जगजीत सिंग - श्रद्धांजली

Submitted by बेफ़िकीर on 10 October, 2011 - 02:15

गझलगायकांपैकी जगजीतसिंग हे माझ्या यादीत खरे तर पंकज उधास व गुलाम अली यांच्यानंतर तिसर्‍या क्रमांकावर होते. पण तरीही हा लेख लिहावासा वाटत आहे कारण गझल गायकीला त्यांनी एक वेगळी पातळी नक्कीच दिली.

खरे तर जाडा भरडा आवाज असूनही काही वेळा तो सॉफ्ट व्हायचा आणि गझलेतील काफियाचे सौंदर्य खुलवण्याची विलक्षण हातोटी या गायकाकडे होती.

अमीर मीनाईच्या 'सरकती जाये है रुखसे नकाब आहिस्ता आहिस्ता' या गझलेमुळे जगजीत सिंग यांना मोठीच प्रसिद्धी मिळाली.

इन्शा ( इब्ने इंशा - एक उर्दू शायर) यांच्या 'कल चौदहवी की रात थी, शबभर रहा चर्चा तेरा' या गझलेला जगजीत सिंग यांनी अत्यंत वेगळ्या प्रकारे पेश केले. हीच गझल गुलाम अली यांनीही गायली आहे व अशाच 'एकच गझल दोन भिन्न प्रकृतीच्या गझलगायकांनी गाणे' या प्रकारामुळे दोघांमधील जातकुळीचा खरा फरक समजतो. इन्शा यांची ती गझल ज्या मूडमध्ये आहे त्याच मूडमध्ये जगजीत सिंग यांनी पेश केली. वास्तविकपणे ती गझल साधारण दर्जाचीच आहे. पण ते शेर सादर करताना जणू स्वतः इन्शाजीच सादर करत असावेत असे वाटणे हे जगजीत सिंग यांचे यशच! असा प्रकार फक्त किशोर कुमार करू शकायचे. (देव आनंद, धर्मेंद्र, नवीन निश्चल, संजीव कुमार, राजेश खन्ना आणि अमिताभ यांना आपण भिन्न भिन्न प्रकारचा आवाज दिला पाहिजे याबाबत किशोर कुमार प्रयत्नशील असायचे हे सगळे जाणतातच.) जगजीत सिंग कधीही आवाज बदलू शकले नाहीत मात्र अनेक गझलांच्या मूडप्रमाणे त्यांनी त्या गझला सादर केल्या. (गझलेला एक प्रकृती असते हे अगदी गैरमुसल्सल गझलेबाबतही मान्य व्हावे.) 'कल चौदहवी की रात' या गझलेच्या मक्त्यात 'इन्शा तेरा' असे काफिया रदीफ आहेत, मला जेव्हा माहीत नव्हते की इन्शा हे शायर आहेत तेव्हा 'इन्शा म्हणजे काय' याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. नंतर समजल्यावर मक्त्याची फारच मजा आली.

जगजीत सिंग यांनी नवीन शायरांच्या गझलांना स्थान अधिक दिले. जाँ निसार आणि कतील शिफाई यांच्या गझला त्यांच्या आवाजात ऐकायला मिळतात. असे असले तरी महाकवी गालिब यांची 'हजारो ख्वाहिशे'
ही गझल त्यांनी पेश केलीच! त्या गझलेला मात प्रवृत्तीनुसार नीटसा न्याय मिळाला नाही असे वाटते.

चित्रपटात त्यांनी अनेक गझला गायल्या. तुमको देखा, तुम इतना जो, तसेच सरफरोशमधील सुंदर गझलही!

'हुजूर आपका भी एहतराम करता चलू', ' इतना ना मुझसे प्यार करो, मै नशे मे हूं' या त्यांच्या गझला सुश्राव्य तर आहेतच पण लाईव्ह कन्सर्टमध्ये त्या डोक्यावरही घेतल्या गेल्या.

जगजीत सिंग हे एक 'पॉलिश्ड' गायक होते. पॉलिश्ड या शब्दाचा येथे अभिप्रेत असलेला अर्थ त्यांचा वावर!

जगजीत सिंग यांनी गायलेली 'तुम नही, गम नही, शराब नही' ही गझल उत्कृष्ट गझल गायकीचा नमुना ठरावी. त्यातील 'गाहे गाहे इसे पढा कीजे, दिलसे बेहतर कोई किताब नही' हा शेर माझा आवडता शेर!

