लेख

अमेरी़केचा इतिहास ४०० नाही ४००० वर्षापेक्षा जुना आहे

Submitted by बकासूर on 23 January, 2011 - 07:35

परवा कुठेतरी माबोवरच चर्चा चालु होती, बर्‍याच लोकांच असं मत आहे की अमेरिकेचा इतिहास जेमतेम ४०० वर्शाचा आहे. हा इतिहास खरा इतिहास नाही.

हे बघा माया लोकांचं अंकगणित.

220px-Maya.svg_.png
हे उत्खणनात सापडलेल्य बर्‍याच पुराव्या पैकी एक, किती सोपी पद्धत होती बघातर.

टिपः वाद नको म्हणून आधिच देतो.
(माया लोकांनी शुन्याचा शोध लावला होता पण आपल्यासारखा वापरलेला दिसत नाही. म्हणुन आर्थभट्टाचा शुन्याचा शोध अबाधित राहतो.)

माया संस्कृती:

गुलमोहर: 

चायना पोस्ट-सात

Submitted by शर्मिला फडके on 23 January, 2011 - 07:21

चीनच्या निसर्गात भौगोलिक परिस्थितीनुसार आश्चर्यकारक विविधता आहे पण तिथल्या नैसर्गिक, समृद्ध पर्यावरणासमोर कायमच कोणत्या ना कोणत्यातरी मानवनिर्मित अथवा नैसर्गिक आव्हानांचं संकट उभं ठाकलेलं असतं. शतकानुशतकं या संकटांशी सामना करताना चीनमधल्या नैसर्गिक पर्यावरणामधे कधी मुलभूत बदल होत गेले, कधी निसर्गाने हार पत्करली आणि बरेचदा तीव्र, उलटा वार करत यशस्वी प्रतिकारही केला.

गुलमोहर: 

'बोगस' डॉक्टर; 'फेक' औषधे

Submitted by शरद on 22 January, 2011 - 04:48

१९ जानेवारीच्या महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्तीची हेडलाईन. 'बोगस' डॉक्टर; 'फेक' औषधे. पुढे लिहिलंय 'मटा विशेष'. त्याच्याही पुढे एक बॉक्समध्ये लिहिलंय - 'आरोग्यावर 'आघात''

हे वाचून काय वाटते? आत अशी खळबळजनक बातमी असणार की ज्यामुळे देशाची - कमीत कमी पुणे शहराची तरी झोप उडणार. पण कुणाची झोप उडाली नाही कारण कुणी या बातमीकडे फारसे लक्ष दिले नाही. इतर वर्तमानपत्रांनी आणि प्रसारमाध्यमांनी ही बातमी हिंदकेसरी पहेलवानासारखी डोक्यावर उचलून धरली नाही! का? बातमी विश्वासार्ह नव्हती? खोटी होती?

गुलमोहर: 

"लवासा" की "ल.वा.सा."

Submitted by अवल on 21 January, 2011 - 06:23

मी कॉलेजमध्ये होते तेव्हाची गोष्ट !
आई,बाबा,ताई अन मी; आम्ही काश्मिर बघायला गेलो होतो. काश्मिरबद्दल खुप काही ऐकलं होतं, वाचलं होतं, अन मनातही त्याची काही स्वप्न होती. जम्मू, श्रीनगर, पहेलगाम, गुलमर्ग आणि डक्सूम या ठिकाणी आम्ही फिरलो होतो. अन खोटं वाटेल तुम्हाला मला नाहीच आवडलं काश्मिर ! अनेक जणं याला नावं ठेवतील... म्हणतील काश्मिर काय आई, बाबा, ताई बरोबर बघायचं का... गाढवाला गुळाची चव काय ... इ. इ.

पण नंतर मी माझा नवरा अन लेक आम्ही काश्मिरला गेलो तेव्हाही हेच झालं. खरं तर मी माझा मागचा अनुभव अगदी मनापासून दूर ठेवला होता... पण याही वेळेस नाहीच आवडलं काश्मिर !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

इथेही पळवाटच...

