चित्रपट

'पाऊलवाट'च्या ध्वनिमुद्रिकांचा प्रकाशनसोहळा

Submitted by माध्यम_प्रायोजक on 9 November, 2011 - 01:41
सुमधुर संगीत हे 'पाऊलवाट'चं वैशिष्ट्य आहे. ही गाणी लिहिली आहेत वैभव जोशी यांनी, तर संगीतबद्ध केली आहेत नरेंद्र भिडे यांनी. 'पाऊलवाट'च्या ध्वनिमुद्रिकांच्या प्रकाशनाचा कार्यक्रम परवा, म्हणजे ७ नोव्हेंबर रोजी मुंबई इथे पार पडला. पं. हरिप्रसाद चौरसियांच्या हस्ते त्यांच्या वृंदावन गुरुकुलात ध्वनिमुद्रिकांचं प्रकाशन झालं. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध संगीतकार आनंद मोडक आणि गायक रवींद्र साठे उपस्थित होते. शुभा जोशी, विभावरी जोशी-आपटे, जसराज जोशी, संदीप उबाळे हे गायक आणि किशोर कदम, सुबोध भावे, मधुरा वेलणकर, हृषिकेश जोशी हे कलावंत या सोहळ्याला उपस्थित होते.
विषय: 

पाऊलवाट- संकेतस्थळाचं उद्घाटन आणि पत्रकार परिषद- प्रकाशचित्रे

Submitted by माध्यम_प्रायोजक on 7 November, 2011 - 04:26

५ नोव्हेंबर २०११ रोजी पत्रकार भवनात 'पाऊलवाट'च्या संकेतस्थळाचं उद्घाटन श्री. दाजीकाका गाडगीळ यांच्या हस्ते झालं. 'पाऊलवाट'चं www.paulwaatthefilm.com हे संकेतस्थळ मायबोलीकर प्रसाद शिरगांवकर यांनी केलं आहे.
paulwaat-30x40-01.jpg

या कार्यक्रमाचा हा फोटो वृत्तांत.

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक श्री. आदित्य इंगळे.
1- Aditya Ingle.jpg

निर्मितीच्या आणि संगीत दिग्दर्शनाच्या अनुभवांबद्दल बोलताना श्री. नरेंद्र भिडे.

विषय: 

तू झोप...मी जागा आहे (?)

Submitted by लसावि on 7 November, 2011 - 03:38

'काय एशिझेड काय?' 'नाय आर्केलॉजिचे काम हाय'.
देउळच्या या पहिल्या संवादातच हा सिनेमा कशाबद्दल बोलणार आहे, लेखक-दिग्दर्शकाचा नव्या ग्रामिण अवकाशाचा अभ्यास, त्याची नर्मविनोदी शैली सगळं एकदम समोर येतं. आणि सिनेमा तुमची एकदम पकड घेतो.
वळू आणि विहिरमधून दिसलेले पश्चिम महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपर्‍यातले गाव. कोरडे,उजाड, प्रचंड माळ. इरसाल, बेरकी, भोळी; माणसासारखी खरीखुरी माणसं. वळू आणि विहिरी प्रमाणेच 'देऊळ' कथानकाचा मुख्य मुद्दाही आणि रुपकही. तारशहनाईच्या आसमंत भरुन टाकणार्‍या लकेरीही तशाच.

विषय: 

.

Submitted by हणमंतअण्णा रावळ... on 6 November, 2011 - 01:08

धा गा उ ड व ला आ हे धा गा उ ड व ला आ हे धा गा उ ड व ला आ हे

विषय: 

देऊळ

Submitted by मी मुक्ता.. on 5 November, 2011 - 11:46

"ज्याला देव हवा आहे त्यानं तो आपापला शोधावा.. ज्याला नको आहे त्यानं शोधू नये, हे स्वातंत्र्य सगळ्यांना आहे" हे जितकं खरं आहे तितकंच हे ही खरं आहे की ज्याला कथा हवी असते, त्याला ती कुठेही मिळते, तो ती मांडतो.. ती पाहण्याचं किंवा न पाहण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे.. पण लोकहो, हे स्वातंत्र्य घ्या आणि 'देऊळ' नक्की पहा. मध्यंतरापर्यंत फार्सिकल टोन असलेला सिनेमा, मध्यंतरानंतर बराच गंभीर होतो. सिनेमाचं नाव आणि टॅग लाइन वाचून काही आडाखे बांधले असतील तर ते बर्‍यापैकी खरे निघतात पण खरी गंमत कथेच्या मांडणीत आहे.

