गद्यातलं हे माझं पहिलं (आणि एकमेव ) लिखाण आहे
आज नॅशनल वर मदर इंडिया बघायचा होता. पण सतत फोन, घरातली कामं यात तो सलग पाहता आलाच नाही. बाहेरून येईपर्यंत सिनेमा संपला होता. असंच सर्फिंग करतांना झी स्टुडिओ या चॅनेलवर एट बिलो हा सिनेमा चालू होता. मी पुढे जाणार इतक्यात बाबांनी मला थांबायची खूण करत हा सगळं काम सोडून हा सिनेमा पहा अशी आज्ञा केली...
सुरूवात चुकली होती. ती बाबांकडून कळाली. अंटार्क्टिकामधे मोहीमेसाठी एक अमेरिकन पथक गेलेलं असतं. स्टेशनपासून लांब बर्फात फिरतांना नायक बर्फाच्या घळईत अडकतो. वर बर्फ जमा होऊन त्याची तिथंच हिमसमाधी बांधली जाण्याचा धोका निर्माण होतो.
कोणी हा चित्रपट बघितला आहे का? सुबोध भावे च्या सकाळ मधील लेखनामुळे खूप उत्सुकता वाढली आहे.
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय? 
काही विशिष्ठ संवेदनशील विषय असलेल्या चित्रपटांवर चर्चा करणं मी सहसा टाळतो. पण अशाच एका विषयावर बनलेल्या एका उत्तम चित्रपटाने अखेर माझी ती सवय मोडली. अमेरिकेत सर्रास आढळणार्या आणि पाश्चात्यांचे अंधानुकरण करण्यात धन्यता मानणार्या आपल्या भरकटलेल्या भारतीय तरुण पिढीपर्यंत ते लोण पसरण्याचा धोका असलेला तो विषय म्हणजे पौगंडावस्थेतील गर्भधारणा अर्थात टीनएज प्रेग्नंसी.
मंडळी, मध्यंतरी खंड पडलेली 'चित्रपट परिचय' ही लेखमालिका पुन्हा सुरु करतो आहे. ज्यांना ही मालिका नवीन आहे, त्यांच्यासाठी आधीच्या लेखांचे दुवे या लेखाच्या शेवटी दिले आहेत. पहिल्या लेखाच्या सुरवातीसच स्पष्ट केल्याप्रमाणे हे चित्रपट परिक्षण नाही. तर ही लेखमालिका म्हणजे फक्त आणि फक्त 'मला आवडले, तुम्हाला सांगितले'च्या धर्तीवर मला आवडलेल्या काही चित्रपटांची ओळख करुन देण्याच्या हेतूने लिहीत आहे.
चला तर मग आस्वाद घेऊया ह्यावेळच्या चित्रपटाचा.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
बदल इतिहासः -
सदर लेखाचे मूळ नाव : - "तनू वेड्स मनू!!!"
समाजकंटकांनी केलेल्या नुकसानापोटी : "तनू वेड्स मनू : घुमजाव!!!"
समाजकंटकांनी पुनःपुन्हा चालुच ठेवलेल्या नुकसानापोटी : " बर बाबा, तनू वेड्स मनू मधे माधवन cute दिसतो"
मूळ लेख पुढिलप्रमाणे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
आधीच सांगतो, "तनू वेड्स मनू" मधे कंगना राणावत सुंदर दिसते.
"HITCH" चित्रपटात 'विल स्मिथच्या' तोंडी एक वाक्य आहे, जे थोडंसं बदलून इथे वापरता येईल कदाचित.
'सात खून माफ' अफाट आहे. लेखन, दिग्दर्शन, छायालेखन, रंगभूषा, अभिनय सगळंच अफाट. सुसाना आणि तिच्या आयुष्यातील सात पुरुषांची ही कथा. या सातही पुरुषांवर ती प्रेम करते. मात्र त्यांच्याकडून तिच्या वाट्याला अपमान, विश्वासघात आल्यावर त्यांचा ती काटाही काढते. हे काटा काढणं शेवटच्या पुरुषाच्या बाबतीत अतिशय अफलातून पद्धतीने दाखवलं आहे. सातवा नवरा आणि या सातव्या नवर्याचा खून..ही कल्पनाच लाजवाब आहे.
गोष्टी ऐकायला सगळ्यांनाच आवडत. लहानपणी ऐकलेल्या भूताखेतांच्या किंवा सिंदबाद, अरेबियन नाइटस् मधील सुरस चमत्कारिक कथा अगदी खर्या खर्या वाटायच्या.एवढच कशाला, अज्जी तिच्या लहानपणीच्या गोष्टी सांगायची. तिच्या अजोळच्या वाड्यातल्या तळघरातून येणारे आवाज, लग्नात तिची बहीण सोन्याने कशी वाकली होती, एका पैशाला ढीगभर सगळकाही मिळायच, शेतातला एक गडी मोठा मणाचा हंडा कसा उचलायचा आणी तिचे कोणी तरी मामा निरस शेर-शेरभर दूध कसे गटागटा प्यायचे.
हार्पर ली च्या पुलित्झर विजेत्या कादंबरीवर आधारीत हा नितांत सुंदर चित्रपट.आता जवळपास नामषेश झालेल अमेरिकन खेडेगावातल संथ जीवन, टीव्ही इंटरनेट च्या पूर्वी असलेले रस्त्यावर चाक फिरवणे, झाडावर चढणे संध्याकाळी घरातून हाका ऐकू येइ पर्यंत चालणारे खेळ. दाहक वर्णभेद आणी त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत घडलेल्या काही प्रसंगा मूळे छोटी स्काउट एक महत्वाचा धडा आपल्या वडीलांच्या मदतीने कसा शिकते याच अप्रतिम चित्रण यात आहे.