काळ आला होता पण .. .. .... सत्य घटना.

Submitted by शोभा१ on 4 February, 2012 - 03:54

’काळ आला होता पण वेळ आली नव्हती.’ हो. अगदी हेच काल आम्ही स्वत: अनुभवलं. त्याच असं झाल, वेळ साधारण ७-७.१५ ची. ऒफ़िसमधून घरी जाताना, वाटेत रिलायन्सच्या ऒफ़िसमध्ये चेक द्यायचा होता. म्हणून आम्ही नळस्टॊपला, पेट्रोलपंपासमोर, रस्त्यापलिकडे, ’मामा’ला विचारून गाडी पार्क केली. आणि नेहमी गाडीवर बसून रहाणारी मी, आज तिला पातांजलीच्या दुकानातून काही वस्तू घ्यायच्या होत्या म्हणून तिच्याबरोबर रस्ता क्रॊस करून गेले. चेक देऊन, खरेदी करून परत निघालो. तर ’लाल’ सिग्नल असल्यामुळे,
सर्व वाहन चालक थांबलेले होते, हे पाहून मी तिला ’लवकर चल’ अशी खूण केली. ती मोबाईलवर बोलत होती. माझ्याबरोबर तीही निघाली. आम्ही अर्धा रस्ता क्रॊस केला आणि सिग्नल सुटला. आता परत मागे येणे शक्य नव्हते. म्हणून पुढे निघालो. एक रिक्षा, व एक कार जात होती त्याचवेळी माझ्यापासून १०-१२ फूटांवर असलेल्या बसला मी हात उंच करून थांबण्याची/आम्ही जात असल्याची खूण केली. आणि आता बस थांबेल म्हणून आम्ही निघालो. पण त्या ड्रायव्हरचा खूपच अपमान झाला. "दोन सामान्य स्रियांसाठी कशाला थांबायचे?" असा विचार करून तो वेग जास्त वाढवून आला. तोपर्यंत आम्ही, बसच्या समोर अर्ध्यापर्यंत गेलो होतो. आणि मी व बसच्या मध्ये फ़क्त अर्ध्या फूटाच अंतर होतं. पण ’देव तारी, त्याला कोण मारी?’ देवानेच मला बुद्धी दिली, आणि मी व ती तशाच २-४ पावलं मागे आलो. तेव्हा माझ्या आणि बसच्या मध्ये फक्त १-२ इंचाच अंतर होत. तसचं त्याचवेळी जर मागून गाड्या आल्या असत्या, तर आम्हाला धडकल्याच असत्या. पण देवाचीच कृपा. _____/\_____.

काल जर काळाबरोबर वेळही आली असती, तर…. आज ह्या पानावर मी लिहिण्य़ाऐवजी ’त्या’ पानावर तुम्ही सर्वांनी लिहील असतं. असो.
काल पहिली मोठ्ठी चूक मी केली म्हणजे, वाहन चालक थांबलेले पाहून मी निघाले. पण त्यांच्या चंचलतेकडे मी लक्षच दिल नव्हत. तसचं सिग्नलकडेही पाहिल नव्हतं.

इथे हा लेखन प्रपंच करण्याचे कारण म्हणजे, माझी तुम्हा सर्वाना कळकळीची विनंती आहे. तुम्ही कोणीही मी केलेला हा वेंधळेपणा/मूर्खपणा (जो मी कधीच करत नाही. पण काल केला.)कधीच करू नका.

म.सूचना : प्रज्ञा, आणि किंकर, हे आमच्या घरी सांगू नका. त्याना उगीच काळजी नको. प्रज्ञा तुला, मला काय झापायचं असेल, ते मोबाईलवर झाप. (((((((मी मोबाईल बंद करून ठेवेन.)))))))

गुलमोहर: 

माय गॉड.. शोभा नशीब तुझे नी आम्हा सगळ्यांचे....

आणि रस्ता ओलांडताना आपला सिग्नल हिरवा आहे हे पाहुनच ओलांडावे. गाड्यांसाठी काय सिग्नल आहे ते गाडीवाले पाहतील. Happy

आमच्याइथे कित्येकदा सगळे लालेलाल झालेले असते, लोक पण थांबलेले अस्तात आणि गाड्या पण.. सिग्नल सिस्टममध्येच प्रॉब्लेम होतो की काय कळत नाही.

आजच्या पेपरात चुकीच्या बाजुने आलेल्या दोन मोटरसायकलवाल्यांना बेस्टने ठोकले आणि एकजण वर गेला हे वाचले. मो.सा.वाल्याची चुक तर होतीच पण बेस्ट इतकी जोरात नसती तर मृत्यू घडला नसता असे पोलिसांचे मत पडले. तात्पर्य हेच की कुठल्याही गाडीवाल्याच्या चांगुलपणावर न विसंबता आपली काळजी आपली आपण घ्यावी.