विषय: 

"देऊळ" प्रिमियर — "फोटो वृत्तांत"

Submitted by जिप्सी on 4 November, 2011 - 14:51

'देऊळ' आणि मायबोली' नविन लेखनात दिसले आणि मायबोलीने एका दर्जेदार चित्रनिर्मितीमध्ये माध्यम प्रायोजकत्व स्विकारल्याचे वाचुन खरंच खूप अभिमान वाटला. या उपक्रमाचा एक भाग म्हणुन मायबोलीवर विविध स्पर्धा घेण्यात आल्या. अपेक्षेप्रमाणे त्याला मायबोलीकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातच प्रकाशचित्र स्पर्धेची घोषणा झाली. यातील दुसर्‍या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा विजेता म्हणुन माझं नाव घोषित झाले :-).

आत्ताच बघून आलोय....देऊळ

Submitted by संदीप आहेर on 4 November, 2011 - 07:53

सह्याद्रीच्या कुशीत लपलेलं पिवळं सोनं ....... पाणी नसेल तरी बहारदार तोर्‍यात हलणारं ते पिवळ गवत नि ती ऐन दुपारची वेळ ....... उन्हं किती कडक याचं चित्रण एकदम झकास (जी मुलं नेहमी उन्हाळ्याच्या सुट्टीतच गावी जातात ना त्यांना नेहमी ही उन्हं, ते पिवळ गवत नि उजाड डोंगर याचीच सवय होऊन जाते.... नि काहींना ते मनापासून आवडू लागतं........गिरीश कुलकर्णीना ही सवय नि ती आवड असावी... म्हणूनच ही पिवळाई
डोळे थंड करणारी हिरवाई हून अधिकच मनाला भावते)

विषय: 

देऊळ प्रिमियर

Submitted by मंजूडी on 4 November, 2011 - 05:38

"एका दर्जेदार चित्रनिर्मितीमध्ये माध्यम प्रायोजक म्हणून सहभागी होणं, हे 'मायबोली'साठी अतिशय आनंददायक आणि अभिमानास्पद आहे."

३ नोव्हेंबर, २०११ रोजी झालेल्या 'देऊळ' सिनेमाचा प्रिमियर बघताना याची पुरेपूर प्रचिती आली. अतिशय उत्तमरीत्या निर्माण केलेल्या या चित्रपटाच्या प्रिमियर शोला, अर्थात, 'फर्स्ट डे फर्स्ट शो'ला मायबोली.कॉमचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याची अभिनव संधी आम्हाला दिली याबद्दल मायबोली, अ‍ॅडमिन आणि टीम माध्यम_प्रायोजक यांचे अनेक अनेक आभार!

'पाऊलवाट' - घोषणा

Submitted by माध्यम_प्रायोजक on 2 November, 2011 - 02:07

paulwaat-30x40-02.jpg

अनंत देव हा सांगलीहून मुंबईला पार्श्वगायक होण्यासाठी आलेला तरुण. सर्वस्वी एकाकी असणार्‍या गोदूआक्कांकडे अनंता राहायला लागतो, आणि आपल्या स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठी त्याची धडपड सुरू होते. अनंताच्या या प्रवासाची आणि त्याला या प्रवासादरम्यान भेटलेल्या व्यक्तींची हृद्य कथा म्हणजे ’पाऊलवाट’.

ही कथा आहे नात्यांची..ही कथा आहे भोगांची, त्यागाची, अपेक्षांची, स्वप्नांची, स्वप्नभंगांची, जयपराजयाची, वास्तवाची..ही कथा आहे जगण्याची...!

निर्माते - स्टेट ऑफ द आर्ट फिल्म्स

विषय: 

Pages

Subscribe to RSS - चित्रपट