’काळ आला होता पण वेळ आली नव्हती.’ हो. अगदी हेच काल आम्ही स्वत: अनुभवलं. त्याच असं झाल, वेळ साधारण ७-७.१५ ची. ऒफ़िसमधून घरी जाताना, वाटेत रिलायन्सच्या ऒफ़िसमध्ये चेक द्यायचा होता. म्हणून आम्ही नळस्टॊपला, पेट्रोलपंपासमोर, रस्त्यापलिकडे, ’मामा’ला विचारून गाडी पार्क केली. आणि नेहमी गाडीवर बसून रहाणारी मी, आज तिला पातांजलीच्या दुकानातून काही वस्तू घ्यायच्या होत्या म्हणून तिच्याबरोबर रस्ता क्रॊस करून गेले. चेक देऊन, खरेदी करून परत निघालो. तर ’लाल’ सिग्नल असल्यामुळे,
सर्व वाहन चालक थांबलेले होते, हे पाहून मी तिला ’लवकर चल’ अशी खूण केली. ती मोबाईलवर बोलत होती. माझ्याबरोबर तीही निघाली. आम्ही अर्धा रस्ता क्रॊस केला आणि सिग्नल सुटला. आता परत मागे येणे शक्य नव्हते. म्हणून पुढे निघालो. एक रिक्षा, व एक कार जात होती त्याचवेळी माझ्यापासून १०-१२ फूटांवर असलेल्या बसला मी हात उंच करून थांबण्याची/आम्ही जात असल्याची खूण केली. आणि आता बस थांबेल म्हणून आम्ही निघालो. पण त्या ड्रायव्हरचा खूपच अपमान झाला. "दोन सामान्य स्रियांसाठी कशाला थांबायचे?" असा विचार करून तो वेग जास्त वाढवून आला. तोपर्यंत आम्ही, बसच्या समोर अर्ध्यापर्यंत गेलो होतो. आणि मी व बसच्या मध्ये फ़क्त अर्ध्या फूटाच अंतर होतं. पण ’देव तारी, त्याला कोण मारी?’ देवानेच मला बुद्धी दिली, आणि मी व ती तशाच २-४ पावलं मागे आलो. तेव्हा माझ्या आणि बसच्या मध्ये फक्त १-२ इंचाच अंतर होत. तसचं त्याचवेळी जर मागून गाड्या आल्या असत्या, तर आम्हाला धडकल्याच असत्या. पण देवाचीच कृपा. _____/\_____.
काल जर काळाबरोबर वेळही आली असती, तर…. आज ह्या पानावर मी लिहिण्य़ाऐवजी ’त्या’ पानावर तुम्ही सर्वांनी लिहील असतं. असो.
काल पहिली मोठ्ठी चूक मी केली म्हणजे, वाहन चालक थांबलेले पाहून मी निघाले. पण त्यांच्या चंचलतेकडे मी लक्षच दिल नव्हत. तसचं सिग्नलकडेही पाहिल नव्हतं.
इथे हा लेखन प्रपंच करण्याचे कारण म्हणजे, माझी तुम्हा सर्वाना कळकळीची विनंती आहे. तुम्ही कोणीही मी केलेला हा वेंधळेपणा/मूर्खपणा (जो मी कधीच करत नाही. पण काल केला.)कधीच करू नका.
म.सूचना : प्रज्ञा, आणि किंकर, हे आमच्या घरी सांगू नका. त्याना उगीच काळजी नको. प्रज्ञा तुला, मला काय झापायचं असेल, ते मोबाईलवर झाप. (((((((मी मोबाईल बंद करून ठेवेन.)))))))
वाहने पुण्यातल्यासारखी दबा
वाहने पुण्यातल्यासारखी दबा धरून बसत नाहीत आणि सिग्नलवर शेवटची ५ सेकंद सुरू झाली की लगेच बंदुकीच्या गोळीसारखी सुटत नाहीत.>>>>>अगदी दररोज अनुभवतेय.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
भयंकर आहे, पुण्यात सगळेच
भयंकर आहे,
पुण्यात सगळेच रस्ते क्रॉस करायला कठीणच आहेत. सिग्नल नसेल किंवा बंद असेल तर बघायलाच नको. चांगलं चालता येणार्यांचीही वाट लागते. लहान मुलं आणि म्हातार्यांनी जाऊच नये.
प्लीज, पुण्याला नाव ठेवली
प्लीज, पुण्याला नाव ठेवली पाहिजेत असं नाही.
कालचीच गोष्ट. ऑफिसमधून बाईकवरुन पार्ल्यातून सायनमार्गे निघालो. एअरपोर्टच्या सिग्नलला मला हिरवा सिग्नल असतानाही उजव्या बाजूचा ४०७ थांबला म्हणून सवयीने ब्रेक मारला. माझ्या आणि ४०७ च्या समोरुन बेस्टची बस उजवीकडून सरळ निघून गेली.
निव्वळ ४०७ मुळे वाचलो.
काळजी घे शोभा.
काळजी घे शोभा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
निव्वळ ४०७ मुळे वाचलो.>>>देव
निव्वळ ४०७ मुळे वाचलो.>>>देव पावला.
म्ह.कर, नक्की. धन्यवाद. (खूप दिवसानी दिसलात. :फिदी:)
शुभे वाचलिस खरी पण असे
शुभे वाचलिस खरी पण असे बावळटपणे पुन्हा करू नकोस.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
तुझ्या या लेखाचं शिर्षक पाहून एक मिनिट विचार केला की तू त्या मानेच्या तावडीतून वगैरे वाचलीस की काय
पण लेख वाचून कळलं की असे अनेक माने अजूनही बाहेर मोकाट फिरतायत.
शुभे वाचलिस खरी पण असे
शुभे वाचलिस खरी पण असे बावळटपणे पुन्हा करू नकोस. >>>>>दक्षे, तुला शोभे, म्हणायच आहे का?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आय हेट नळस्टॉप
आय हेट नळस्टॉप![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
Pages