श्रोत्यांनी फर्माईश करावी, गझल समजून त्याला उत्स्फुर्त दाद द्यावी आणि अक्षरशः नाचावे हे बहुधा या एकाच गझल गायकाबाबत झाले असावे. अर्थात, पंकज उधास यांच्या 'चांदी जैसा रंग' आणि इतर कित्येक गझलांना / गीतांना असाच अनुभव येत असला तरी 'प्रेयसी व प्रेम' ही गझलांची प्रामुख्याने निवड करणार्‍या जगजीत सिंग यांचा चॉइस श्रोत्यांना नेहमीच अधिक दर्जेदार वाटला यात नवल नाही. गुलाम अलींच्या उर्दूचा भरणा अधिक असलेल्या गझला आणि पंकज उधास यांनी मुलायम आवाजात केलेले मद्यपानाचे उदात्तीकरण या पार्श्वभूमीवर जगजीत सिंग यांचा खर्जातला आवाज आणि गझलांची निवड अधिक भावायची.

'किसका चेहरा' आणि 'तेरे खुषबूमे बसे खत' ही गीते ऐकून अंतर्मुख व्हायला व्हायचे यातील किमान पंचवीस टक्के तरी यश गायकाचे आहेच असे म्हणावे लागेल, उरलेले आशयाचे!

श्रोत्यांनी त्यांची अनेक पंजाबी गीतेही अक्षरशः डोक्यावर घेतली.

त्यांचे हमिंग किशोर कुमार यांच्या हमिंगच्या खालोखाल किंवा जवळपास तसेच ठरावे. गळ्यातून सर्वात खालच्या पट्टीतला सूर काढण्याचे त्यांचे कसब (पुन्हा एकदा) 'कल चौदहवी की रात थी' या गझलेत दिसून येते.

विक्रमी खप झालेल्या त्यांच्या अनेक सीडीज सर्वांकडे असतातच!

विशेषतः एकटे असताना गाडीत त्यांची एखादी गंभीर गझलांची सीडी लावली तर माणूस पूर्णपणे वेगळ्याच मनस्थितीत जाऊ शकतो.

अशा या महान गझल गायकाला, ज्याच्या गझलगायकीमुळे एक प्रचंड मोठा श्रोतावर्ग पुन्हा एकदा गझलेकडे वळला, सर्वांतफे विनम्र श्रद्धांजली, त्यांनीच गायलेल्या दोन द्विपदींमध्ये!

तुम चले जाओगे... तो सोचेंगे
हमने क्या खोया, हमने क्या पाया

बेदर्द सुननी है तो चल, कहता है क्या अच्छी गझल
आशिक तेरा, रुसवा तेरा, शायर तेरा, 'इन्शां' तेरा

==============================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

तुम चले जाओगे... तो सोचेंगे
हमने क्या खोया, हमने क्या पाया >> खरंच....

विशेषतः एकटे असताना गाडीतअथवा त्यांची एखादी गंभीर गझलांची सीडी लावली तर माणूस पूर्णपणे वेगळ्याच मनस्थितीत जाऊ शकतो. >> अत्यंतीक सहमत.... ( कोणत्याही शांत जागी)

जगजीत सिंग यांना भावपुर्ण श्रध्दांजली!!!

मध्यंतरी ते पुत्रवियोगाने दु:खी होते. पणं नंतर त्यांनी स्वत:ला सावरले.
उत्तम गझल गायकाला श्रध्दांजली !

सुंदर आणि तितकाच भावपूर्ण असाच लेख. धन्यवाद बेफिकीर जी. खरोखरी अगदी घरातीलच कुणीतरी कमी झाले आपल्यातून अशी भावना मनी दाटली आहे. इथे मी त्यांच्या अन्य कुठल्याही गझल गायकाशी वा शैलीशी तुलना करणार नाही, कारण तुम्हीच पुढे म्हटल्याप्रमाणे "विशेषतः एकटे असताना गाडीत त्यांची एखादी गंभीर गझलांची सीडी लावली तर माणूस पूर्णपणे वेगळ्याच मनस्थितीत जाऊ शकतो." ~ आणि मी [तसेच माझ्या मित्रांनी] हे प्रत्यक्ष अनुभवले आहे. अगदी अपघात होता होता वाचलो होतो आम्ही. मग जाणवले की हा सारा प्रताप 'जगजित'च्या जादूचा. त्यानंतर प्रवासात फक्त किशोर-लता [तलतही नको] असे ठरले होते.