तात्पर्य हेच की कुठल्याही गाडीवाल्याच्या चांगुलपणावर न विसंबता आपली काळजी आपली आपण घ्यावी.>>>>>हो ग साधने. आता नक्की घेईन. Happy

जागू, प्रिती, नक्की काळजी घेईन. Happy
प्रिती, अजून प्रज्ञाने वाचलं नाही . अत्ताच फोन येऊन गेला. मी पण काही बोलले नाही. Wink
फोनवर मी पण झापणार आहे तुला ..>>>>जरूर. (थांब जरा मोबाईल बंद करून ठेवते :डोमा:)

धन्य.................................................................................................................
आता ही एवढी टिंब पाहून त्या प्रत्येक टिंबातला मतितार्थ जाणून घ्या. नशीब त्या बसचं काही नाही झालं ते नाहीतर उगाच कुठेतरी डेंट आला असता..... Rofl

जोक्स अपार्ट, पण पुण्यातल्यांनी असं वागावं? की जिथे, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून गाड्या हाणल्या जातात... एकवेळ आम्ही मुंबईकर असे वागलो तर ठीक आहे कारण अद्याप इथेतरी नियम पाळतात माणसं.?

पण पुण्यातल्या वाहतुकीशी रोजचा थेट संबंध असूनही, इतका बेजबाबदारपणा? त्यात त्या मानेंनी घातलेला धुड्गुस अगदी कालपरवाचा. हे बसवाले जाम वैतागलेले असतात, बसला ब्रेक असतात कशासाठी हे अजून त्यांच्या पल्ली पडलेलं नसावं. त्यात तुम्ही हात दाख्वून अवलक्षण करून घेतल्यासारखे त्याला हात दाखविलात.

त्याने नक्कीच हाच विचार केला असणार की, मरुदे, कशाला ब्रेक मारून गती मंदावू?, अशीच जोरात गाडी रेटली की आपोआप एकतर मागे तरी जातील नाहीतर पुढेतरी..... हाणा मग.

तात्पर्यः निदान पुण्याततरी रस्ता ओलांडतांना, सिग्नलपेक्षा मनावरचा ताबाच महत्वाचा.... नाहीतर उगाच २-३ सेकंदासाठी आयुष्यभर रडण्याची वेळ येईल.

आमची गोष्ट आखुड, शोभांच्या पाठीत लाकूड..... Happy

त्या ड्रायव्हरचा खूपच अपमान झाला. >>>> तो बिएस्टी वाला असेल तर पादचार्यांना चिरड्ने त्याचा हक्कच आहे ग.स नाही का ते Angry , आणि हो तुमचा हात म्हणजे काय सोनियाचा हात आहे, आपला हात हा कॉमन मॅनचा हात कोण विचारतोय त्याला.
आम्ही पण भरपुर सोसलय यामुळे , आपण आपली काळजी घ्या. Happy

शोभा, वाचून काटा आला अंगावर. हे वाचून आत्ता तरी मी काहीच प्रतिक्रिया देऊ शकत नाही. पण रस्त्यावर चालताना बी सिरीयस..

शोभा.. आता पासून पॉवर ऑफ नाऊ प्रॅक्टिस कर गं बाई...
नेहमी केअरफुल असणार्‍या व्यक्तीही कधीकधी असा निष्काळजीपणा करतात.. (अनुभवावरून)
काळजी घे...

पुणे मनपाच्या बशींची (कु)प्रसिद्धी ऐकून वाटतं की कदाचित बसचालकाने ब्रेक मारले पण असतील. पण १२ फूट अंतरापेक्षा जास्त वेळ दाबून धरावे लागत असतील. Sad

काहीका असेना, काळजी घ्या.

आ.न.,
-गा.पै.

>>जोक्स अपार्ट, पण पुण्यातल्यांनी असं वागावं? की जिथे, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून गाड्या हाणल्या जातात... एकवेळ आम्ही मुंबईकर असे वागलो तर ठीक आहे कारण अद्याप इथेतरी नियम पाळतात माणसं.?

नमकहराम, गद्धार मुंबईकरा Angry
अरे आपण नियम पाळण्याच्याबाबतीत, शिस्तप्रिय म्हणून वगैरे प्रसिद्ध आहोत. आणि तूच असे बोलावेस? कुफेहेपा? फुल्या फुल्या फुल्या.

