मन से रावण जो निकालू राम मेरे मन में है
अन्यायावर न्यायाचा, असत्यावर सत्याचा आणि पापावर पुण्याचा विजय साजरा करण्याचा दिवस म्हणजे दसरा. ह्याच दिवशी रामाने रावणाचा वध केला, ह्याच दिवशी दुर्गामातेने महिषासुराचा वध केला, ह्याच दिवशी पांडवांनी अज्ञातवास संपवून शमीच्या वृक्षावरून आपली शस्त्रास्त्रे पुन्हा हस्तगत केली. दसऱ्याच्या दिवसाचे महत्व सांगणाऱ्या ह्या आणि अशा अनेक कथा आपल्या पुराणांमध्ये आहेत. पांडवांनी अज्ञातवास संपवून युद्धाची तयारी सुरु केली म्हणूनच असेल कदाचित, पूर्वीच्या काळी युद्धाच्या मोहिमा दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरु केल्या जात होत्या. दसऱ्याच्या दिवशी आपल्या राज्याच्या सीमा विस्तारित करण्यासाठी सीमोल्लंघन होत होते.