स्टॅनले का डब्बा
Submitted by मंजूडी on 30 May, 2011 - 01:11
काल स्टॅनले का डब्बा पाहिला. खूप सुंदर सिनेमा आहे.
अवघ्या पावणेदोन तासांचा चित्रपट आहे. ह्या चित्रपटाद्वारे अमोल गुप्तेने समाजातील एका मोठ्या प्रश्नाकडे आपलं लक्ष वेधलं आहे. चित्रपट पडद्यावर उलगडत असताना आपलं मनोरंजन होतच असतं पण आपल्याही नकळत आपण ज्याचा शोध घेत असतो ते वास्तव अचानकपणे चित्रपट संपतासंपता आपल्यासमोर येऊन उभं ठाकतं आणि आपण सुन्न होऊन जातो.
चित्रपटातून मांडलेल्या प्रश्नावर आपण ह्याआधी इतक्या गंभीरपणे विचार केलाही नसेल कदाचित, पण हा चित्रपट त्या सामाजिक प्रश्नाची दखल घ्यायला भाग पाडतो.
शब्दखुणा: