पण त्यात पाहिलेलं सारं किती खरं होतं नाही का? ह्या संभ्रमित अवस्थेत आपण काही क्षण घालवितो. २०१० साली आलेला इन्सेप्शन हा इंग्रजी सिनेमा ह्या भावनेलाच दिलेले एक पूर्ण रूप आहे. चित्रपट बघितल्यावर काही दिवस तरी तुम्ही निर्धास्तपणे झोपायला जरा बिचकालंच.
'जनगणमन' या आपल्या राष्ट्रगीताची शताब्दी साजरी करण्यासाठी, आणि 'जन गण मन' या चित्रपटाचं स्वागत करण्यासाठी मायबोलीवर आयोजित केलेल्या स्पर्धांमधली ही चौथी परस्परसंबंध ओळखा स्पर्धा!!!
खाली काही चित्रं दिली आहेत. या सर्व चित्रांचा कशाशी संबंध आहे, या चित्रांतून काय लक्षात येते, ते तुम्ही इथे लिहायचं आहे.
समान धागा, म्हणजेच परस्परसंबंध ओळखण्यासाठी तुम्ही कितीही वेळा प्रयत्न करू शकता, कितीही वेळा उत्तर देऊ शकता. यासाठी तुम्ही कुठल्याही माहितीस्रोतांचा वापर करू शकता.
दर वर्षी नवीन वर्षाच्या चाहुलीसोबतच चित्रपटरसिक ज्याची आतुरतेने वाट पाहतात तो पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (पिफ) १२ ते १९ जानेवारीत पार पडला. यात पहायला मिळालेल्या काही चांगल्या सिनेमांविषयी थोडसं....
Here without me (inja bedoone mah) - Iran - 2011 - 100 min
'जनगणमन' या आपल्या राष्ट्रगीताची शताब्दी साजरी करण्यासाठी, आणि 'जन गण मन' या चित्रपटाचं स्वागत करण्यासाठी मायबोलीवर आयोजित केली आहे प्रश्नमंजुषा!!!
खाली पंधरा प्रश्न दिले आहेत. या अगदी सोप्या प्रश्नांची उत्तरं लिहून पाठवा, आणि मिळवा आकर्षक बक्षिसं!!!
१. 'राष्ट्रीय साक्षरता मिशन' हा उपक्रम किती साली सुरू झाला?
२. 'सर्व शिक्षा अभियान' हा उपक्रम कुठल्या वयोगटातल्या मुलांसाठी आहे?
३. २०११च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यात साक्षरतेचं प्रमाण किती?
४. 'राईट टू एज्युकेशन' कायदा भारतीय संसदेने कधी संमत केला?
'जनगणमन' या आपल्या राष्ट्रगीताची शताब्दी साजरी करण्यासाठी, आणि 'जन गण मन' या चित्रपटाचं स्वागत करण्यासाठी मायबोलीवर आयोजित केलेल्या स्पर्धांमधली ही तिसरी परस्परसंबंध ओळखा स्पर्धा!!!
खाली काही चित्रं दिली आहेत. या सर्व चित्रांचा कशाशी संबंध आहे, या चित्रांतून काय लक्षात येते, ते तुम्ही इथे लिहायचं आहे.