कामात गर्क असताना मोबाईल वाजला. खिशातुन फोन काढुन पाहिल तर कामगारांचा नेता परंडवालांचा फोन होता. " जरा शॉप मधे येता का ?"
परंडवालांनी येताका म्हणल्यानंतर टाळण शक्यच नव्हत. पुढची दोन मिनीट मी इमेल पुर्ण करण्यात घालवली. सकाळच्या राउंडला काही विषेश नव्हत. सध्यातरी कामगार आणि मॅनेजमेंट यांचे संबंध चांगले होते. शॉपमध्ये नक्कीच राडा नसणार. पण काय घडल म्हणुन परंडवालांनी अस अवेळी शॉपमध्ये बोलावल हा प्रश्न राहुन राहुन पडत होता.
एच आर डिपार्टमेंट ते शॉप हे अंतर साधारण २ मिनीट चालण्याच. मी शॉपमध्ये पोहोचलो. शॉपमध्ये शिरण्यापुर्वी खिडकीतुन अंदाज घेतला. सर्वकाही सुरळीत होत. सर्वजण आपापल्या मशीनवर काम करत होते. मग काय झाल असाव म्हणुन युनीयन लिडरला एच्.आर मॅनेजरला पुर्व कल्पना न देता शॉपमध्ये बोलवावस वाटल असाव ? त्यातुन सकाळच्या माझ्या राउंडला परंडवालांबरोबर नमस्कार झाला होता. म्हणजे युनीयन लिडरने मला सांगाव अस सकाळ पर्यंत काही नव्हत.
मी परंडवाल ज्या मशिनवर काम करायचे त्या मशिनवर पोहोचलो. परंडवाल कामात मग्न होते. मी येताच त्यांनी मशिन बंद केल आणि म्हणाले " म्हणल तर खास आहे आणि तुम्ही दुर्लक्ष केलेत तर काहीच नाही."
परंडवाल अहो कोड्यात काय बोलताय ? काय भानगड आहे ?
वर बोट दाखवत त्यांनी आठ मिटर उंचीच्या शॉपच्या छताकडे बोट दाखवत म्हणले " ती घार पहा. गेले तीन दिवस शॉप मधे आहे. शॉपचे दोन्ही दरवाजे उघडे आहेत पण बाहेर जात नाही." मी ही पहात राहिलो. इंडस्ट्रीयल शेड मध्ये घार घुसुन फिरताना माझ्या २९ वर्षांच्या अनुभवात मी प्रथमच पहात होतो. परंडवालांच तसच झाल होत.
" ही घार बाहेर नाही गेली तर अन्न पाण्यावाचुन मरणार " परंडवालांनी भुतदयेच्या भावनेने मी काही कराव अस अप्रत्यक्षपणे सुचवल.
कामगार प्रश्नावर हिरीरीने आपली बाजु लढाऊ वृत्तीने मांडणारे परंडवाल मात्र वैयक्तीक जीवनात माळकरी होते. एखाद कबुतर मांज्याला लटकत किंवा चिमणी संकटात पडते तेव्हा सामान्यांच्या जीवाची उलघाल होताना पहाणे वेगळे आणि जो पक्षी मांसभक्षी आहे. परजीवी आहे. दिसायला उग्र आहे. माणसाच्या वार्यालाही थांबत नाही अश्या पक्षासाठी मी काही कराव ही परंडवालांची भावना साधु वृत्तीची आहे इतकीच नोंद त्या क्षणाला मी घेतली आणि बघतो म्हणुन शॉप सोडल.
शॉप सोडताना एक मनात विचार आला की पक्षी मित्र संघटनेच्या लोकांना बोलवाव. पण ते येऊन काय करणार ? पतंगाच्या मांज्यात अडकलेला तो असहाय पक्षी थोडिच आहे की ज्याला सोडवायच आहे. भरारी मारायच मोठ्ठ आकाश सोडुन जाणुन बुजुन शॉप मध्ये शिरलेला तो पक्षी आहे. रस्ता चुकला असेल तर फिरुन फिरुन रस्ता शोधेल आणि जाईल बाहेर. पण तीन दिवस ?
