लेख

नशीब भाग - ५२

Submitted by विनायक.रानडे on 4 January, 2012 - 01:24

१९९० चा तो काळ होता. मोठ्या मुलाचे शाळेत शिक्षक वर्गाशी पटत नव्हते कारण मागील भागात घडलेला नाटकातील बक्षीस सोहळा. मी वर्तमान पत्रातून शिकवणी जाहिराती बघितल्या. त्यातल्या एका दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधला. बोलण्यावरून समजले बाई "मद्रासी" होती. तिने माझ्या मुलाच्या शाळेचे नाव विचारले, मी नाव सांगताच त्या शाळेतल्या मुलांना ती शिकवत नाही सांगून दूरध्वनी बंद केला. मी यादीतला दुसरा दूरध्वनी क्रमांक शोधला. बोलण्यावरून समजले बाई "बंगाली" होती. ह्या बाईने शाळेचे नाव, इयत्ता, कोणते विषय, विषय शिकवणार्‍या शिक्षकाचे नाव वगैरे विचारले. तिने सांगितलेले शिकवणी शुल्क ऐकून मी दूरध्वनी बंद केला.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

घार हिंडते

Submitted by नितीनचंद्र on 2 January, 2012 - 12:15

कामात गर्क असताना मोबाईल वाजला. खिशातुन फोन काढुन पाहिल तर कामगारांचा नेता परंडवालांचा फोन होता. " जरा शॉप मधे येता का ?"

परंडवालांनी येताका म्हणल्यानंतर टाळण शक्यच नव्हत. पुढची दोन मिनीट मी इमेल पुर्ण करण्यात घालवली. सकाळच्या राउंडला काही विषेश नव्हत. सध्यातरी कामगार आणि मॅनेजमेंट यांचे संबंध चांगले होते. शॉपमध्ये नक्कीच राडा नसणार. पण काय घडल म्हणुन परंडवालांनी अस अवेळी शॉपमध्ये बोलावल हा प्रश्न राहुन राहुन पडत होता.

गुलमोहर: 

माझे सहजीवन

Submitted by वैशाली अ वर्तक on 2 January, 2012 - 06:35

डिसेंबर महिना होता. मी शेवटची उरली सुरलेली आकस्मित रजा casual leave घेण्याच्या मूड मध्ये होते. सुट्टी घेतली तरी रजेचा मूड न येऊ देता सर्व कामे ऑफिसच्या वेळेवर आटपून बरेच दिवसानंतर वा महिन्यानंतर सकाळचा कामगार सभेचा कार्यक्रम लावून मी जवळच पडलेले मासिक चाळत होते. ध्वनिमुद्रीकांचा कार्यक्रम चालला होता.ध्वनिमुद्रिका चालू होती ,
दिसते मजला सुख चित्र नवे
मी संसार माझा रेखिते .

गुलमोहर: 

आणि म्हणे ... आपल्याला माणसं कळतात..!

Submitted by मिलन टोपकर on 1 January, 2012 - 10:09

आपल्याला भेटलेल्या, भेटत असलेल्या अनेक व्यक्तींबद्दल आपली काही मते तयार होतात. ही मते त्या व्यक्तीच्या वेशभूषेवरून, बोलण्यावरून आणि महत्वाचे म्हणजे त्यांच्या वागणुकीवरून तयार होतात.
मग त्यांना आपण मित्र, शत्रू किंवा चांगला, बरा, वाईट माणूस म्हणून आपल्या मनाच्या ज्या त्या कप्प्यात बंदिस्त करून टाकतो आणि त्यानुसार त्या व्यक्तीशी आपल्या प्रतिसादाच्या, वागण्याच्या पद्धती ठरवून टाकतो.
पण आयुष्य इतके, सरळ, सहज सोपे कुठे असते? कारण अचानक ... आपल्या मतांना, कल्पनांना छेद देऊन ती व्यक्ती अशी काही वागते की आपण अचंबित, आश्चर्यचकित होऊन जातो.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अण्णा-टीम निवडणूकीच्या राजकारणात 'पडणार'- बातमी

Submitted by दामोदरसुत on 31 December, 2011 - 08:54

अण्णा-टीम निवडणूकीच्या राजकारणात ’पडणार’?- बातमी
अण्णा आणि त्यांचे सहकारी यांचे खंदे समर्थक म्हणून ही बातमी वाचून आम्हाला वाटले ते असे-

गुलमोहर: 

