वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[४]
आपण दिलेल्या शास्त्रज्ञानात शिष्याने असे पारंगत व्हावे कि त्या शास्त्रज्ञानात त्याने आपलाच पराभव
( शिकविण्यात यशस्वी ठरल्यामुळे )करावा अशी इच्छा बाळगणारा तो खरा गुरु. हेच तत्व ’शिष्यात इच्छेत पराजयम’! या वचनात अगदी थोडक्यात सांगितले आहे.
रूपांतरः सुधीर काळे
Stratfor या नियतकालिकात George Friedman यांनी लिहिलेल्या इंग्रजी लेखाचे हे रूपांतर आहे. जास्त तपशील लेखाच्या शेवटी दिलेला आहे.
मी मराठी ?आज मी मराठी हे माझे अस्तित्वच मी विसरत चालले आहे. एक काळ आस होता कि निदान महाराष्ट्रात मला खूप मान होता माझ्याशिवाय कोणतेही काम होत नसे, शाळेत मराठी, ज्याच्या त्याच्या तोंडी मराठी भाषा , सरकारी कामात प्रत्येक ठिकाणी माझी गरज असे. हळू हळू महाराष्ट्रात इतर भाषेचे लोक वाढू लागले, त्यानुसार नवनवीन धोरणे आली, नवीन कंपन्या आल्या, प्रदेशातील कंपन्याशी संपर्क साधण्यासाठी इंग्रजी भाषा येणे अनिवार्य ठरू लागले. काही ठराविक लोकांनी इंग्रजी शाळा काढल्या. खेधाची बाब अशी कि आपल्याच मराठी माणसांनी इंग्रेजी शाळा काढण्यास प्रोसहान दिले.
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[३]
[*] याज्ञिधर्मिणि धर्मि पापे पापाः समे समाः।
लोकास्तमनुवर्तन्ते यथा राजा तथा प्रजा॥ -- आर्य चाणक्य
अर्थ - एखाद्या राज्यामधील राजा जर धर्मपालन करणारा असेल तर त्याचे प्रजाजनही धर्माचरण करतात. राजा पापी असेल तर प्रजाजनही पापी निघतात. राजा पक्षपात न करणारा असेल तर प्रजाजनही समता पाळणारे निपजतात. जसा राजा तशी त्याची प्रजा.
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[२]
हितोपदेश, पंचतंत्र, रामायण, महाभारत, भगवद्गीता, कौटिलीय अर्थशास्त्र आदी ग्रंथ ही सुभाषितांची भांडारे आहेत. त्यातूनच ही सुभाषिते आपल्यापर्यंत पोचली आहेत.
प्राजक्ताचे नाव काढताच डोळ्यासमोर येतो तो प्राजक्ताचा सडा त्याचा मंद
सुगंध. प्राजक्ताच्या फुलाच रुपडंही अगदी सुंदर, केशरी रंगाचे देठ ह्याचे
खास आकर्षण. प्राजक्त साधारण जुलै, ऑगस्टमध्ये बहरून येतो. असेच एक
प्राजक्ताचे झाड माझ्या लहानपणी माझ्या माहेरच्या अंगणात होते. पावसाला सुरुवात झाली की काही दिवसांतच हा प्राजक्त बहरून यायचा. सकाळी छोट्या
असणार्या कळ्या संध्याकाळी टपोर्या झालेल्या पाहताना मला खूप मजा
वाटायची.
’काळ आला होता पण वेळ आली नव्हती.’ हो. अगदी हेच काल आम्ही स्वत: अनुभवलं. त्याच असं झाल, वेळ साधारण ७-७.१५ ची. ऒफ़िसमधून घरी जाताना, वाटेत रिलायन्सच्या ऒफ़िसमध्ये चेक द्यायचा होता. म्हणून आम्ही नळस्टॊपला, पेट्रोलपंपासमोर, रस्त्यापलिकडे, ’मामा’ला विचारून गाडी पार्क केली. आणि नेहमी गाडीवर बसून रहाणारी मी, आज तिला पातांजलीच्या दुकानातून काही वस्तू घ्यायच्या होत्या म्हणून तिच्याबरोबर रस्ता क्रॊस करून गेले. चेक देऊन, खरेदी करून परत निघालो. तर ’लाल’ सिग्नल असल्यामुळे,
मार्कोनी की आणखी कोणी रेडिओ प्रथमत बनवला यावर कदाचित मतभेद असतील पण गेले शंबर वर्षे सुरवातीला श्रीमंतीच प्रतिक असलेला रेडिओ पुढे सर्वसामान्यांच्या सामन्य करमणुकीच साधन बनला. तर कित्येकांच्या उपजिविकेचे साधन बनला. रेडीओ कलाकार, टेक्निशियन्स, रेडिओ उत्पादन करणार्या कंपन्या, विक्री आणि सेवा देणारे व्यवसाईक या सार्यांना व्यापुन उरलेला असा हा रेडिओ.
माझ्या लहानपणी आम्ही चाळीत रहायचो. माझी बहीण माझ्या पेक्षा मोठी. माझ्या जन्माच्या नंतर कौतुकाने घरात प्रवेश करणार कोणी असेल तर तो मर्फी बनावटीचा रेडीओ.
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[१]
’भुक्कंड’ नाव ऐकायला / वाचायला सुखद वाटत नाही म्हणून कांहीजण त्या धाग्यापासून दूरच राहिले. ’भुक्कंड’च्या प्रतिसादात कांही रसिक मजकूराला भुक्कड म्हणाले. तसा त्यांना हक्कही आहे. पण त्यांचे मत त्यांच्यापुरते! पण त्यामुळे मला 'अरसिकेषु कवित्व निवेदनं ! शिरसी मा लिख मा लिख मा लिख' या संस्कृत वचनाची आठवण झाली. हे वचन ज्या सुप्रसिद्ध सुभाषितात आहे ते सुभाषित असे-
इतर कर्मफलानी यदृच्छया! विलिख तानी सहे चतुरानन!
अरसिकेषु कवित्व निवेदनं ! शिरसी मा लिख मा लिख मा लिख!
बर्याच दिवसांपासून आपण वाचत आलेलो आहोत कीं चीन जम्मू-काश्मीरला विवादित प्रदेश मानतो व तेथील आपल्या नागरिकांना व्हिसा देताना त्यांची वकिलात (Embassy/Consulate) त्या व्हिसाचा शिक्का त्यांच्या भारतीय पासपोर्टच्या पानांवर न मारता तो एका वेगळ्या कागदावर मारते.