खाज

खाज

Submitted by thasaa on 22 August, 2011 - 23:14

"काय??? तु ब्लॉग लिहीतोस?" असं मित्राने किंचाळत विचारलं आणि कारण नसतांना मला अपराधी वाटायला लागलं. "हे ब्लॉगिंग, लिहिणं-बिहिणं सगळं बेकार आहे रे. टाईम वेस्ट. त्यापेक्षा तू शेअर ट्रेडिंग का नाही सुरु करत? किंवा एखादा साईड बिझनेस वगैरे कर. बघ राव, आता आपण ३९-४० चे आहोत. अजून १० वर्षात कमवून घे काय कमवायचं ते. नंतर तुझ्या हॉबीस पूर्ण कर ना. प्रॉब्लेम काय आहे?"

प्रॉब्लेम काय आहे!!!

च्यामारी प्रॉब्लेम हा आहे कि मी भरपूर वाचतो. प्रॉब्लेम हा आहे कि सर्व काही मला आत्ताच करायचंय. प्रॉब्लेम हा आहे कि उद्याचा भरवसा नाहीये, लाईफची ग्यारंटी नाहीये. आणि मुख्य म्हणजे, मला काहीतरी सांगायची खाज आहे.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - खाज