मला तो खूप वेळा भेटलाय. आताशा संपर्क कमी झालाय हे खरं पण तरीही संबंध काही संपला नाहीये. अजून कधीतरी एखाद्या निवांत रात्री रपरपत असतो. मीच टाळतो बाहेर जायचं. सखीची झोपमोड करून त्याला भेटायला जायचं म्हणजे नको वाटतं. पण असं म्हणून, झोप येते का शांत, त्याच्या हाका चालूच असतात की. आपण तोंडावर पांघरूण ओढून झोपेचं सोंग घेऊन रहायचं.
यात दिलेली माहिती केवळ माझ्या वाचनाच्या आधारावर आहे. यातील कोणतीही माहिती मी स्वतः प्रयोगशाळेत तपासलेली नाही. परंतु स्वानुभवाने ही सर्व पद्धती मला तरी विश्वासार्ह वाटली आहे हे मुद्दाहून नमूद करावे वाटते.
SUNRISE
Sunrise is not just a process in which sun comes lightening the whole sky from behind the hill ranges,but its a process of lightening someone's talent.With sunrise each day comes with a new vision for human beings to look at their life.Generally we say its a sunrise when sun arises behind the big wall of mountains, but actually it happens when a person uncovers his hidden talents and presents the same in front of the world.

नुकतेच सुरेश खोपडे यांचे वरील पुस्तक वाचनात आले.
वरिष्ठ पोलिस अधिकारी सुरेश खोपडे यांनी गृहखात्यावर शरसंधान केले आहे. सेवेत असलेल्या अधिकाऱ्याने इतक्या थेटपणे खात्यासंदर्भात मतप्रदर्शन करण्याचे धाडस करावे, हे मोठे धाडसाचे काम आहे. खोपडे यांचा त्यामागील हेतू काहीही असला तरी त्यांच्या धाडसाचे कौतुक करावे लागेल.
जमून आलेली संध्याकाळ
एखादं गाणं जमून यावं त्याप्रमाणेच संध्याकाळही जमून येते. तुम्ही पण कधी अनुभव घेतला असेल. संध्याकाळ ही वेळच फार फार सुंदर असते. त्यात केवळ एकच भावना नसते. त्यात उल्हास असतो, आनंद असतो, हुरहूर असते आणि रात्रीची ओढही असते. या सगळ्या भावना मनात दाटून आलेल्या असतात. सूर्य पृथ्वीचा केशरी निरोप घेत असतो. त्या निरोपाची भूल थोडी आपल्या मनालाही बसते. संध्याकाळ ही तर कातरवेळ असते मनाला कातर करणारी वेळ!! पण मी नेहमीच अशा संध्याकाळची वाट बघते कारण अशाच संध्याकाळ मधून एखादी संध्याकाळ छान जमून येते.
भाषा हे संपर्कासाठी एक माध्यम आहे. त्यासाठी शब्द अवश्यक असतात असे नाही .भाषेचा शोध घ्यायचा तर मानवाच्या उत्क्रांतीच्या काळाशी जावे लागते.तेव्हा एकटा दुकटा राहणारा आदिमानव कोणती भाषा बोलत होता? हातापायांनी केलेल्या खाणाखुणा,हालचाली,डोळ्यांची उघडझाप,आणि बहुदा प्राणी व पक्षी यांच्या अनुकरणातून काढलेलेले अर्थहीन चित्रविचित्र आवाज हीच त्याची भाषा होती. गुहेत राहणारा शिकार करणारा हा मानव जेव्हा इतर मानवांच्या वा मानवी समूहांच्या संपर्कात येऊ लागला तेव्हा त्याची हीच भाषा होती.नंतर त्या त्या समुहानुसार ठराविक आवाजाला ठराविक अर्थ प्राप्त झाला.
सध्या भारतात विविध प्रश्नांनी थैमान घातले आहे आणि सर्वसामान्य नागरिकाच्या मनात अनंत प्रकारे त्याबद्दल असंतोष पसरत आहे. या देशासाठी बलीदान करणाऱ्यांचा एक काळ होता,जेव्हा देशभक्ती शिवाय त्या लोकांना काही दुसरे सुचत नव्हते.कित्येकांनी ऐन तरुणाईत स्वातंत्र्य संग्रामात झोकून दिले.कित्येकांनी देशासाठी स्वता:चे संसार उद्ध्वस्त केले.कित्येकांनी अनेक वर्षे तुरुंगात काढली.कैक फासावर गेले.कित्येक कायमचे बेपत्ता झाले.त्या स्वातंत्र्यवीरांचा हा देश कायमचा ऋणी आहे.
आजचे पुढारी आणि सामान्य मनुष्यही आपापल्या तत्वांपासून कधीच ढळले आहेत. माणुसकी ,नीतिमूल्ये आता माणसात अभावानेच आढळतात.प्रत्येकाला फक्त स्वतःची विवंचना आहे;केवळ माझे भले होवो,इतरांचे काहीही होवो ही प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे! जो तो अडचणीत सापडलेल्याला कापायला बसला आहे.मनुष्य म्हणविणारा माणूस इतका स्वार्थी आणि आत्मकेंद्री का बनला असेल? की मनुष्य मुळातच स्वार्थी आहे? असे असेल तर मग याला काही लोक अपवाद का आहेत? आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी या भारत देशासाठी स्वतःचे रक्त का सांडले असेल? त्यांना कुटुंब,घरदार नव्हते का? त्यांनी देशापुढे आपल्या आशाआकांक्षा,स्वनांचा बळी का दिला असेल?