"आईच्या गावात","माझी सटकली" तुम्हाला कळल असेल ना मी सिंघम बद्दल बोलते आहे ते मस्त वाटल ना चित्रपट बघून
छान वाटल तो गुंड मार खाताना बघून...अन्याय वर न्यायाचा विजय बघून३ तास छान गेले ना... मस्त सगळ छान ३ तासात सगळे खुश
का हो मनात विचार आला का? कोणीतरी सिंघम पाहिजे आपल्यला मध्ये???
जर आला असेल तर तुम्ही नक्कीच साधारण माणूस aahat COMMON मन,ज्याला शिवाजी जन्माला यावा अस वाटत पण शेजारच्या घरात
माझ्या घरात नको ती ब्याद .... असे आपण सगळे मुर्दाड माणस आहोत लाज वाटायला पाहिजे आपल्याला..
तिथे तो आपला बाप उपोषणं बसतो आणि आपण घरात रगडतो आहे..
एक दिवस ८ ते ९ वाजता Light बंद ठेवायला सांगितली ती पण नको ठेवायला ....Serial चा episode जाईल ना...
अरे आपल्याला काहीतरी लाज वाटायला पाहिजे काहीच नाही करत pakage वाढल नाही म्हणून रडतो ,महागाई वाढली कि शिव्या देतो,त्रागा करतो, बायको वर चिडचिड,नवऱ्याशी भांडण,सासू सासऱ्याचा अपमान बस अश्या मूर्खसारख्या गोष्टी करतो.Frustation,मनोविकार असले रोग बाळगून घेतो.
हे करण्या पेक्षा या अण्णाना support करा.आपण खारीचा वाट तरी उचलुया. At least एका दिवसाचा तरी उपास करा..जेवढी मदत करता येईल तेवढी करा.
साधे नियमापासून सुरवात करा
१) रस्ता हा Zebra Crossing वरूनच ओलांडा
२) प्लास्टिक ची कुठलेही वस्तू फेकायची असेल तर कचरा पेटीत टाका
३) सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान टाळा
४) कचरा मोकळ्या जागेत टाकताना विचार करा
५) रहदारीचे नियम पालन करा
६) आपले सरकारी काम करताना कोणी लाच मागत असेल तर त्याचा Photo किवा Video Clip काढा.
नुसती फालतू, शिव्या, बडबड, चीडचीड करण्या पेक्षा शक्ती चांगल्या ठिकाणी लावा.
मी स्वत: वरचे नियम पाळण्याचा प्रयन्त करते, मनाला खूप छान वाटत.
चला मिळून हे राष्ट्र बनवूया.
"गलत क्या है ये पता होने से फायदा नहीं,अगर गलत को सही कर दो तो कोई बात है "
सिंघम नक्कीच येईल.. एक नायक जरूर मिळेल
आणि कोणी नाही आल तरी आपण आहोतच...
अगदी अगदी. आपण स्वतःपासून
अगदी अगदी. आपण स्वतःपासून सुरुवात करूया. अणुमात्र तरी अण्णा बनण्याचा प्रयत्न करूया. आपली पणती कितीही छोटी का असेना, तिने थोडासा तरी अंधःकार दूर होईलच. अंधःकाराने दिवा विझवला आहे असं कधी घडलं नाही,कधी घडत नसतं.
छोटी हे लिखाण तुम्ही दोन वेळा
छोटी हे लिखाण तुम्ही दोन वेळा का टाकलयं,अर्धे प्रतिसाद दुसर्या पानावर गेले.:(
खरच.. कळतय पण किती लोकाना
खरच.. कळतय पण किती लोकाना वळेल ह एक प्रश्णच आहे.. असो.. स्वतः पासुन तरी सुरुवात करावी..
मी शक्यतोवर आणि शक्य ते नि
मी शक्यतोवर आणि शक्य ते नि नियम पाळतो. पण बघणा-यांच्या नजरेत मात्र 'काय वेडा आहे!' असे भाव बघतो. तरीही बरं वाटतं. मा़झं बघून एक व्यक्ती जरी बदलली तरी माझा विजय आहे.