माझ्या भाचीची चायनामध्ये (शांघायमध्ये)मंगळागौर करायची ठरल्यावर , मला आमंत्रणाचा फोन आल्यावर मी लगेच जायचे ठरविले. मला खूप exciting वाटत होतं. चायनामध्ये आणि मंगळागौर? मी ज्यांना सांगत होते त्यांना नवल वाटत होते. मंगळागौरीसाठी भट्जी पण मुंबईहून येणार होते. सगळी जय्य्त तयारी होती.शांघायच्या पुडांग एअरपोर्टवर आम्ही उतरलो. प्रचंड मोठा आणि सुंदर एअरपोर्ट बघून
नाती म्हटलं की डोळ्यासमोर येतात रक्ताची, मैत्रीची नाती. पण आपल्या आसपासच्या ज्या वास्तू असतात त्यांच्यासोबतही आपले जिव्हाळ्याचे, भावनिक नाते जोडले गेलेले असते. अशीच एक माझ्या लहानपणापासूनची माझ्या माहेरची वास्तू म्हणजे जिन्याची विहीर.
![](https://lh4.googleusercontent.com/-hnunx2jQhNo/TpHa1qw8UuI/AAAAAAAAAUE/CwCFmv2cPTg/s800/SDC13158.JPG)
==================================
महाराष्ट्रातला तो कोपरा भिजला सरींमध्ये
कधी बरसात गझलांची कधी बरसात टाळ्यांची
('नया ज्ञानोदय' या हिंदी मासिकासाठी गुलजार, 'मेरे अपने' नावाचा स्तंभ लिहितात. जानेवारी २०११ च्या अंकात त्यांनी साहिर लुधियानवी आणि जावेद अख्तर यांच्या आठवणी लिहिल्या होत्या. त्या लेखाचा मी केलेला मराठी अनुवाद - )
ही साहिरच्या अंत्ययात्रेपूर्वीची गोष्ट आहे.
मी गोष्ट 'जादू'ची सांगतोय, पण संदर्भ साहिर लुधियानवींचा आहे.
जादू आणि साहिरचं नातं मोठं विचित्र होतं. जादू हे जावेद अख्तरचं टोपणनाव. एकदम शायराना अंदाज... आख्खं खानदानच असं. बाप जाँ निसार अख्तर. मामा मजाज आणि आता सासरे कैफी आझमी.
मित्रांनो,
’प्रत्येक शेरात एक चांगला विचार, अतिशय साध्या, पण चटकन अपील होणाऱ्या शैलीत मांडल्या गेलेली, कतील शिफाई ह्यांची एक साधी-सोपी गझल अगदी अलिकडेच माझ्या वाचण्यात आली, आणि तीच मी शे(अ)रो-शायरी ह्या लेखमालेच्या १० व्या भागात आपल्याशी ’शेअर’ करतोय.
मतला असा आहे की-
वह शख़्स कि मैं जिससे मुहब्बत नही करता
हँसता है मुझे देखके नफ़रत नहीं करता
[ १) शख़्स=व्यक्ती ]
सुधीर काळे
[तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (पकिस्तानी तालिबान चळवळ-Student Movement of Pakistan-TTP) ही वेगवेगळ्या इस्लामी आतंकवादी गटांची व्यापक संघटना असून २००७च्या डिसेंबरमध्ये असे १३ गट बाइतुल्ला मेहसूद या नेत्याच्या नेतृत्वाखाली एक झाले (कांहीं बाहेरही आहेत). संघटनेचे मुख्य कार्यक्षेत्र अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेला पाकिस्तानचा "फाता"[१] हा प्रदेश आहे. या संघटनेची जाहीर उद्दिष्टें पाकिस्तान सरकारला प्रतिकार करणे, पाकिस्तानमध्ये शारि’या कायदा लागू करणे आणि एकत्र येऊन अफगाणिस्तानमधील नाटोच्या सैन्याविरुद्ध लढणे अशी आहेत. (२००९मध्ये बाइतुल्ला मेहसूद मारला गेला).
आयबीएमीची नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी स्त्री आहे (व्हर्जिनिया रोमेटी) आणि ती नॉर्थवेस्टर्नची विद्यार्थिनी आहे. य्य्य्यीईईईए!
एका सर्वेक्षणात असे दिसते की अमेरिकेतील जुन्या व फार मोठ्या कंपन्या स्त्रियांना संधी देण्याबाबत आघाडीवर आहेत - आयबीएम, ह्युलेट-पॅकार्ड, झेरॉक्स, पेप्सीको, क्राफ्ट फूड्स, ड्युपाँट या सर्व कंपन्यांच्या बॉस स्त्रिया आहेत. याउलट नवीन कंपन्या मात्र यासंदर्भात मागे आहेत. म्हणजे जुन्यांचे 'कॉर्पोरेट कल्चर' हे अधिक आधुनिक आहे असे दिसते.
don't judge me!.. खरंच मराठीत असा वाक्प्रचार प्रचलीतच नाही! का नाही? कारण कदाचित एखाद्या चांगल्या वाईट गुणावरून कुणाला judge करणे हा आपला स्थायीभावच असावा. आपल्या दैनंदिन जीवनात आपण कित्येकांना judge केलं असेल. तुकारामांनी "तोची साधू ओळखावा...देव तेथेची जाणावा" आणि समर्थांनी सुद्धा ".. तो य्येक मूर्ख " वगैरे सांगून लोकांना judge च नाही का केले?
आपल्या शोधांनी विज्ञानाचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या व दोन नोबेल पारितोषिके जिंकणाऱ्या मारी क्युरी या कर्तबगार स्त्रीचा जन्म ७ नोव्हेंबर १८६७ रोजी वॉर्सा ( पोलंड ) येथे झाला. तिचे वडील विज्ञान आणि गणित शिकवत तर आई पियानो वाजवत. मेरी क्युरीचे मुळ नाव मान्या स्क्लोडोव्ह्स्का.
पाच वर्षे नोकरी करून मान्याने आपल्या बहिणीला ब्रोन्याला शिकविले व नंतर स्वत: फ्रान्समध्ये जाऊन शिकली. त्यात अवघ्या सतराव्या वर्षी झालेल्या प्रेम- भंगामुले ती मनातून खचली होती. पण विज्ञानाच्या सुदैवाने, विज्ञानाच्या प्रेमाने तिला वाचवले.