१९६५ ते ७० दरम्यान माझा मोठा भाऊ आर्किटेक्चरच्या परीक्षा कॉलेजला न जाता बाहेरून देत होता. कुतूहलाने त्याच्या बरोबर बसून हा विषय समजून घेण्याचा मी प्रयत्न करत होतो. ह्याचे मुख्य कारण म्हणजे आज आहेत अशी वेळ वाया घालवणारी साधने तेव्हा नव्हती. १९७७ ला मी भारत सोडून बाहेर बर्याच देशातून नोकरी निमित्ताने भटकलो. विविध क्षेत्रातील व्यावसायिकांशी फोटो - व्हिडिओ मायक्रोफिल्म कामामुळे ओळख झाली होती. त्या क्षेत्रांची माहिती मिळवत गेलो. त्यात आर्किटेक्ट मंडळी जास्त होती. महत्त्वाच्या बर्याच इमारतींचे जमिनीचे मोजमाप ते इमारत पूर्ण होइस्तोवर व्हिडिओ प्रोग्रेस रिपोर्टचे काम मी केले होते.
मानवाधिकारांना वंचित झालेली बलुचिस्तानची जनता!
मूळ लेखक: श्री. मलिक सिराज अकबर, अनुवाद: सुधीर काळे, जकार्ता (sbkay@hotmail.com)
परिपूर्णता
by डॉ.सुनील अहिरराव on Tuesday, April 12, 2011 at 1:28pm
कोणतीही व्यक्ती कधीच परिपूर्ण असू शकत नाही. आपण ज्यांना ईश्वर मानतो असे लोक राम,कृष्ण,इंद्र,चंद्र,सूर्य-मग ते काव्यातले असोत,दंतकथा असोत वा इतिहास,परिपूर्ण कधीच नव्हते.त्यांच्याही हातून चुका झाल्याच होत्या. आणि त्यांच्या समोरच्या परिस्थिती,काळ आणि स्वतःच्या मानसिक जडणघडणीनुसार त्यांनी काही बरेवाईट निर्णय घेतले.तरीही आपण (बहुतांश भारतीय) त्यांना ईश्वर मानतोच ना?
शिक्षण एक घोळ - पुढील भाग. हे अनुभव माझे आहेत ह्याला अजून पुरावा मी काय देणार? जे भोगायचे होते ते भोगले, पण ते न विसरता, "शब्दरूप आले मुक्या भावनांना", हा एक प्रयत्न आहे.
काल टी ब्रेक मधील साधारण चर्चा-
मी : श्वेता, ओये अगं लक्ष कुठाय, चहा गार झाला
श्वेता : अं... हो यार, मैने कल बोला था ना, त्या सरांना भेटायला गेलो होतो
मी : धिरज च्या क्लास साठी ना?
श्वेता : हो ना, काय रेट आहेत माहितीये तुला, क्लासेसचे?
मी : अगं पण एक सांग, आता फायनल एक्झामस येतील काही महिन्यात, तू आता का कोचिंग्ज शोधते आहेस?
श्वेता : अरे यार, उसकी नाईन्थ के लिये, तो आता आठवीत आहे, मी ह्या वर्षी नाही, पुढच्या वर्षाची तयारी करते आहे
मी : ओह! अगं पण ७/८ महिन्यांआधीपासून?
श्वेता : हो मग? त्या टीचरकडे बुकींग करावं लागतं
मी : बुकींग? इथेही? ओअ गॉश!
मुलाकडे सुट्टीवर आलेल्या गुजराती काकांनी मला इंडियन तुळशीची दोन रोपे दिली, मी ती व्यवस्थित लावली. इकडची एक तुळस आधीच लावलेली होती आणि ती चांगली बहरलेली होती. पण भारतातले काही मिळाल्याचा आनंदच वेगळा.
सकाळी उठून पाहिले तर त्या चिमुकल्या रोपांची पाने कुरतडलेली दिसली. इथे चिमण्या नाहीत मग कोणी बरे कुरतडली असतील? काकांना सांगितलं तर ते म्हणाले की ती गोगलगाय खाऊन जाते...गोगलगाय....मला कशी बरे कधीच दिसली नाही? तुळशीची कुंडी काका घेऊन गेले, रोपे वाढली की आणून देतो म्हणाले कारण त्यांच घर वरच्या मजल्यावर होतं. माझ्या तुळशी त्यांच्या घरी वाढू लागल्या. मी मात्र येता जाता गोगलगाय शोधू लागले.
वेदना समजण्याची क्षमता, हा मी समज करून घेतलेला अर्थ, शब्दार्थ जाणकारांनी दुरुस्ती करावी त्यांचे स्वागत. मी किती संवेदनक्षम ( सेन्सिटीव्ह ) आहे हे आहार, विचार, संस्कार आणि परिस्थितीशी संबंधित आहे. ह्याची जाणीव मला निद्रानाशाच्या आजारातून झाली - नशीब माझे भाग १. ह्याचे शास्त्रीय कारण रक्ताचा दर्जा बदल व शरीरातील आम्लाचे प्रमाण असावे. मी कोणत्या / किती विषयांशी संवेदनक्षम असावे ह्याची प्राथमिकता बाल वयात माझे पालक ठरवतात, मग शिक्षकवर्ग त्यांच्या कुवती नुसार त्यात भर घालतात, नंतर सामाजिक परिस्थिती त्यात चढ उतार घडवते.
धर्म, समाज, जातपात ह्या लेखाचा हा पुढील भाग विचार पूर्वक नियोजन करून सनातन धर्माने घडवलेल्या समाजात घोळ घातला गेला त्याचेच दुष्परिणाम जन संख्या वाढी बरोबरीने वाढताना अनुभवतो आहोत. ते सांगण्याचा हा प्रयत्न आहे. हे माझे मत मला मिळालेल्या अनुभांनी तयार झालेले आहे.
नियम संस्काराचा हा पुढील भाग. जातपात हा प्रकार का व कसा झाला असावा ह्या शोधात हे कसे घडले असावे हा विचार मी सुरु केला, ते सांगण्याचा हा प्रयत्न मी माझ्या क्षमतेला समजून करतो आहे.
नागमुका नागमुका नागमुका नागमुका
नागमुका नागमुका नागमुका नागमुका
असं भांबावून बघू नका........ !!! हे बॅग्राऊंडचं गाणं आहे ज्यावर एकताची "सिल्क" सर्वांचं लक्ष्य वेधून घेते.... अगदी सर्वांचंच..!! पब्लिसिटीच अशी केलीये की चाणाक्ष वाचकांना आता वाटेल की, पुढच्या सीनमध्ये विद्या बालन आता "नागाचा मुका" च घेणार.....
घाबरू नका घाबरू नका घाबरू नका घाबरू नका
घाबरू नका घाबरू नका घाबरू नका घाबरू नका (नागमुकाच्याच चालीवर )