आधुनिक मुद्राराक्षसाचा 'बाप'
'लिथोग्राफी' हे छपाईचे तंत्र शोधून काढून छपाई सर्व-सामान्याना परवडण्या
जोगी करणार्या आलॉयेस सेनेफेलडेरचा आज स्मृतिदिन. ज्याच्या मुळे हे
वृत्तपत्र आपण आज वाचू शकतो त्या सेनेफेलडेर च्या स्मरणार्थ
जगभरात 'मुद्रण दिन' म्हणून साजरा केला जातो.
आजच आपल छपाई तंत्र न खूपच विकसित आहे. गुळगुळीत कागदावर सुंदर छापलेली
पुस्तके वाचण्याच सुख आपण अनुभवतो. रंगीत पोस्टर्स,नकाशे या सारख्या आकर्षक
छापिल गोष्टी सर्रास वापरतो. सुंदर व सुबक छपाई हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य
घटक झालेला आहे. या सार्याच श्रेय जात आलॉयेस सेनेफेलडेर या आधुनिक
मुद्रणकलेच्या जनकाला.