आपण सर्वानी महाभारत वाचला असो वा नसो पण चक्क आठ आठ दिवस वाट पाहून टि.व्ही. वर पाहिल आहे. महाभारतात कौरव आणि पांडव असे दोन मुख्य़ पक्ष आहेत. यातील पांडव हे हिरो आहेत तर कौरव विलन. प्रत्येक घटनेतून पांडवांची बाजू भक्कम होत जाते तर कौरवांची कमकूवत. दुर्योधन हा मुख्य विलन तर अर्जून मेन हिरो(बाकी साईड होरो).
माझं गांव चौधरा... अगदी लहानसं खेडं... माझं पहिली ते चवथी पर्यंतचे शिक्षण गांवापासून एक-दिड कोस दूर असलेल्या निळोणा या गांवाला झाले.
त्यांतरचे पाचवी ते बी.कॉम. पर्यंतचे शिक्षण गांवापासून तीन...क कोस दूर असलेल्या यवतमाळ या शहरात झाले.
त्यावेळी दुकान, ऑफीस, सिनेमा इत्यादी ठिकानी टेलिफोन वर लोकं बोलत असल्याचे मी पाहत होतो.
खेड्यामध्ये टेलिफोन नसल्यामुळे लोकांना त्याचे कुतूहल वाटायचं. म्हणून मी त्याची नक्कल लोकांना करुन दाखवायचं ठरविलं.
त्यावेळी मी कॉलेजमध्ये प्रि. कॉमर्स म्हणजे आताच्या अकरावीला शिकत होतो.
अलविदा जगजीतसिंग!
जगजीत सिंग यांच्या गायनाबद्दलच्या माझ्या आठवणी
लेखक: सुधीर काळे, जकार्ता
पोलाद बनविण्यासारख्या नीरस कामात सारी व्यावसायिक हयात 'घालवलेला' इसम या नात्याने माझे कला क्षेत्राशी नाते तसे 'चुलत'सुद्धा नाहीं. संगीताच्या/काव्याच्या जगात मी एक नाचीज माणूसच. माझे संगीताशी नाते आहे ते केवळ एक हौशी श्रोता म्हणूनच. पण मी जगजीत सिंग यांच्याच्या गायनाचा एक प्रचंड चहाता आहे.
सुमारे २० वर्षांपूर्वी सावरकर दर्शन प्रतिष्ठानने काढलेल्या स्मरणिकेत श्री मुकुन्द सोनपाटकी यांचा ’कुछ याद उन्हे भी कर लो’ या शीर्षकाचा एक अतिशय मौलिक माहिति देणारा लेख वाचला होता. तसेच कोठेतरी त्यांच्या ’दर्यापार’ या पुस्तकाचा उल्लेख वाचला होता. पण ते पुस्तक कोठेही विकत मिळू शकले नाही पण माझे मित्र श्री. गुणे यांचेशी बोलतांना हे पुस्तक त्यांच्याजवळ असल्याचे समजले आणि अनपेक्षितपणे हाती आले. दर्यापार - लेखक - मुकुन्द सोनपाटकी, पुरंदरे प्रकाशन, पुणे, सन १९८०.
सन १८४० च्या सुमारास नवकाव्यपरंपरेचा शुभारंभ झाला.या परंपरेचे आधारस्तंभ म्हणजे समाजात रुजलेले तत्कालीन तीन प्रमुख काव्यप्रवाह होते: संत साहित्य, पंडिती साहित्य, शाहिरी साहित्य अर्थात संत-पंत-तंत काव्य.संत काव्य मराठी काव्याचा एक अनमोल ठेवा आहे.याचा कालखंड म्हणजे तेराव्या शतकातील श्री.ज्ञानेश्वर ते सोळाव्या शतकातील समर्थ रामदासस्वामींच्या साहित्यनिर्मितीपर्यंतचा काळ.यादवांच्या राजवटीत समाजात वर्णभेद ,जातिभेद , विषमता यांसारखे अंतर्द्वंद्व सुरु होते.यात अडकलेल्या सर्वसामांन्यांना स्वार्थातून परमार्थ साधण्याचा मार्ग संतांनी दाखविला.
पहिलं प्रेम कसं विसरायचं ........................ पहिलं प्रेम कसं विसरायचं ? प्रेमपत्र पत्राची सुरुवात प्रियने केली नाही, कारण ते लिहिण्याइतकी आज तू माझी राहिलेली नाहीस. असो. आपल्याशेवटच्या भेटीला आता चार वर्षे होतील. पण या चार वर्षांंत मी माझ्याशीही जे कधी बोललो नाही, ते आजया पत्रात लिहितोय. ते तुझ्यासाठी नाही तर फक्त माझ्या समाधानासाठी. चार वर्षांपूर्वी तुझा शेवटचा पेपर संपल्यानंतर कॉलेजच्या बाहेर आपण भेटलो होतो. खरं तर तुझ्या घरी आपल्याबद्दल कळल्यापासून आपल्याला प्रत ्यक्ष भेटणं फारसं कधी जमलंच नाही. पण तरीही आपण त्या दिवशी भेटलो. शेवटचं.
गझलगायकांपैकी जगजीतसिंग हे माझ्या यादीत खरे तर पंकज उधास व गुलाम अली यांच्यानंतर तिसर्या क्रमांकावर होते. पण तरीही हा लेख लिहावासा वाटत आहे कारण गझल गायकीला त्यांनी एक वेगळी पातळी नक्कीच दिली.
खरे तर जाडा भरडा आवाज असूनही काही वेळा तो सॉफ्ट व्हायचा आणि गझलेतील काफियाचे सौंदर्य खुलवण्याची विलक्षण हातोटी या गायकाकडे होती.
अमीर मीनाईच्या 'सरकती जाये है रुखसे नकाब आहिस्ता आहिस्ता' या गझलेमुळे जगजीत सिंग यांना मोठीच प्रसिद्धी मिळाली.
स्व. श्री. मुरलीधर देविदास उर्फ बाबा आमटे यांच्या परिवारात ते ही डॉ.प्रकाश आणि डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या पोटी जन्माला येणे हे माझे खरोखरच भाग्य आहे. जन्मापासून गडचिरोली जिल्ह्यातील लोक बिरादरी प्रकल्पात वाढलोय. तो काळ आणि आजचा काळ यात जमीन अस्मानाचा फरक आहे. दुर्दैवाने बाबा आणि साधनाताई आमटे (आजी-आजोबा) यांचा अतिशय थोडा सहवास मला लाभला. बाबा - आजी दोघही चंद्रपूर जिल्ह्यातील त्यांचा कर्मभूमीत आनंदवनात राहायचे. ३-४ महिन्यातून एकदा त्यांची लोक बिरादरी प्रकल्पाला भेट असायची. १-२ दिवस राहून ते आनंदवनाला परतायचे.
सीमोल्लंघन
दसरा!
रावणाशी झालेलं युद्ध संपलं. आणि अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी हे नाव पडलं. सीतेला पळवून नेल्यानंतर, तिचा शोध, त्यासाठी सुग्रीवाशी मैत्री, त्यातून हनुमानाची भक्ती, लंकादहन, सेतूबांधणी व त्यानंतर नऊ दिवसांचं घनघोर युद्ध. अशा लांबलचक चाललेल्या प्रवासाची समाप्ती झाली. एक पर्व संपलं. आणि नवीन रामराज्य सुरू झालं.