लेख

मराठी काव्यातील 'माणिक'

Submitted by किंकर on 9 May, 2011 - 19:37

१० मे ... एक्काहत्तर वर्षांपूर्वी याच दिवशी सौ.सुमित्रा आणि श्री.सीताराम गोडघाटे,या दांपत्याचे पोटी एक पुत्ररत्न जन्मास आले. भविष्यात एखाद्या क्षेत्रात हे मुल हिऱ्याप्रमाणे चमकून उठेल याची पुसटशी कल्पना नसताना,त्यांनी त्याचे नाव 'माणिक' असे ठेवले. पुढे वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्यावर्षी हे झाकले माणिक,खरोखरच कोहिनूर हिऱ्या प्रमाणे चमकून उठले. 'संध्याकाळच्या कविता' या गूढ गंभीर काव्य रचनेतून ते जगासमोर आले.अर्थात इतक्या माहिती नंतर देखील आपल्या मनीचे गूढ नाही ना संपले.कारण ते जगासाठी ते माणिक सीताराम गोडघाटे या नावानी लिहिते झाले नाहीत.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

बालगंधर्व

Submitted by तात्या अभ्यंकर on 9 May, 2011 - 04:21

नारायणराव बालगंधर्वांची नाटकं जोरात सुरू आहेत. नुकताच एका कर्जाचा डोंगर उतरून कधी नव्हे ते रु ३०००० इतकी रक्कम नारायणरावांच्या सहकार्‍यापाशी शिल्लक आहे. नारायणराव बसले आहेत. त्यांच्या पुढ्यात नानाविध उंची अत्तरं मांडलेली आहेत. नारायणरावांनी नुकतीच अत्तरांची खरेदी आटोपली आहे. माझ्या नाटकाला येणार्‍या रसिकांकरता उंची अत्तर हवंच, हा नारायणरावांचा अट्टाहास आहे. नारायणराव रसिकतेने अत्तराचा सुवास घेत आहेत.

"नारायणराव, आता हे ३०००० रुपये बँकेत जमा करतो.."
"हो, चालेल. एवढं अत्तरांचं बील चुकतं करा आणि उरलेली रक्कम बँकेत टाका.."
"किती झाले अत्तरांचे..?"
"२५०००..!!"

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

थँक्स फॉर द मायटोकाँड्रीआ, मॉम!

Submitted by लसावि on 7 May, 2011 - 03:44

आपली प्रत्येक पेशी (cell) अनेक यंत्रांनी बनलेल्या अत्यंत सुंदर आणि कार्यक्षम कारखान्याप्रमाणे आहे. पेशीचे केंद्रक (nucleus) म्हणजे त्याचा व्यवस्थापक, ज्याच्या आदेशाप्रमाणेच सगळी कामे होणार. परितालिका (cell membrane) आहे सुरक्षा अधिकारी, कारखान्याचा पुरवठा आणि वितरण नियंत्रित करणारी. गॉल्गी बॉडीज, एंडोप्लाझ्मीक रेटीक्युलम आणि रायबोसोम हे या कारखान्याचे कनव्हेअर बेल्ट्स कम प्रॉडक्शन मॅनेजर, तर वेगवेगळ्या प्रकारचे एंझाइम्स, प्रोटीन्स आणि आरएनए हे सुपरवायझर्स आणि कामगार!

मात्र या सगळ्या व्यापाला लागणारी उर्जा पुरवणारे उर्जाकेंद्र मात्र एकच- मायटोकाँड्रिआ!

गुलमोहर: 

व्यसन

Submitted by मंदार-जोशी on 3 May, 2011 - 00:28

एक मुलगा एका दुकानाबाहेर पडतो.

"ए हीरोss आजचे धरून तीनशे साठ रुपये बाकी आहेत तुझे, किती?" मागून हाक.

"तीनशे साठ."

"हां बरोब्बर तीनशे साठ. तेवढं लवकर द्यायचं बघा."

"शेट, लक्षात आहे माझ्या, देतो."

"दहा दिवस झाले, हेच सांगतय राव."

"देतो, देतो, दोन दिवसात नक्की देतो."
ओशाळलेला चेहरा घेऊन तो मुलगा त्याच्या दुचाकीवर बसून निघून गेला.

गुलमोहर: 

आणखी एक राधिका

Submitted by मंदार-जोशी on 2 May, 2011 - 06:05

८ मार्च २०११ रोजी सगळा देश - नव्हे - अखिल विश्व जागतिक महिला दिन साजरा करत असतानाच राजधानी दिल्लीत राधिका तन्वर या कॉलेज तरुणीला एका युवकाने गोळी घालून ठार केल्याच्या वृत्ताने सगळा देश हादरला.

