..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग १)

Submitted by मामी on 6 May, 2011 - 11:31

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय? Proud

दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पहिलं विचारते.

एका माणसाला चीज खूप आवडायचं. तो रोज एका हॉटेलात जाऊन चीज खायचा. त्याच हॉटेलात एक स्त्रीही अशीच रोज चीज खायला यायची. त्यांची ओळख झाली आणि ते रोज एकत्र चीज खायला लागले. मग त्याला ती हळूहळू आवडायला लागली. तर तो तिला इंप्रेस करायला कोणतं गाणं म्हणेल? Happy

एक जुनाच आहे पीजे

एक माणूस सायकलला पाठीमागे पावाच्या लाद्या बांधून न्यायचा. पण त्यातून नेहमी पाव खाली पडायचे. त्याला एका वेल्डरने दोन बाजूला दोन जाळ्या बसवून दिल्या. आता त्याचे पाव खाली पडणे बंद झाले.. तो माणूस खुषीत येऊन कोणतं गाणं म्हणेल ?

एका बाईनी काही मगरी पाळल्या होत्या. त्या नरभक्षक मगरी होत्या. मग ही बाई एकाएका पुरुषाला आपल्या प्रेमात पडायला भाग पाडायची आणि मग त्याला फसवून घरी आणून मगरी असलेल्या तळ्यात ढकलून द्यायची. तर तेव्हा ती कोणतं गाणं म्हणेल?

Sad

हे ही एक अजून. जुनंच पण मस्त.

देव आनंद एक दिवस चेतन आनंदच्या घरी त्याच्या स्विमिंग पूलमध्ये पोहत होता. तर या सिच्युएशन फिट्ट बसणारं गाणं कोणतं?

येस्स.

एका शायरला दारूचं व्यसन होतं..

दुनिया या बारचा मालक त्याला काही दिवस फ्री दारू द्यायचा. पण तो दंगा करू लागल्यावर त्याने त्याला बंदी केली. मग तो एका घाटी अशा महफिल या गुत्त्यात जाऊ लागला. शायरला पाहून त्याला उधारीवर दारू देत होते. पण उधारी खूपच थकल्यावर त्याला हाकलून दिलं

तो कोणतं गाणं म्हणेल ?

करेक्ट Wink

निवडणुकीचा प्रचार सुरू होता. निवडणुकीला उभा असलेला एक उमेदवार एका बाईच्या घरी जाऊन मलाच मत द्या वगैरे सांगून गेला. तर ती बाई नंतर कोणतं गाणं गाईल?

Pages