सिग्नल ग्रीन होण्याआधिच सुसाट निघणारे बघितले पुण्यात ..स्वःताच्या जिवाची पर्वा न करणारेच दुसर्‍याच्या जिवाची पर्वा करत नसावेत .
शोभा जी , आता या अनुभवावरुन ....क्रॉस करतांना काळजी घ्या

खरंच, यापूढे सगळेच काळजी घ्या..माझ्या बाबतीतपण काहिसे असेच झालेय..

पण त्या ड्रायव्हरचा खूपच अपमान झाला<< असे असेलच असे नाही, त्याचे मनातील विचार, मागच्या/पूढच्या रहदारीचं त्याचं गणित, अनूभव ई.ई. बरंच काही येत यात.. आपण सुखरूप आहात हे महत्वाचे! Happy

मुकु, रतन, साधना, जागू, प्रिती, स्मिहा, ईनमीन तीन, शांकली, प्रज्ञा, गा.पै., अथक, सेनापती, चंबू, आस, सर्वाच्या "काळजी घे" या सल्ल्याबद्दल मनापासून धन्यवाद. !.

घाबरू नका.
१. मुकु, रतन : देव तारी , त्याला कोण मारी? Happy
२. साधने,प्रिती, ईनमीन तीन, शांकली : आपल्याला एक निसर्ग गटग करायच आहे गं. Proud
३. जागू, : मला तुला आणि...श्रावणीला भेटायला यायच आहे. Lol
४. स्मिहा. : एवढं टंकलेखन केलस, म्हणजे हात चांगला झालेला दिसतोय. Light 1
५. प्रज्ञा : मला अजून 'सुनमुख' पहायच आहे म्हटल. Wink
६. वर्षू, गापै, आथक, चंबू आस. :धन्यवाद. मायबोलीला पण धन्यवाद.

<<<<शोभा, काय हे? तुम्ही लोकं मला काहिही सांगत नाही ह्याचा मला फार राग आलेला आहे? Angry Angry आणि भरपूर :राग:>>>>प्रज्ञा, राग हा वाईट,आणि इतका भरपूर तर खूपच वाईट. आता तू रागावर्(क्रोधावर्)विजय (विदिपा नव्हे :फिदी:)मिळवायला शिकल पाहिजे. Wink
अग रागवाल्यावर काय होत माहित आहे, लहान मेंदू, मोठ्या मेंदूवर आपटतो. आणि स्पंदने बाहेर पडतात. म्हणून काय करायच? डोळे मिटायचे आणि 'ओम' म्हणायच. म्हण 'ओम'. अग डोळे कोण मिटणार? Lol

<<,एकवेळ आम्ही मुंबईकर असे वागलो तर ठीक आहे कारण अद्याप इथेतरी नियम पाळतात माणसं.?
नमकहराम, गद्धार मुंबईकरा
<<<अरे आपण नियम पाळण्याच्याबाबतीत, शिस्तप्रिय म्हणून वगैरे प्रसिद्ध आहोत. आणि तूच असे बोलावेस? >>>>>अरे बालकानो, किती तो 'मी' पणा? येवढ्या गंभीर बातमीबद्दल प्रतिक्रिया देतानाही तुम्ही 'आम्ही मुंबईकर किती शिस्तप्रिय' हे दाखवण्याचा प्रयत्न करताय. Sad
अरे आधी स्वतःला शिस्त आहे का बघा. चाललेत सगळ्या मुंबईकरांच्या शिस्तीचा ठेका घ्यायला. Light 1 Light 1 Light 1

बरं झालं बुद्धी सुचली.
सगळे ड्रायव्हर बेफाम होऊन पादचार्‍यांना चिरडायला निघालेले नसतात. त्यांची पण पोरे बाळे घरी वाट पहात असतात. तुम्हाला त्याने भिती दाखवून सांगितलं, की पुनः मूर्खपणा करू नका. Wink

मी आणि माझा एक मित्र कम कलिग (मराठीच) टोकियोमधे एका चौकात रस्ता ओलांडण्यासाठी थांबलो होतो. आम्ही सिग्नल हिरवा झाल्यावर चालू लागलो, पण दोनच पावले पुढे गेल्यावर लगेच मागे आलो.
कारण आम्ही गप्पांच्या नादात पादचार्‍यांचा सिग्नल हिरवा होता तोपर्यंत थांबलो होतो आणि तो लाल झाल्यावर चालायला सुरूवात केली होती. कारण आमच्या एका बाजुला वाहनांसाठीचा सिग्नल हिरवा झाला होता.

नशिब तिकडे वाहने पुण्यातल्यासारखी दबा धरून बसत नाहीत आणि सिग्नलवर शेवटची ५ सेकंद सुरू झाली की लगेच बंदुकीच्या गोळीसारखी सुटत नाहीत.

Pages