लेख

बिनधास्त "ड्रिंक अँड ड्राईव्ह"..... जादुगार है ना....!!!!!

Submitted by भुंगा on 25 January, 2011 - 21:19

इतके महिने यावर लिहायचं होतं, पण नेमका प्रजासत्ताक दिनाच्या सकाळीच वेळ मिळावा हा योग सुदैवी की दुर्दैवी कल्पना नाही....

साधारण ३ महिन्यापुर्वीची गोष्ट. रात्री २.३० वाजता माझा मोबाईल खणखणला. झोपेतून खडबडून उठलो बघतो तर एका खास मित्राचा नंबर. कॉल उचलला तर पलिकडून भेदरलेला आवाज. "अरे, एक प्रॉब्लेम झालाय. मी रात्री फॅमिलेबरोबर येत असताना मला "ड्रिंक अँड ड्राईव्ह" अंडर पकडलय. गाडी पण जप्त केलिये. १.३० वाजल्यापासून इथेच होतो. आता फॅमिलीला घरी पाठवलय आणि मी पण जातोय घरी." मी अवाक.

गुलमोहर: 

भलताच क्लायमॅक्स आणि नाटक

Submitted by विनायक_पंडित on 25 January, 2011 - 11:00

भलताच क्लायमॅक्स माझ्या आयुष्यात आला! माझी आई आता काही दिवसांचीच सोबती आहे हा विचार गिधाडासारखा माझ्या मानगुटीवर स्वार झाला.माझं काय? आईवरच्या जबाबदार्‍या आता माझ्यावर आल्या, त्या कशा निभावू? अनेक ताण ठाण मांडून बसले.मी काय काय करणार होतो? माझ्या हातात किती गोष्टी आहेत? मी स्वत:विषयीच्या अवाजवी सहानुभूतीमधे गुंतवून घेऊ लागलोय स्वत:ला? अनेक विचार तेव्हा आणि नंतर कितीतरी काळ माझ्या मनाचा कब्जा घेऊन बसले.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

स्वरभास्कराचा अस्त...

Submitted by आनंदयात्री on 25 January, 2011 - 06:20

काल पंडितजी गेले...
१० वर्षांपूर्वी पु.ल. गेले तेव्हा आत काहीतरी हललं होतं... काल exactly तेच feeling होतं... दिवसभर ofc च्या गडबडीत असल्यामुळे खूप इच्छा असूनही कलाश्रीवर जाता आलं नाही. त्यामुळे माझ्या एका पंडितजींच्या अत्यंत निस्सिम भक्त असलेल्या मित्राला फोन केला. तो फोनवर रडतच होता.. परवाच एका छोट्या मैफलीत भेटला तेव्हा तो म्हणाला होता की मला पाच रागांच्या नावाने पाच अत्तराचे frangrance तयार करायचे आहेत.. पंडितजींच्या सगळ्या दुर्मिळ रेकॉर्ड्स त्याच्याकडे आहेत.. इतकं वेड्यासारखं प्रेम करणार्‍या त्याच्यासारख्याची ही अशी अवस्था पाहून माझ्या आतलं हललेलं अजूनच खोल खोल जाऊ लागलं होतं.

गुलमोहर: 

राष्ट्रभाषा??

Submitted by मुरारी on 25 January, 2011 - 01:31

काल हापिसात आमच्या ग्रुप मध्ये आपली राष्ट्रभाषा कुठली यावरून वाद चालला होता
लहानपणापासून शाळेत आपल्याला हिंदी हि आपली राष्ट्रभाषा आहे असे बिंबवले गेले होते
आत्ता पर्यंत पण माझे हेच मत होते, पण जेव्हा गुगलून पहिले तेव्हा धक्कादायक माहिती बघण्यात आली

भारतीय कायदा आणि घटनेत कुठेही हिंदी हि आपली राष्ट्रभाषा आहे असे म्हटलेले नाही

कायद्यात अशी नोंद मात्र आढळली

गुलमोहर: 

