येणार येणार म्हणताना अखेर तो दिवस उजाडला. मी वर्षभर माबोकरांना भेटण्याचे विशेष मनावर घेतले नव्हते. (तरी ठमादेवी घरी येऊन टपकलीच होती. :फिदी:) आता एक वर्ष झालं, प्रस्थापित मायबोलीकर होण्याच्या प्रोसेस मधला एक ठळक टप्पा गाठला आणि मनाशी ठरवतच होते की आता मायबोलीकरांना भेटलं पाहिजे. तर एक दिवस दिनेशदांची मेल आली. ते भारतात येणार होते आणि जागूकडे काही जण जमणार होते. दिनेशदांचं आमंत्रण, जागूसारख्या सुगरणबाईकडे जेवण आणि माझी वर्षपूर्ती असा सगळा योग एकत्र जुळून आला नि आमचं घोडं एकदाचं मायबोलीच्या गंगेत न्हायला तयार झालं.
पंढरीची वारी: मूल्य शिक्षण व व्यवस्थापन अभ्यासाचे अद्वितीय माध्यम.डा. संजय होनकळसे :
भारत हा संस्कृतीप्रधान देश आहे .भारतात संस्कृतीची गुंफण समाज व धर्म यांच्याशी सांगड घालून शास्त्रोक्त पद्धतीने सण, उत्सव, व्रत वैकल्ये, तीर्थाटन साजरी होतात व याला पारंपारिकता आहे. एवढी विविधता व परंपरा इतर कुठल्याही देशात व धर्मात आणि ती ही शास्त्रोक्त बैठकीवर आधारलेली आढळत नाही.
मातृ देवो भव, पितृ देवो भव.
'गुरुर्ब्रम्हा, गुरुर्विष्णु,
गुरुर्देवो महेश्वरः,
गुरु: साक्षात परब्रम्ह
'तस्मै श्री गुरुवे नमः'
आज गुरुपौर्णिमा. म्हणूनच माझा पहिला नमस्कार माझ्या आई-दादांना. हो माझे पाहिले गुरु तेच आहेत!
जिने अनंत यातना सहन करून, मला या सुंदर पृथ्वीवर जन्म दिला, ती आई, आणि अनेक काबाड-कष्ट करून मला वाढवल, त्या दादांना (माझे वडील) माझा नमस्कार.
पुन्हा एकदा मुंबईत तीन ठिकाणी बॉम्बस्फोट होऊन २१ जणांचा बळी गेला.१५ दिवसांपूर्वीच गुप्तचर यंत्रणांनी तशी पूर्वसूचना दिली होती.आता "माहिती मिळूनही सुरक्षा यंत्रणा पुनः एकदा निष्पापांच्या हत्या रोखण्यात अपयशी ठरली आहे.हे वारंवार होणारे बॉम्बस्फोट आमची सुरक्षा व्यवस्था किती कुचकामी आहे,आणि भारतावर हल्ला करणे किती सोपे आहे,तेच साऱ्या जगाला दाखवून देत आहेत".असे आरोप आमच्यावर होतच असतात त्यात काय विशेष? निषेध व्यक्त करण्यापलीकडे आपण काय करू शकतो?बदला घेण्यासाठी आम्ही काही अमेरिका वगैरे थोडेच आहोत !
विषाची संपूर्ण बाटली पिवून हि मेलो नाही म्हणून तरुणानेच केली तक्रार! आज देश्याला भ्रष्टाचार, फसवेगिरी, भेसळ, लाच-खोरी , चोरी, दरोडा, अंधश्रद्धा अश्या अनेक रोगांनी ग्रासले आहे. नैराश्य भावनेने पेटलेल्या तरुणाने जगण्यात काही मजा नाही म्हणून एका दुकानाहून विषाची बाटली विकत घेतली...पण हे औषध पिवून त्याला साधी गुंगी हि आली नाही...केवळ जगणेच मुश्कील नाही तर मरणे देखील अवघड झाले आहे हे त्याला समजले. मग विशौषाधी निर्माता, वितरक, यांच्या नावावर फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा का दाखल करू नये...?..पण गुन्हा दाखल करून काही उपयोग आहे का..? हा गुन्हाच कुणी करू नये म्हणून काही उपाय योजना का असू नये..
गावाकडच्या माझ्या शाळेत पालकभेट हा प्रकारच नव्हता. वर्षाच्या शेवटी १ मे ला आम्हाला एक छोटे, तांबडे प्रगतीपुस्तक मिळे. त्यामागे पालकांची सही घेउन ते शाळेत लगेच परत करायचे असे. संपूर्ण वर्गात त्यावर सही करु शकणारे ४-५ पालक असत, बाकी सगळे आंगठे. मला विद्यार्थी म्हणून पालकभेटीला कधीच सामोरे जावे लागले नाही. मात्र शिक्षक झाल्यापासून मात्र पालकभेट हा व्यवसायातील एक महत्वाचा ’इव्हेंट’ बनला आहे. त्यातही मी बहुतांश वेळा निवासी शाळेतच काम केले आहे आणि अशा शाळेत पालकभेटीचे महत्व अर्थातच डे-स्कूल्सपे़क्षा कितीतरी जास्त असते.
तत्वज्ञानाची शिबिरे आणि भाविकांची मानसिकता
पूर्वग्रह
by डॉ.सुनील अहिरराव on Saturday, March 12, 2011 at 9:50am
एखाद्या व्यक्तीविषयी आपण एखादा समज वा गैरसमज करून 'घेतो' ,किंवा आपला तसा तो समज 'होतो' ;त्याला पूर्वग्रह म्हणतात.पूर्वग्रह होणे हे व्यक्ती,परिस्थिती ,आणि कालसापेक्ष असते.एखाद्या व्यक्तीविषयी झालेला पूर्वग्रह दूर होणे ही फारच 'दूरची' गोष्ट असते.
आजोबांना बरे नव्ह्तेच तसे, पण अगदि होस्पिटल मधे ठेवावे लागेल अस वाट्ले नव्हते. मामिने रिक्शा बोलविलि आणी त्याना घेवुन गेलि पन होस्पिट्ल मधे, खरेतर जाताना आजोबा जाताना डोकावत होते रिक्शा मधुन कि त्याना त्यान्चि मुलगि दिसते का म्हनुन पन मामि ने ते होवु दिले नाहि आनी गाडी तषिच पुढे गेलि. काय वाट्ले असेल त्यांना, किति परधिन असतो माणूस. साधे स्वतच्या मुलीला जाताना सांगता येवु नये.