"सगळा देश हादरला" असं लिहीण्याची पद्धत असते. कारण असले प्रकार आजकाल इतके सर्वसामान्य झाले आहेत की कुणी हादरत वगैरे नाही. एका सहकर्मचार्‍याची प्रतिक्रिया अगदी प्रातिनिधिक म्हणावी लागेल. "असेल काहीतरी प्रेमाबिमाचं लफडं, सोड यार".

गुलमोहर: 

बाजिंदी... मनमानी....

Submitted by मी मुक्ता.. on 1 May, 2011 - 08:28

वेदनेतलं सौंदर्य अजून कळायचं होतं आणि वेदनेतही कला असते हे गावी नव्हतं त्या वयातली ही गोष्ट.. इतर कोणत्याही मराठी घराप्रमाणे आमच्याही घरात "स्मिता पाटील" हे नाव कौतुकाने, आदराने घेतलं जायचं. त्याबरोबरच व्यक्त व्हायची तिच्या अकाली निधनाची हळहळ आणि तिच्या सौंदर्याचा आवर्जून केलेला उल्लेख. तिला बघायची प्रचंड उत्सुकता तेव्हापासूनची. मग तिचा फोटो असाच कधीतरी कुठेतरी पाहिला तेव्हा मात्र ग्रेसची संध्याकाळ चेहर्‍यावर उतरल्यासारखे भाव आणि २८ युगांची वेदना साठवणारे ते डोळे बघून जे काही वाटलं त्यात 'सुंदर आहे' हा विचार अजिबातच नव्हता. आणि तिथून पुढे अनेक वर्ष हे मत काही बदललं नाही.

गुलमोहर: 

इंडोनेशियन भाषेवर असलेली गीर्वाणवाणीची (संस्कृतची) अभिमानास्पद छाप

Submitted by sudhirkale42 on 1 May, 2011 - 07:52

इंडोनेशियन भाषेवर असलेली गीर्वाणवाणीची (संस्कृतची) अभिमानास्पद छाप

गुलमोहर: 

संस्कॄतीची हीन पातळी....

Submitted by किश्या on 29 April, 2011 - 09:16

आपली भारतीय संस्कॄती खुप वर्षांपासुन आहे जवळपास ५००० वर्षांपासुन. आपण आपल्या संस्कॄतीचा अभीमान बाळगतो की आपल्यासारखी संस्कॄती जगात कुठेही नाही. आणि खरच आपली संस्कॄती खुप छान आहे. सणवार, नाते संबंध आपल्या संस्कॄती सारखे कुठेच आढळणार नाहीत. पण आज कालच्या जगात ह्या आपल्या या अभिमानास्पद संस्कॄतीलासुद्धा पाश्चिमात्य संस्कॄतीची नजर लागली आहे, आपण सर्व लोक त्या संस्कॄतीच्या मागे धावत आहोत याचे प्रत्यक्ष उदाहरण मी काल रात्री माझ्या रुममेटच्या मोबाईल वर पाहिले. तो हीन व किळसवाणा प्रकार पाहून मला खरच आपल्या तरुण पिढीची लाज वाटली आणि ताणही आला .

त्याच झालं अस की :

गुलमोहर: 

"भारतीय - कसा मी? असा मी" प्रकरण पहिले-भाग ४ (अंतिम) - "परिचय: प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती"

Submitted by sudhirkale42 on 29 April, 2011 - 06:49

"भारतीय - कसा मी? असा मी"
प्रकरण पहिले-भाग ४ - "परिचय: प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती"
मूळ लेखक: श्री. पवनकुमार वर्मा अनुवाद: सुधीर काळे
© सुधीर काळे (मूळ लेखकाच्या वतीने)
या लेखातील सर्व मतें मूळ लेखकाची आहेत.

गुलमोहर: 

अहं ब्रह्मास्मि - एक विलक्षण कवी

Submitted by असो on 27 April, 2011 - 21:54

नेटवर साधारण चारेक वर्षांपूर्वी आलो तेव्हा काव्यांजली नावाच्या कम्युनिटीशी संबंध आला. यापूर्वी कविता आणि माझं काही सख्य नव्हतच. उलट कुणी कवी आहे म्हणून ओळख करून दिली कि पोटातच गोळा यायचा.

पण कुठलाच टाईमपास होत नसल्यानं मग मी ही कविता लिहायला लागलो. वाचू लागलो. माझ्यामुळं अनेकांच्या पोटात गोळा येऊ लागला.

एक दिवस अहं ब्रह्मास्मि या आयडीने माझं लक्ष वेधून घेतलं. सहजच त्यांची कविता वाचून पाहीली आणि अक्षरशः वेडा झालो.

ऊर्ध्व-गमन

एकांताच्या पाटीवरली...
मौन-अक्ष्ररे स्वचछ उमटली..
नित्य गिरवता..
मिळुनी गेली..
भलत्या,सलत्या,
मनास छळत्या,
प्रश्नांचि उत्तरे.
थांबुन गेला..

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - लेख