परस्परसंबंध ओळखा स्पर्धा - ३

Submitted by माध्यम_प्रायोजक on 15 January, 2012 - 21:38

'जनगणमन' या आपल्या राष्ट्रगीताची शताब्दी साजरी करण्यासाठी, आणि 'जन गण मन' या चित्रपटाचं स्वागत करण्यासाठी मायबोलीवर आयोजित केलेल्या स्पर्धांमधली ही तिसरी परस्परसंबंध ओळखा स्पर्धा!!!

खाली काही चित्रं दिली आहेत. या सर्व चित्रांचा कशाशी संबंध आहे, या चित्रांतून काय लक्षात येते, ते तुम्ही इथे लिहायचं आहे.

Quiz_3c.jpgQuiz_3a.jpgQuiz_3.jpg

समान धागा, म्हणजेच परस्परसंबंध ओळखण्यासाठी तुम्ही कितीही वेळा प्रयत्न करू शकता, कितीही वेळा उत्तर देऊ शकता. यासाठी तुम्ही कुठल्याही माहितीस्रोतांचा वापर करू शकता.

मात्र पूर्ण उत्तरंच स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जातील. सर्व चित्रांचा संबंध उत्तरात असणे आवश्यक आहे.

बाफवर जे उत्तर सर्वप्रथम बरोबर असेल त्याला बक्षीस मिळेल. बरोबर उत्तर जेव्हा येईल तेव्हाच आम्ही तसे जाहीर करू. चूक उत्तराला आमच्याकडून काहीच प्रतिसाद मिळणार नाही. जोपर्यंत आमच्याकडून 'हे बरोबर उत्तर आहे' असे जाहीर केले जात नाही, तोपर्यंत तुम्ही कोडे सोडवण्याचे प्रयत्न चालू ठेवावेत, अशी विनंती.

आलेल्या सर्व उत्तरांमध्ये कुठलेच उत्तर अचूक नसेल, तर अचूक उत्तराच्या सर्वात जवळ जाणारे उत्तर 'बरोबर' म्हणून निवडले जाईल. याबाबत संयोजकांचा निर्णय अंतिम असेल.

उत्तर देताना 'उत्तर कसे काढले' हे सांगणे आवश्यक आहे. Happy

या स्पर्धेच्या विजेत्याला मिळेल पुण्यात २६ जानेवारी, २०१२ रोजी होणार्‍या 'जन गण मन' या चित्रपटाच्या प्रीमियर शोचं एक तिकीट, किंवा मुंडू टिव्हीचं हा चित्रपट एकदा पाहण्यासाठीचं सबस्क्रिप्शन. त्यामुळे तुम्ही भारतात नसलात तरी या स्पर्धेत भाग घेऊ शकता.

तुम्हांला सर्वांना शुभेच्छा. Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुसर्‍या चित्रात चीन आणि टर्कीचे झेंडे आहेत.
तिसर्‍यात ताजमहालासापेक्ष एका ठिकाणाचे स्थान दर्शवले आहे.
त्यातच मोगलशैलीतील चित्र आहे.
मोगलांचा मंगोलिया ते भारत असा प्रवास दर्शवायचा आहे का?
सध्या एवढच. बाकीच्या चित्रांचा/बाबींचा विचार करत आहे.

ताजपासून ३१-२० N वर ,फतेहपुर सिक्रीचा किल्ला किंवा मग जरा लांब जावून दिल्ली. कारण मोगलांच तख्त दाखवलय. तुर्की आणि चीन मधले संबध मध्ये बिघडलेले वाचल होत. त्याचा संदर्भ दाखवत आहे का काही ते झेंड्यांच चित्र?

६ + १ म्हणजे सहा मोगल बादशहा (बाबर, हुमायुन, अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब) आणि एक शेवटचा बहादुरशहा जफर ????

आणि २८६ म्हणजे एकूण मोगल साम्राज्याचा कालावधी?

दुसरं चित्र म्हणजे चीन मध्ये साक्षरतेचं प्रमाण आणि तुर्की मधल्या साक्षरतेच्या प्रमाणाची तुलना केल्यासारखं वाटतंय. त्यांच्यामधलं चित्र म्हणजे 'स्कूल चले हम' राष्ट्रीय शिक्षा किंवा साक्षरता अभियान.

१) is equal to / is not equal to - मॅथ्स
२) चीन टर्कीचा झेंडा - जिओग्राफी
३) मुघल - हिस्ट्री
मध्यभागी 'सर्वशिक्षा अभियान'
उत्तर : विषय

:एक मठ्ठ उत्तर: डोक्याला ताण नंतर देण्यात येईल कारण कामाचा बट्ट्याबोळ होतो Wink

तिसर्‍या फोटोचा मुघल तख्तशी काही संबन्ध नसावा. तो फोटो मुघल आणि गार्डन दाखवतोय. गूगल शोधाशोध केल्यावर ते पिन्जोर हरियाणा इथले मुघल गार्डन आहे अस दिसतय. त्याच फोटोत जे आकडे आहेत ते Lattitude, Longitude दाखवतायत. आणि त्या आकड्यांवरून हे ठिकाण हिमाचल प्रदेश मधले बिलासपूर हे शहर दाखवते. बाकी या दोन ठिकाणांचा एकमेकांशी आणि पुढे जन गण मनशी सम्बन्ध लावणे कठीण दिसतय.