एल.पी.च्या जमान्यात शौकिनांनी चित्रपट संगीताशिवाय प्रथमच वेगळे काही खरेदी केले असेल तर जगजित-चित्रा यांचा 'अनफर्गेटेबल' हा एचएमव्हीचा आल्बम.

'मिर्झा गालिब' या दूरदर्शनवरील मालिकेच्या यशाचे मोठे श्रेय जगजितसिंग यांच्याकडेच जात असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

Koyi Fariyaad Tere Dil Mein Dabi Ho Jaise
Koyi Fariyaad Tere Dil Mein Dabi Ho Jaise
Tune Aankhon Se Koyi Baat Kahi Ho Jaise
Jaagte Jaagte Ek Umr Kati Ho Jaise
Jaagte Jaagte Ek Umr Kati Ho Jaise
Jaan Baaki Baaki Hai Magar Saas Ruki Ho Jaise

Jaanta Hoon Aapko Sahare Ki Zarurat Nahin
Main Sirf Saath Dene Aaya Hoon

Har Mulaakat Pe Mehsoos Yehi Hota Hai
Har Mulaakat Pe Mehsoos Yehi Hota Hai
Mujhse Kuch Teri Nazar Pooch Rahi Ho Jaise

Raah Chalte Huve Aksar Yeh Ghumaan Hota Hai
Raah Chalte Huve Aksar Yeh Ghumaan Hota Hai
Woh Nazar Chupke Mujhe Dekh Rahi Ho Jaise
Find More lyrics at www.sweetslyrics.com
Woh Nazar Chupke Mujhe Dekh Rahi Ho Jaise

Ek Lamhe Mein Simat Aaya Hai Sadiyon Ka Safar
Ek Lamhe Mein Simat Aaya Hai Sadiyon Ka Safar
Zindagi Tej Bahut Tej Chali Ho Jaise
Zindagi Tej Bahut Tej Chali Ho Jaise

Is Tarah Pehron Tujhe Sochta Rehta Hoon Main
Is Tarah Pehron Tujhe Sochta Rahta Hoon Main
Meri Har Saas Tere Naam Likhi Ho Jaise
Meri Har Saas Tere Naam Likhi Ho Jaise

Koyi Fariyaad Tere Dil Mein Dabi Ho Jaise
Tune Aankhon Se Koyi Baat Kahi Ho Jaise
Jaagte Jaagte Ek Umr Kati Ho Jaise
Jaan Baaki Baaki Hai Magar Saas Ruki Ho Jaise

जगजित सिंग भावपुर्ण श्रद्धांजली.... त्यांच जय राधा माधव मला नेहमी वेगळया दुनियेत घेऊन जाते.
तुम चले जाओगे... तो सोचेंगे
हमने क्या खोया, हमने क्या पाया Sad

"तेरे बारे मैं जब सोचा नही था..मैं तनहा था मगर इतना नही था...
पहिल्यांदा जेव्हा हि गझल ऐकली तर ऐकतच रहिले.. माझी फेवरेट गझल आहे हि..
माझ्याकडे त्यांच्या गझलेचा मोठा संग्रह जपलेला आहे..
जगजित सिंग यांना मनःपूर्वक श्रद्धांजली...

कोई ये कैसे बतायें ... जगजीत सिंग ह्यांचा आवाज आणि गिटारवर वाजवलेले वेगवेगळे तुकडे. काळजात खोलवर रुतलेल्या सार्‍या वेदनांची, दु:खांची ह्या सुरांनीच जाणीव करुन द्यावी आणि मग हलकेच त्यावर मलमपट्टीही करावी Sad

अतिशय मुलायम आवाज आज हरपला. त्यांच्याच गझल मधला एक तुकडा

अपनी मर्झिसे कहाँ अपने सफ़र के हम है
रुख हवाओं का जिधर का है उधर के हम है
वक्त के साथ है मिट्टी का सफ़र सदियों से
किसको मालूम किस राहगुजर के हम है

जगजीत सिंग- चित्रा सिंग जोड़ी आज फुटली. मुलाच्या मृत्युने आवाज हरवलेली चित्रा सिंग आज एकटी पडली.

भावपूर्ण श्रध्धांजलि.

Pages