लेख

कविवर्य बी.रघुनाथ- एक स्मरणयात्रा

Submitted by विनीता देशपांडे on 27 August, 2011 - 06:50

आधुनिक काव्यप्रवाहातील एक अभिनव कवि म्हणजे बी.रघुनाथ. कथा,काव्य आणि कादंबरी हे तीनही साहित्यप्रकार त्यांनी समर्थपणे हाताळलेत. बी.रघुनाथ यांनी सन १९३० पासून अर्थात वयाच्या सतराव्या वर्षापासून साहित्य लेखनास प्रारंभ केला.त्यांची पहिली कविता हैद्राबाद येथिल "राजहंस" या मासिकात फुलारी या टोपण नावाने प्रसिध्द झाली. नंतर मात्र त्यांनी बी.रघुनाथ या नावाने लेखन केले.
बी.रघुनाथ यांच्या लेखनकालाचा आढावा घेता एकीकडे दुसरे महायुध्दाचे परिणाम, भारतात सुरु असलेले स्वातंत्र्य संग्राम आणि दुसरीकडे महाराष्ट्रात परिवर्तनाच्या वळणावर असलेले साहित्य तर

गुलमोहर: 

थेंब

Submitted by vandana.kembhavi on 25 August, 2011 - 20:34

लगबगीने ती चालू लागली, अचानक समोर तळं बघून ती स्तब्ध झाली. दोन क्षणं तिने त्या तळ्याकडे पाहिले, तिची नजर पोचेल तिथपर्यंत पाणीच पाणी होते. तिने कडेकडेने चालायला सुरुवात केली, पण कुठेच बाहेर पडायचा मार्ग दिसत नव्हता. खूप दूर पर्यंत चालून पण तिला ते पाणी पार करायचा मार्ग दिसेना. एक क्षण थांबून तिने मागे फिरायचे ठरवले आणि ती मागे वळली. थोडं अंतर मागे चालून आल्यावर तिच्या मनात आले की असं हरून कसं चालेल? काहीतरी पर्याय असेलच, आपण तो शोधलाच पाहिजे. जिद्दीने ती वळली आणि परत त्या तळ्यापाशी आली, तिने एक रस्ता निश्चित केला आणि न थकता ती त्या रस्त्यावरून चालू लागली.

गुलमोहर: 

एक आहे भारती

Submitted by इंद्रायणी on 25 August, 2011 - 13:27

श्री गणेश

एक आहे भारती....
एक आहे भारती... खरंतर भार”थी”!

फक्त दीड वर्षांची. आईच्या मायेला पारखी झालेली. आता सुब्रमण्यच्या मायेत वाढणारी. तिच्या वयाच्या इतरांप्रमाणे तिलाही चालायचं असेल, धावायचं असेल, मस्ती करायची असेल, खोड्या काढायच्या असतील...

पण ती चार महिनांची असताना तिला संधीवाताचा आजार जडला आणि चालणं धावणं तर दूरच पण तिला जागचं हलताही येईनासं झालं. मग सुब्रमण्यमनं तिच्यासाठी उबदार घर तयार केलं. तिचा मायेनं सांभाळ केला. पण इतकं गोंडस बाळ एका जागी पडून राहीलेलं त्यांना पहावेना. खूप उपचार केले पण गुण येईना. भारथीनंही उठावं, खेळावं असं त्यांना फार वाटे.

गुलमोहर: 

प्रचलित व्यवस्थेत भ्रष्टाचाराची अनिवार्यता : लेखांक - ३

Submitted by अभय आर्वीकर on 25 August, 2011 - 09:53

प्रचलित व्यवस्थेत भ्रष्टाचाराची अनिवार्यता : लेखांक - ३

गुलमोहर: 

एकदा वाचा तरी....

Submitted by छोटी on 24 August, 2011 - 04:26

"आईच्या गावात","माझी सटकली" तुम्हाला कळल असेल ना मी सिंघम बद्दल बोलते आहे ते मस्त वाटल ना चित्रपट बघून
छान वाटल तो गुंड मार खाताना बघून...अन्याय वर न्यायाचा विजय बघून३ तास छान गेले ना... मस्त सगळ छान ३ तासात सगळे खुश
का हो मनात विचार आला का? कोणीतरी सिंघम पाहिजे आपल्यला मध्ये???

जर आला असेल तर तुम्ही नक्कीच साधारण माणूस aahat COMMON मन,ज्याला शिवाजी जन्माला यावा अस वाटत पण शेजारच्या घरात
माझ्या घरात नको ती ब्याद .... असे आपण सगळे मुर्दाड माणस आहोत लाज वाटायला पाहिजे आपल्याला..
तिथे तो आपला बाप उपोषणं बसतो आणि आपण घरात रगडतो आहे..

गुलमोहर: 

एकदा वाचा तरी....

