ती गेली तेव्हा.....
Submitted by मोहना on 25 May, 2011 - 19:43
" ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता " .... गाण्याचे शब्द कानावर पडले आणि अभिनव च्या गालावर त्याच पावसाचे थेंब ओघळले... ती जाऊन आज २२ वर्षे झाली.
" अनुज्ञा गेली. " चे शब्द कानावर आदळले . आणि अभिनव कोसळला.
अनुज्ञा विमानतळावर त्याला सोडायला आली तेव्हाच तिला शेवटचे पहिले होते...किती आनंदात होती ती !! ती आई होणार होती . अभिनव ला तर तिला कुठे ठेवू नि कुठ नको असे झाले होते.