Submitted by ठमादेवी on 18 January, 2011 - 03:01

गर्भलिंगपरीक्षण ही भारतासारख्या देशातली एक मोठी समस्या आहे. प्रतिहजारी मुलांमागे मुलींचं प्रमाण सातत्याने कमी होत असल्यानेच गेल्या काही वर्षात सरकारने पीएनडीटी कायदा कठोर केला. पण त्यात पळवाटा काढून मुलींच्या गर्भाला नाकारणारे आहेतच. कोणत्याही प्रकारे गर्भलिंगपरीक्षण करणं, मुलींचा गर्भ आहे म्हणून गर्भपात करणं आणि त्याला प्रवृत्त करणं हा गुन्हा आहे. पण लक्षात कोण घेतो?

गुलमोहर: 

दुसरा मात्र मुलगाच हवा?

Submitted by ठमादेवी on 18 January, 2011 - 02:58

आजही मुलांसाठी स्त्रियांच्या जिवाशी खेळ करायला नवरा वा नातेवाईक तयार असतात; कारण पितृसत्ताक पद्धतीचे ते पाईक! एकीकडे नवी मुंबईत ‘शक्यतो दुसरा मुलगाच हवा.. मुलगा-मुलगी दोघेही असले की कुटुंब पूर्ण होत, असं म्हणत दुसरा गर्भ पाडण्याचं प्रमाण वाढतं आहे. तर दुसरीकडे, मुलगाच होण्याची तजवीज करण्यासाठी बँकॉकला जाणा-या भारतीयांची संख्याही वाढते आहे. हे स्त्रियांच्या आग्रहामुळे चाललं आहे का?

गुलमोहर: 

हे तुमचं काही खरं नाही गड्यांनो!

Submitted by kaljayee on 17 January, 2011 - 04:02

हे तुमचं काही खरं नाही गड्यांनो!

गुलमोहर: 

चायना पोस्ट-६

Submitted by शर्मिला फडके on 16 January, 2011 - 16:20

आपल्या नेहमीच्या परिचयातली झाडं नव्या प्रदेशात विशेषतः अनोळखी परदेशात उगवलेली पाहिली की सुरुवातीला त्यांची ओळखच पटत नाही. त्यांचं रुपरंग खूप अनोखं, अपरिचित वाटतं. पानांचे रंग वेगळे असतात, फुलांचे बहर कधी जास्त गडद कधी खूप फिके असतात, फांद्यांचा विस्तार आपल्या इथे असतो त्यापेक्षा जास्त भव्य तर कधी अगदी आखुडलेला असतो. हवामान, पाणी, माती, प्रदुषणाचं प्रमाण अशा घटकांमुळे वेगवेगळ्या दूरच्या प्रदेशांतली झाडं एकाच कुलातली असली तरी वेगळ्या संस्कारांची असल्यागत वाढतात. सिक्किमला तळहाताएव्हढ्या सोनचाफ्याच्या फुलानी आमची अशीच दिशाभूल केली होती.

गुलमोहर: 

सुखनवर बहुत अच्छे - २ - साहिर लुधियानवी - मनस्मि १८ यांच्यासाठी हा लेख

Submitted by बेफ़िकीर on 13 January, 2011 - 11:22

अब आप सुनने जा रहे है...

फिल्म नौजवान का ये गीत.. जिसे संगीत दिया है.. एस डी बर्मनने...

... और गीतकार है...

.... साहिर लुधियानवी...

ठंडी हवाये... लहराके आये..

================================================

ऑल इन्डिया रेडिओला 'गीतकारांचे नांव तुम्ही सांगायलाच हवेत' हा आग्रह धरून तो मान्य करायला लावणारा, एस डी बर्मन बरोबर आयुष्यातील परमोच्च यशाचा काळ घालवल्यानंतर त्यांच्यापासून विभक्त होणारा, जगातील इतर लोकांवर निस्सीम प्रेम करणारा, अमृता प्रीतम बरोबरील प्रेमप्रकरण गाजवणारा, गुरुदत्तच्या प्यासामधील गीते रचणारा, मद्यपान आणि धूम्रपान यात आयुष्य फेकून देणारा..

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - लेख