ज्याअर्थी माप्रांनी काही कमेंट केली नाही त्याअर्थी आपण आत्तापर्यंत मारलेले सगळे बाण वाया गेले आहेत. नव्या कोनातून आता कोड्याचा विचार करा बरं. Happy

मामी, सगळे ३६० कोन वापरावे लागतील आणि नंतर माप्रा म्हणतील कोनात कसले बसताय? उत्तर तर मध्यबिंदूतच आहे.

अवघड आहे! Sad
पहिले आकडे मला "७८६" पासून ते ६ + १०२८६ पर्यन्त काहीही वाटताहेत Proud
त्या अक्षान्श रेखान्शावर जाऊन आलो, एचएचला विलासपुर तरी दिसले, मला ओसाड माळरान दिस्ले गुगल म्यापवरुन.
बर तो बाण दाखविलेला, काहून? विलासपूरहून राजधानी वा तख्त दिल्ली वा आग्र्याला गेल असे सुचवायचय? बर मधेच ते चार तारे अन उजवीकडे चन्द्र-शुक्राची चान्दणी कशाकरता? त्यामधे व्हाईट्टक्रॉस कशापाई? त्यात पेन्शिल अन त्यावर लाम्बलाम्ब बसलेले मुलगामुलगी जोडपे का?
श्श्या, मेन्दूचा बैदा झाला नुस्ता! Sad

मामी, अहो सहा मुगलबादशाहे इथे चित्रात कुठ कस बसवायचे म्हणतो मी?
पाचनी चन्द्रासमोरचा एक असे सहा तारे म्हणजे सहा मुगल बादशाहे का? अन चन्द्र १ तर पेन्शिलीवर बसलेले दोघ जण? ते दोघ जण अन सहा तारे मिळून ८?
खालच्या फोटूत तर मला जिकडे तिकडे सहाचा बोलबाला दिस्तोय. झाडे सहा, कारन्जी सहा, मध्यात आडवी रान्ग करुन फोटुला उभारलेले सहा (ते बादशाहे तर नव्हेत? :डोमा:), उजवीकडचे दिव्याचे खाम्ब सहा.

मी एक अतिशय फनी गेस मारते.
२ झेंडे : टर्की आणि चिन, (संदर्भः तुर्कनामा आणि चिनी माती) पुस्तकं : लेखिका मीना प्रभु
बिलासपुर आणि "मीना: एकत्र सर्च मारला तर एक ट्रेन इन्फॉर्मेशन मिळाली बिलासपुर हून सुटणारी फास्ट ' मीना एक्स्प्रेस' Biggrin
http://indiarailinfo.com/search/182/7043
परस्पर संबंध 'मीना' असु शकेल पण आकड्यांचा काही क्लु लागेना !

डिजे Lol
मला यावरून एक सम्बन्ध लावावासा वाटतोय. माप्रा आणि मीप्र दोघांच्याही लिखाणात विकी वरून उचललेली छायाचित्रे बघायला मिळतात Lol

१०२८६>>>>> लिंबूच्या पोस्टीतल्या आकड्यामुळे मी मायबोलीवर १०२८६ सर्च मारला तर तिथे ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट फोटोग्राफीची स्पर्धा दिसतेय त्यावरून काहीही बोध होत नाहीये.

हायला ६+१०२८६ = १०२९२ मायबोली नोड टाकल्यावर बघा काय दिसतय. Proud
राष्ट्रपतींशी सम्बन्धीत काही आहे बहुदा हे सुद्धा

राष्ट्रपती भवन.
इथेही मुघल गार्डन आहे.

डिजे, सर्वशिक्षा अभियानातही काहीतरी "मीना" स्पॉट्स असं आहे.
----------

६ + १ = ७ (WIBGYOR) = लाल
८६ (कोड) = पिवळा
२८६ (कोड) = निळा

1) ६ + १ = लाल = पिवळा correction?
६ + १ = लाल not निळा corrected

2) चीन, जर्मनी आणि टर्कीचा झेंडा = common colour "Red"

3) आग्रा फोर्ट = रेड फोर्ट

४) पेन्सिल आणि मुलं = सर्व शिक्षा अभियान

उत्तर लाल रंगाशी निगडीत असावं Happy

अस तर नसेल?
६+१=८६ म्हणजेच ६ दिनान्क, १ला महिना, ००८६ साल?
नि
६+१ नॉट २८६ म्हणजेच ६ दिनान्क, १०व्वा महिना, अन ०२८६ वे साल?
काय झाल होत या सनामधे?

अकबर निरक्षर होता. कोणतेही सर्व शिक्षा अभियान नसताना मुसलमानानी तुर्क ते पाकिस्तान अशी सत्ता गाजवली. आणि मोठ्या इमारतीही बांधल्या.

तात्पर्यः एक तर अडाणी व्हा किंवा मुसल्मान व्हा! Proud दोन्ही झाल्यास उत्तम .. स्पर्धा संपली. मला बक्षिस पायजे.

यावेळेस माप्रा काहीच बोलत नाहियेत (मधेमधे) की उत्तराच्या जवळपास आहात, फोटो बरोबर ओळखले आहेत, अमक्या ढमक्याच्याच संदर्भात उत्तर आहे, तुम्ही बरोबर ट्रॅकवर आहात वगैरे वगैरे Sad

म्हणजे आपण सगळेजण उत्तराच्या कोसो दूर असणार Proud

Pages