मी माझ्या ऑफिसमध्ये आलो. इंटरनेटवर पक्षी मित्र संघटनेची वेबसाईट शोधुन काढली. आयुष्यात पक्षी ,प्राणि यांच माझ कधीच जमल नाही. पुलंच्या नारायण्,पानवाला इ कथा ऐकल्या होत्या आणि पुन्हा पुन्हा पारायण केली होती. पण पक्षांवर असलेल्या कथा चुकुनही ऐकल्या नव्हत्या. पुलंनी वर्णन केल्या प्रमाणे पक्षी हा माझा शत्रुपक्ष नव्हता आणि मित्रपक्षही नव्हता. कॉलेजमध्ये " बर्ड वॉचिंग"ला रविवारी सकाळी जाणार्या सहाध्यायांना आम्ही मित्र हसायचो. आमच्या दृष्टीने " बर्ड वॉचिंग"ला रविवारी सकाळी जाणारे सर्व अरसिक आणि असहाय प्राणी होते. चांगल्या सुंदर मुलींना सोमवार ते शनिवार कॉलेजमध्ये पाहिल्यानंतर रविवारी सकाळी भल्या पहाटे उठुन बंड गार्डनवर " बर्ड वॉचिंग" च्या नावाखाली यांना अस काय सुंदर पहायला मिळत असा आम्हाला प्रश्न पडे.
परमेश्वराची योजना हा पक्षी जगावा अशी असावी असा मी विचार केला. http://www.pakshimitra.org/ या साईटवर एक लॅड्लाईन नंबर मिळाला. या नंबरला २-४ वेळा फ़ोन लावला पण कुणी उचललाच नाही.थोड्यावेळाने मी त्याच वेबसाईटर About us वर क्लिक केल आणि मला अनेक पक्षी मित्रांचे मोबाईल नंबर दिसु लागले. यातील या संघटनेचे अध्यक्ष श्री काटदरेंना मी त्यांच्या मोबाईलवर फ़ोन लावला.
फोनवर बहुदा काटदरेसुध्दा या घटनेने अचंबित वाटले. त्यांनी या घारीला शॉप बाहेर काढण्यासाठी दोन उपाय सांगीतले. पहिला उपाय ज्या दरवाज्याच्या जवळ सध्या घार आहे त्या भागातुन लोक हलवा. दरवाज्यातुन बाहेर पडताना माणसे इजा करतील या भितीने ती घार दरवाज्याच्या बाहेर पडत नसावी. दुसरा उपाय दरवाज्याच्या बाहेर न शिजवलेले मटन टाका ते खायला घार शॉपच्या बाहेर येईल आणि तिची सुटका होईल.
याही पेक्षा महत्वाची माहिती श्री काटदरे यांनी सांगीतली ती म्हणजे घार ७-८ दिवस अन्नावाचुन जगु शकते.
मला पहिला उपाय पटत होता पण तो गेल्या दोन दिवसात आपोआप करुन झाला होता. जेवणाच्या सुट्टीच्या वेळेला दोन्ही दरवाज्याच्या जवळपास अर्धातास कोणिही नसत. अश्यावेळेला घारीने संधि का साधली नाही हा प्रश्न मला पडला होता. लोकांना घाबरुन दरवाज्याकडे जाऊन घार मागे फ़िरल्याचे कोणी सांगत नव्हते. मग काय कारण होते ते समजत नव्हते.
२८ डिसेंबर २०११ - बुधवारला मला प्रथम हे समजले. त्याच्या आधी दोन दिवस म्हणजे म्हणजे २५ डिसेंबरला जेव्हा रविवारी सुट्टीच्या दिवशी शॊपमध्ये कोणीही नसताना ही घार भक्षाचा पाठलाग करताना आत आली असावी आणि मग आतच राहिली असावी. बुधवारी मी दोन तीन वेळा चक्कर मारली पण घार अजुनही शॉप मध्येच होती.
आमच्या कॅन्टीनला मटनाचा वार शुक्रवार होता. गुरुवारी आम्लेट किंवा अंडाकरीचा वार होता. त्यामुळे आता सगळी भिस्त शुक्रवारवर होती. घार ७-८ दिवस काही न खाता पिता जगते या वाक्यावर भरवसा जेव्हा गुरवारी तिला जिवंत पाहिल्यावर पक्का झाला. गुरुवारी मी आणि परंडवालांनी निरीक्षण केले. घार थकलेली आहे असे जाणवत नव्हते.
