डिस्क्लेमर -
- श्लोकांचे भाषांतर फार ढोबळ केलेले आहे. सार पोचविण्याचा प्रयत्न केलेला आहे.
- न्युमरॉलॉजीचा जो उल्लेख आलेला आहे त्याला आधार नाही. इट इज फिक्शनल.
________________________________________________________
पहाटे सहाला, गुरुद्वाराच्या बैठकीत प्रवेश करताच, चिनाबने ग्रंथसाहीबपुढे गुडघे टेकवुन, मस्तक जमिनीस आदराने टेकवुन प्रणाम केला. आणलेले ५-१० डॉलर दानपेटीत टाकून ती शांतपणे स्त्रियांच्या बाजूस जाउन स्थानापन्न झाली. हा तिचा दर गुरुवारचा नेम असे. इतक्या पहाटेदेखील काही भाविक जमलेले होते. पहाटेच्या शांततेत बाबाजींचा धीरगंभीर आवाज घुमत होता -
श्रावण (जुलै/ऑगस्ट)
भाद्रपद (ऑगस्ट/सप्टेंबर)
भाद्रपदानंतर येतो अश्विन महीना. भाद्रपदात सुरु झालेली थंडी आता जोर धरु लागलेली आहे. उकाडा व दमटपणापासून जरा सुटका मिळते आहे. गुलाबी थंडी जाणावते आहे. हवा शीतल व आल्हाददायक होते आहे. आठव्या पौरीमध्ये अर्जनदास काय म्हणतात ते पाहू यात. -
चैत्र (मार्च/एप्रिल)
वैशाख (एप्रिल/मे)
पुढचा महीना म्हणजे तीसरा महीना जेष्ठ. जेष्ठ म्हणजे मोठा, पहीला. नावाप्रमाणेच हा महीना मोठा असतो म्हणजे रात्री लहान असतात आणि दिवस मोठे असतात. या महीन्याचे वर्णन येते चवथ्या पौरीत -
बारह माह / गुरु अर्जन दास - (०)
दुसऱ्या पौरीमध्ये चैत्र मासाचे वर्णन येते. इथुन नववर्षाची सुरुवात झालेली आहे. हा महीना चैतन्यदायी आणि प्रसन्न आहे. त्यामुळे मन तरोताजा व उत्सुक आहे. अशा महीन्यात अर्जन दास जी म्हणतात -
शीख लोकांचे ५ वे गुरु, गुरु अर्जन देव दास यांनी लिहीलेले एक 'बारह माह' नावाचे काव्य सापडले. बारा ऋतु आणि विरहीणी म्हणजे ईश्वरापासून (शिव) वियोग झालेली आत्मारुपी वधू (जीव) अशी सांगड आढळते. हा एक पूर्वापार चालत आलेला लोकगीताचा प्रकार असून, ऋतुंचे मूडस आणि विरह ते मीलन असा वधूचा मानसिक प्रवास या गीतात रंगविलेला आहे. निसर्ग आणि अध्यात्मिक पातळीवरील प्रेम असा सुरेख संगम या पौरींमध्ये येतो. विरहाने पोळलेली नववधू शेवटी आपल्या प्रियकरास भेटल्यानंतर तिला मिळालेली असीम शांती व सुख - असे वर्णन येते.
काही वर्षांपूर्वी एका पंजाबी स्नेह्यांच्या घरी झालेल्या कार्यक्रमात मी 'मेहरावालेया साइयां रक्खी चरनां दे कोल' हे मला तेव्हा येत असलेले एकमेव पंजाबी भक्तिगीत गायले अन् त्या स्नेह्यांनी खूश होऊन लगेच त्यांच्याकडील उत्तमोत्तम पंजाबी गीतांची कॅसेटच मला भेट म्हणून दिली! शिवाय त्यांच्याकडे असलेले एक पुस्तकही चाळायला दिले. पंजाबी भाषेतील गाण्यांशी माझा तो पहिलाच परिचय! त्या अगोदर हिंदी चित्रपटांच्या काही गाण्यांमधून या भाषेची गोडी जाणवली होती. पण आता ती गाणी नियमित ऐकू लागल्यावर त्यांच्यातील रसमाधुर्य अजूनच आल्हाद देऊ लागले.
अद्भुतरस! नवल, आश्चर्य, अहोऽभाव, चमत्कृती, विस्मय यांच्या विलक्षण छटा दाखविणारा, गूढत्वाकडे प्रवास करणारा, कल्पनाशक्तीला अफाट वाव देणारा हा रस. भव्यदिव्यतेचे, आकलनाच्या पलीकडील जगताचे केवळ संकेत देऊन उर्वरित प्रतिमाचित्र पूर्ण करण्याचे काम आपल्या कल्पकतेवर सोडणारा, ज्ञातापासून अज्ञाताकडे जाताना उमटणार्या भावभावनांचा आस्वाद घेणारा हा रस.