लगबगीने ती चालू लागली, अचानक समोर तळं बघून ती स्तब्ध झाली. दोन क्षणं तिने त्या तळ्याकडे पाहिले, तिची नजर पोचेल तिथपर्यंत पाणीच पाणी होते. तिने कडेकडेने चालायला सुरुवात केली, पण कुठेच बाहेर पडायचा मार्ग दिसत नव्हता. खूप दूर पर्यंत चालून पण तिला ते पाणी पार करायचा मार्ग दिसेना. एक क्षण थांबून तिने मागे फिरायचे ठरवले आणि ती मागे वळली. थोडं अंतर मागे चालून आल्यावर तिच्या मनात आले की असं हरून कसं चालेल? काहीतरी पर्याय असेलच, आपण तो शोधलाच पाहिजे. जिद्दीने ती वळली आणि परत त्या तळ्यापाशी आली, तिने एक रस्ता निश्चित केला आणि न थकता ती त्या रस्त्यावरून चालू लागली. बराच वेळ चालल्या नंतर तिला त्या तळ्यापलीकडची जमीन दिसली, तिचा उत्साह वाढला, ती अधिक जोमाने चालू लागली आणि अखेर ती तिला हव्या असलेल्या रस्त्यावर पोचली.........
ओट्याशी उभी राहून मुंगीची ही लगबग, मुंगीला पडलेला पेच, त्यातून बाहेर पडण्याचा तिचा निर्धार, तिने घेतलेले कष्ट आणि त्याचा परिणाम पहाणा-या मुग्धाला अतिशय गंमत वाटली.
एका थेंबापलीकडे जाण्यासाठी मुंगीने किती विचार केला, कसे निर्णय घेतले. एका क्षणी हरून ती मागे फिरली आणि परत निर्धाराने संकटाला भिडली आणि त्या संकटातून बाहेर पडली.
मुग्धाच्या मनात आले की आपलेही आयुष्य या मुंगीसारखे एका खोल तळ्याच्या समोर येऊन उभे ठाकलेले आहे. निराश होऊन मागे फिरायचे की निर्धाराने पुढे चालायचे? कोणाला माहित, मुंगीला सापडला तसा आपल्यालाही मार्ग सापडेल..आपल्यालाही या तळ्याचा थांग लागेल, आपणही आपल्या संकटातून बाहेर पडू?
मुंगीच्या समोरचा थेंब हा आपल्या दृष्टीने अगदीच क्षुल्लक होता पण तिला मात्र ते तिच्यावर ओढवलेलं महान संकट होत आणि त्यातून बाहेर पडायचेच हा निर्धारच तिला त्या संकटातून बाहेर घेऊन आला.....
आपणही प्रयत्न करायला काय हरकत आहे? कुठे ना कुठेतरी मार्ग सापडतोच ना? आणि सापडेलच....संकट काय तशीच रहातात काय? कधीतरी ते संपतच...आणि नवीन संकट येत...हरकत नाही...प्रत्येक संकटाकडे मुंगीसमोरच्या थेंबासारख पाहिल तर त्या संकटाशी लढायची हिंमत तर मिळेल...
ग्रेट, ग्रेट.....सिंपली
ग्रेट, ग्रेट.....सिंपली ग्रेट..........
आवडलं ! बरंच काही सांगुन
आवडलं ! बरंच काही सांगुन जातंय.
अगदि बरोबर्....आयुष्य कस जगाव
अगदि बरोबर्....आयुष्य कस जगाव हे एक साध्या उदाहरणातुन सांगितलय्...छान ...
खूप सुंदर -याला आपण द्योतक
खूप सुंदर -याला आपण द्योतक कथा म्हणूया का?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिमच
अरे वा! लिहायला लागलीस तर
अरे वा! लिहायला लागलीस तर इकडेपण
वेलकम
मस्त लिहित्येस, लिखते रहो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद! माझ्या मनांत खूप
धन्यवाद! माझ्या मनांत खूप दिवस हे घोळत होतं, वाचणा-याला आवडेल याची खात्री नव्हती. उत्साह वाढला आहे.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/22363 माझी ही कविताही एकदा नजरेखालून घाला अशी विनंती! जव्ळपास समान आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शुभेच्छा!
-'बेफिकीर'!