नशीब हे शिकलो - ५१

Submitted by विनायक.रानडे on 31 December, 2011 - 06:13

माझ्या पहिल्या माझदा गाडीला अपघात झाला त्यानंतर मला गाडी मिळायला चार महिने लागले. माझी नवीन गाडी माझदा ३२३च होती, रंग आम्हा सगळ्यांनाच आवडला होता. सि मिस्ट समुद्राच्या पाण्याचा हिरवा रंग, गाडीचा आकार फार आकर्षक होता. ही गाडी घेऊन ६ महिनेच झाले असतील दुबईला पुन्हा कामा निमित्त पाहाटे जाऊन दुपारी एकला परत येत होतो. गाडीत एकटाच होतो. मी युएई सीमेच्या आत होतो. गाडीचा वेग थोडा कमी केला व एका हाताने पाण्याची बाटली पकडायचा प्रयत्न केला. ति सरकून खाली पडली म्हणून उचलायला गेलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला एकही गाडी नव्हती मी एकटा रस्त्यावर होतो.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

साने गुरुजी कथामाला (इमामवाडा शाखा) - २४ डिसेंबर २०११

Submitted by राखी.. on 28 December, 2011 - 02:00

// करी मनोरंजन जो मुलांचे / जडेल नाते प्रभुशी तयाचे //
नमस्कार,
शिर्षकावरुन तुम्हाला कळलंच असेल कि हा एक सोहळ्याचा वृतांत आहे.. वरवर पाहता तो एक वृतांतच आहे. पण आमच्यासाठी तो एक सण आहे. गेली ४२ वर्षे अव्याहत पणे हा सण आम्ही साजरा करतोय. २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर हा काळ म्हणजे आमच्यासाठी जणूकाही दिवाळीच.
साने गुरुजी कथामाला

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

हाSSहीSSहुSSहेSSहोSS ३.०

Submitted by आयडू on 26 December, 2011 - 10:06

हाSSहीSSहुSSहेSSहोSS ३.०

काही महत्वपूर्ण नोंदी / टिपा

१. गुलमोहर विभागात "काहीच्या काही लेख" नसल्यामुळे सदर काकाले (१.२) मला लेख ह्या टॅग खाली लिहावा लागत आहे!
१.२ काकाले = काहीच्या काही लेख. Happy [ हे ह्या पुढे काकाले असे वाचावे. काका ले!, का काले?, ले काका! वगैरे वाचू नये!]
२. ह्या लेखाच्या कल्पनेसाठी "पार्ले बाफ" (२.१) चे आभार! काहीच्या काही लेख आपण कधीतरी लिहावा असे मनात घोळत होतेच. अन् पार्ल्यात चालू असलेल्या चर्चेवरून मी लिहायला बसलो / हुरूप आला / तपश्चर्या फळाला आली.... वगैरे वगैरे.

गुलमोहर: 

केल्याने देशाटन - १

Submitted by kanksha on 24 December, 2011 - 07:22

"केल्याने देशाटन , पंडित मैत्री, सभेत संचार,
मनुजा, ज्ञान येतसे फार ... "
लहानपणापासून अनेकदा ऐकलेली, वाचून - ऐकून अगदी पार गुळगुळीत झालेली ओळ. पण या ओळींची सत्यता अनुभवली ती मंगलमूर्ती संस्कार केंद्राच्या 'मातृभूमी दर्शन' उपक्रमातून. फ्रान्सीस बेकन देखील म्हणतो -
"Travel in the younger sort , is a part of education ; in the elder, a part of experience ."
म्हणूनच प्रवास, त्यातही समवयस्कांच्या समूहासोबत केलेला प्रवास हा शिक्षणाचा एक भागच आहे आणि त्याचबरोबर मोठ्यांनादेखील अनुभवसमृद्ध करणारा गुरु आहे.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

बालपणीच्या गमती-जमती- 1

Submitted by मनस्वि on 24 December, 2011 - 05:33

मी एकत्र कुटुंबपद्धती असलेल्या घरात वाढले. सख्खी-चुलत मिळून आम्ही पाच भावंडे (दोन मुली, तीन मुले) एकत्र राहत होतो. प्रत्येकाचा स्वभाव निराळा. त्यातून भांडणे, वाद आणि खोड्या या उद्भवणारच! लहान भावंडांना आजीकडून full protection मिळायचे. त्यांनी कितीही खोड्या केल्या तरी आजी पाठीशी घालणार हे गृहीतच धरलेले असायचे. मग अश्या वेळेस निरनिराळे मार्ग शोधले जायचे कि जेणे करून आजीचा ओरडा हि खावा लागू नये आणि खोड्या काढणाऱ्या भावंडाला अद्दल देखील घडली पाहिजे.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - लेख