Submitted by छोटी on 24 August, 2011 - 04:20

"आईच्या गावात","माझी सटकली" तुम्हाला कळल असेल ना मी सिंघम बद्दल बोलते आहे ते मस्त वाटल ना चित्रपट बघून
छान वाटल तो गुंड मार खाताना बघून...अन्याय वर न्यायाचा विजय बघून३ तास छान गेले ना... मस्त सगळ छान ३ तासात सगळे खुश
का हो मनात विचार आला का? कोणीतरी सिंघम पाहिजे आपल्यला मध्ये???

जर आला असेल तर तुम्ही नक्कीच साधारण माणूस aahat COMMON मन,ज्याला शिवाजी जन्माला यावा अस वाटत पण शेजारच्या घरात
माझ्या घरात नको ती ब्याद .... असे आपण सगळे मुर्दाड माणस आहोत लाज वाटायला पाहिजे आपल्याला..
तिथे तो आपला बाप उपोषणं बसतो आणि आपण घरात रगडतो आहे..

गुलमोहर: 

खाज

Submitted by thasaa on 22 August, 2011 - 23:14

"काय??? तु ब्लॉग लिहीतोस?" असं मित्राने किंचाळत विचारलं आणि कारण नसतांना मला अपराधी वाटायला लागलं. "हे ब्लॉगिंग, लिहिणं-बिहिणं सगळं बेकार आहे रे. टाईम वेस्ट. त्यापेक्षा तू शेअर ट्रेडिंग का नाही सुरु करत? किंवा एखादा साईड बिझनेस वगैरे कर. बघ राव, आता आपण ३९-४० चे आहोत. अजून १० वर्षात कमवून घे काय कमवायचं ते. नंतर तुझ्या हॉबीस पूर्ण कर ना. प्रॉब्लेम काय आहे?"

प्रॉब्लेम काय आहे!!!

च्यामारी प्रॉब्लेम हा आहे कि मी भरपूर वाचतो. प्रॉब्लेम हा आहे कि सर्व काही मला आत्ताच करायचंय. प्रॉब्लेम हा आहे कि उद्याचा भरवसा नाहीये, लाईफची ग्यारंटी नाहीये. आणि मुख्य म्हणजे, मला काहीतरी सांगायची खाज आहे.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अण्णा, कोंडी फोडा आता !

Submitted by असो on 22 August, 2011 - 22:05

आदरणिय अण्णा

हे अनावृत्त पत्र तुम्हाला लिहीत आहे. मायबोली हे संकेतस्थळ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत असावं असा विश्वास आहे. तुमचे लॅपटॉपधारी सैनिक कुठे काय छापून आलेय हे तुमच्यापर्यंत पोहोचवत असावेत ही आशा आहे.

गुलमोहर: 

थरांचा थरार

Submitted by अपूर्व on 22 August, 2011 - 03:34

दहीहंडी हा खरं तर श्रीकृष्णाच्या बाललीलांमधून जन्मलेला खेळ. त्याचा आता ‘स्पोर्ट’ झालाय ‘स्पोर्ट’. त्यात संस्कृती किती उरलीय हा वादाचा मुद्दा झाला, पण त्याचं स्वरूप फार (जरा जास्तच) मोठं झालंय. बक्षीसांच्या रकमांमधे शून्यावर शून्य चढवली जातायत. (गोविंदांच्या हातात किती पैसे येतात हा एक वेगळाच प्रश्न आहे.) वर्गणी चं स्वरूप वर्गणी सारखं कमी आणि खंडणी सारखं अधिक वाटायला लागलंय. स्पॉन्सर्स चे बॅनर आणि डीजेंचे स्पीकर दोन्ही वर्षागणिक मोठे होतायत. यातले गोविंदा मात्र मनो-यासरशी वर जातात आणि मनो-यागत खाली येतात.

गुलमोहर: 

भगवान बुध्द - नव्या प्रकाशाच्या शोधात

Submitted by rkjumle on 22 August, 2011 - 01:08

सिध्दार्थ गौतम वयाच्या विसाव्या वर्षी शाक्य संघाचा सभासद झाल्यानंतर आठ वर्षाने एक अशी घटना घडली की, त्यामुळे सिध्दार्थ गौतमाच्या जीवनाला कलाटनी मिळाली. शाक्यांच्या राज्याला लागून कोलियांचे राज्य होते. रोहिणी नदीमुळे ही दोन्ही राज्ये विभागली गेली होती. रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलिय हे दोघेही आपआपल्या शेतीकरिता वापरीत होते. रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी व किती घ्यावे याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात त्यांचा वाद होत असे. त्यावर्षी त्यांच्या मध्ये फार मोठा संघर्ष झाला. दोन्ही बाजूंच्या लोकांना दुखापती झाल्या.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - लेख