स्वरसूर्य मौनस्थ जाहला

Submitted by kaljayee on 25 January, 2011 - 01:11

स्वरसूर्य मौनस्थ जाहला
भीमसेन जोशी गेले. पण जातांना त्यांच्या कंठातली अमृतमयी स्वर संजीवनी समस्तांना देऊन गेले. गेली साठ वर्षं हा स्वरमेघ वर्षत होता, अविरत, ज्यात सचैल न्हाऊन निघत होते देशोदेशीचे स्वर-भूकेले रसिक, टिपत होते रंध्रारंध्रात ते चांदणस्वर अधीर, आतूर होऊन. हे आता पुन्हा होणे नाही. स्वर-पंढरीचा हा वारकरी आता त्याच्या माहेरी गेला आहे, कायमचा.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

स्वरभास्करास श्रद्धांजली

Submitted by pkarandikar50 on 24 January, 2011 - 08:01

स्वरभास्कर कै. पं. भीमसेन जोशींना कर्नाटक राज्य शासनातर्फे 'कर्नाटक-रत्न' पुरस्कार अर्पण करण्याचा छोटेखानी समारंभ पंडीतजींच्या पुण्याच्या राहत्या घरी पार पडला, कारण पंडीतजींच्या प्रकृती- अस्वास्थ्यामुळे तो कार्यक्रम बेंगळुरुला सोडाच परंतु पुण्यातल्याही एखाद्द्या सभागृहात साजरा करणं शक्य नव्हतं. त्याप्रसंगी उपस्थित राहण्याचं भाग्य मला लाभलं होतं. व्हील-चेयरवर बसूनच पंडीतजींनी पुरस्कार स्वीकारला आणि त्यांनी कानडीतून आपल्या भावना अगदी थोडक्या शब्दात व्यक्त केल्या कारण बोलण्याचे श्रमही त्यांना सोसत नव्हते.

गुलमोहर: 

लेखनसीमा

Submitted by निशदे on 23 January, 2011 - 22:21

लेखनशक्ती ही मानवाला उगाच दिलेल्या अनेक निरुपयोगी शक्तींपैकी एक आहे असे माझे मत आहे. आता मी म्हणजे कोणी जगन्मान्य कर्तृत्ववान व्यक्ती नसल्याने माझ्या मताला देखील काही किंमत नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. पण माझ्या एका (स्वघोषित) सहस्त्रबुद्धे आजोबांच्या शिकवणीनुसार " (लोकांचे कितीही डोके उठले तरीही) माझे मतप्रदर्शन मी करणारच " या उक्तीवर माझा गाढ विश्वास असल्याने मी बोलणारच. आणि शिवाय लेखनाचे फायदे किती यावर लेखनप्रेमी मंडळी कायमच बोलत असतात. तर लेखनाचे तोटे किती यावर आमच्यासारखी लेखनद्वेष्टी मंडळी कधी बोलणार ?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

शबद गुरबानी

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 23 January, 2011 - 07:50

काही वर्षांपूर्वी एका पंजाबी स्नेह्यांच्या घरी झालेल्या कार्यक्रमात मी 'मेहरावालेया साइयां रक्खी चरनां दे कोल' हे मला तेव्हा येत असलेले एकमेव पंजाबी भक्तिगीत गायले अन् त्या स्नेह्यांनी खूश होऊन लगेच त्यांच्याकडील उत्तमोत्तम पंजाबी गीतांची कॅसेटच मला भेट म्हणून दिली! शिवाय त्यांच्याकडे असलेले एक पुस्तकही चाळायला दिले. पंजाबी भाषेतील गाण्यांशी माझा तो पहिलाच परिचय! त्या अगोदर हिंदी चित्रपटांच्या काही गाण्यांमधून या भाषेची गोडी जाणवली होती. पण आता ती गाणी नियमित ऐकू लागल्यावर त्यांच्यातील रसमाधुर्य अजूनच आल्हाद देऊ लागले.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - लेख