आधुनिक मुद्राराक्षसाचा 'बाप'

Submitted by उमेश वैद्य on 9 March, 2011 - 10:55

'लिथोग्राफी' हे छपाईचे तंत्र शोधून काढून छपाई सर्व-सामान्याना परवडण्या
जोगी करणार्‍या आलॉयेस सेनेफेलडेरचा आज स्मृतिदिन. ज्याच्या मुळे हे
वृत्तपत्र आपण आज वाचू शकतो त्या सेनेफेलडेर च्या स्मरणार्थ
जगभरात 'मुद्रण दिन' म्हणून साजरा केला जातो.

आजच आपल छपाई तंत्र न खूपच विकसित आहे. गुळगुळीत कागदावर सुंदर छापलेली
पुस्तके वाचण्याच सुख आपण अनुभवतो. रंगीत पोस्टर्स,नकाशे या सारख्या आकर्षक
छापिल गोष्टी सर्रास वापरतो. सुंदर व सुबक छपाई हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य
घटक झालेला आहे. या सार्‍याच श्रेय जात आलॉयेस सेनेफेलडेर या आधुनिक
मुद्रणकलेच्या जनकाला.

एका रंगभूमी वरील कलाकराच्या पोटी ६ नोवेंबेर १७७१ ला आलॉयेस सेनेफेलडेर
जन्माला आला. वडिल नट असल्यामुळे आणि लहानपणापासून त्या वातावरणात
वाढल्यामुळे नाटक, अभिनय, साहित्याची त्याला आवड निर्माण झाली. तो उत्तम
अभिनेतही झाला असता पण आपल्या मुलांपैकी कोणीही नट होऊ नये असे वडिलांचे
मत होते म्हणून त्यानी त्याला कायद्याच्या अभ्यासासाठी प्रवृत्त केल. मग सेनेफेलडेर
कायद्याचा अभ्यास करू लागला. जात्याच हुशार असल्यामुळे त्याला शिष्यवृत्तीही मिळाली.
१७९१ मध्ये त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. आई आणि ८ भावंडाच्या पालन पोषणाची
जबाबदारी येऊन पडली त्यामुळे कायद्याचे शिक्षण अर्धवट सोडाव लागल.
रंगभूमीवरच आपल नशीब आजमवायच अस ठरवून तो नाटक लिहु लागला.
लिहिलेली नाटके, एकांकिका प्रकाशित करायला त्याला प्रकाशक, मुद्रक मिळेना.
त्या काळी मुद्रण खूप महाग होते, सगळी प्रक्रियाच अत्यंत जिकीरीची होती.
शेवटी स्वतःच हे काम कराव अस त्यान ठरवल आणि प्रयोग करायला सुरवात केली.
तांब्याच्या पृष्ठभागावर छपाईचे प्रयोग करू लागला. सुरवातीला अपयश आल. त्याच्या
लक्षात आल की या कामासाठी चुनखडीच्या सपाट दगडाचा पसरट भाग वापरणे शक्य
आहे.
पाणी अजिबात शोषून न घेणारे पदार्थ (उदा. ग्रीस,साबण,मेण) वापरुन चूंनखडीच्या
पृष्ठभागावर थर दिला. तो पृष्ठभाग पाण्याने धुतला. मेणाचा थर न दिलेल्या प्लेटच्या
भागाने पाणी शोषून घेतले.त्या नंतर प्लेटवर शाई लावली. मेंणाच्या भागावर शाई
चिकटली पण थर न दिलेल्या भागावर शाई चिकटली नाही. अशा तयार झालेल्या
प्लेट वर कागद दाबून त्यावरील मजकूर अथवा चित्रांच्या अनेक प्रती
काढणे शक्य झाले आणि 'लिथोग्राफी' चा जन्म झाला.
हळू हळू प्रयोगातून सुधारणा करून छपाईची अचूक पद्धत त्याने शोधून काढली.
या पद्धतीला तो 'दगडाची छपाई' किवा 'रासायनिक छपाई' म्हणे.
पुढे या छपाईस फ्रेंच नाव 'लिथोग्राफी' रूढ झाले. १८३७नंतर लिथोग्राफीचा उत्तरोत्तर
विकास होत गेला. वेगवेगळ्या प्लेटस् च्या सहाय्याने छपाईत सर्व रंगछटाचा वापर होऊ
लागला आणि खर्या अर्थाने रंगीत छपाईस सुरूवात झाली. पुस्तके, वृत्तपत्रे, नकाशे
इत्यादी छापण्यासाठी लिथोग्राफीचा उपयोग होऊ लागला.

हे तंत्रद्यान विकसित करतांना सेनेफेलडेर ला अनेक अडचणींना, त्यात आर्थिक अडचण
महत्वाची, तोंड द्यावे लागले. बरोबरीने समाजाची हेटाळणी होतीच. तरीदेखील चिकाटीने
त्याने आपले प्रयोग सुरुच ठेवले. सेनेफेलडेर ने विकसित केलेल्या लोथोग्राफीचा पुढे
सर्वदूर विकास व प्रसार झाला ते पाहण्याचे भाग्य त्याला लाभले. त्याने आत्मचरित्र
लिहिले त्यात तो म्हणतो, "मी शोधून काढलेले हे तंत्र न मानव जातीला एक वरदान
ठरो परंतु त्याचा उपयोग कोणत्याही वाईट कारणासाठी होऊ नये".

त्याच्या मृत्यूनंतर त्याला अनेक मान-सन्मान मिळाले. बेव्हेरियाच्या राजाने सेनेफेलडेर
चा गौरव करून त्याचा पुतळा उभारला. ज्या चुनखडी दगडाच्या पाट्यावर त्याने आपले
पहिले प्रयोग केले त्या पाट्या त्याच्या पुतळ्या जवळ ठेवण्यात आल्या. १८९४ साली
बर्लिन मधील एका चौकाला त्याचे नाव देण्यात आले. इतरही अनेक सन्मान त्याला
मिळाले.

लिथोग्राफी चे तंत्र न आर्ट आणि वर्तमानपत्रांच्या छपाई च्या कामात पायाभूत ठरले.
छपाईचा प्रसार, छपाई परवडण्या जोगी होण्यात सेनेफेलडेर चे खूप मोठे योगदान आहे.
२६ फेब्रुवारी १८३४ ला वयाच्या ६२व्या वर्षी त्याला मृत्यू आला. या घटनेला
आज १७७ वर्षे झाली. आजही त्याच्या शोधाचे महत्व अबाधित आहे. त्याचास्मृतिदिन
जगभर 'मुद्रणदिन' म्हणून साजरा केला जातो. अशा या आधुनिक मुद्रणकलेच्या
'बापाला' शतषः प्रणाम.

गुलमोहर: 

सुरेख माहिती.

तेव्हापासून टप्याटप्याने तंत्र कसं बदलत गेलं, आजचे तंत्र काय आहे आणि भविष्यातील तंत्र कशापध्दतीचे असेल याबद्दलही लिहिलत तर असा एकत्रित लेख परीपूर्ण होईल असे वाटते.