३० डिसेंबर- शुक्रवार उजाडला. परंडवालांनी कॅन्टीनमधुन सकाळीच कच्चे मटण मागवले. शॉपच्या बाहेरच्या रस्त्यावर ते दिसेल असे ठेवायचा अवकाश, चार दिवस आठ मिटर उंचीवरुन चार मीटरच्या दरवाज्याच्या उंचीवर खाली येऊन दरवाज्याच्या बाहेर पडणे ज्या घारीला अपमानास्पद वाटत होते किंवा त्रासाचे वाटत होते ते काम क्षणार्धात करुन घार रस्त्यावर आली. रस्त्यावर ठेवलेले मटण पायात पकडुन घारीने घरचा रस्ता पकडला. हा सगळा सोहळा पहायला मी नव्हतो. परंडवालांनी ही बातमी मला फ़ोनवरुन सांगीतली. पक्षी मित्रांवर तर परंडवाल खुपच खुश झाले होते. एक साधी वाटणारी युक्ती कामी आली होती.
पुन्हा संपर्क करुन जेव्हा हा वृतांत श्री काटदरेंना सांगीतला तेव्हा त्यांनाही आनंद झाला. माझ्या मनात ज्या घारीच्या वर्तनाबद्दल शंका होत्या त्यांचे निरसन करण्याचा प्रयन्त केला पण समाधान झाले नाही.
एखाद्या अपरिचित ठिकाणी माणसाला किंवा प्राण्याला नेले तर तो आधी सुटकेचा प्रयत्न करेल किंवा नाही ? माझ्या मते माणुस किंवा कोणताही प्राणी/पक्षी हा प्रयत्न आधी करेल.सुरक्षीत जागी जाण्याचा प्रयत्न करेल. घरात घुसलेला पारवा किंवा उंदिर सुध्दा आल्या मार्गाने बाहेर जाण्याचा रस्ता जराशी सामसुम होताच लगेच शोधतो. किटक वर्गात मोडणाया कुंभारमाश्या, गांधिलमाश्या फ़ार कमी वेळात बाहेरचा रस्ता शोधतात. मग घारीला हे का जमले नसावे ? बहुदा विपरीत परिस्थीतीला कसे सामोरे जावे याचे कौशल्य जितके कावळ्यासारख्या बुध्दीमान पक्षाला असते तितके घारीला नसावे असा निष्कर्श निघतो.
श्री काटदरेंनी घारीची घ्राणेंद्रिये अतिशय प्रभावी असतात या माहितीवर शिक्कामोर्तब केले. लहानपणी घारीची किंवा कावळे, गिधाडे यांची दृष्टी प्रभावी असल्याचे ऐकले होते. लहानसा सरपटणारा प्राणी घारीला लांबुनही स्पष्ट दिसतो असे ऐकले होते. ज्या अर्थी मांस पाहुन घार खाली आली त्या अर्थी इथे घारीच्या दृष्टीपेक्षा वास घेण्याच्या शक्तीने ही माहिती घारीला पुरवली असावी असा तर्क बरोबर ठरतो.घार भुकेली सुध्दा असावी म्हणुनच लोकांची पर्वा न करता ती शॉपच्या दरवाज्याच्या बाहेर आली.
संस्कृतमधला "कामातुराणं हा श्लोक या संदर्भाने परत लिहावासा वाटतो " क्षुधातुराणं न भय न पृच्छा"
छान लिहिलं आहे..
छान लिहिलं आहे..
वेगळा अनुभव आहे.
वेगळा अनुभव आहे.
फारा दिवसांनी लिहिलत... छान
फारा दिवसांनी लिहिलत...
छान लेखन... पु.ले.शु.
वेगळी माहिती दिल्याबद्दल
वेगळी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! लेख सुंदर झाला आहे.
छान.........पक्षी निरीक्षण
छान.........पक्षी निरीक्षण आणि तर्क सरळ शब्दात चांगला परिणामकारक वाटते.....
कदाचित इतर प्राणी पक्षी
कदाचित इतर प्राणी पक्षी मनुष्यवस्तीत येतात तशी ती घार आली असणार आणि आयते अन्न मिळाल्यावर ते घेऊन पळाली असेल.
वेगळा अनुभव आहे खरा!!
वेगळा अनुभव. छान मांडलात.
वेगळा अनुभव. छान मांडलात.
मस्तच अनुभव. फारच छान
मस्तच अनुभव. फारच छान लिहिलाय.
मस्तच ...खरेच वेगळा अनुभव
मस्तच ...खरेच वेगळा अनुभव
फार क्वचित ऐकायला,पहायला आणि
फार क्वचित ऐकायला,पहायला आणि वाचायला मिळतात असे अनुभव. बरंच काही शिकता येतं, घारीला हुसकावण्याच्या धडपडीपेक्षा तीला एका पक्षीमित्राच्या भुमिकेतून पुन्हा एका मोकळ्यात सोडलंत हे जास्त आवडलं.
व्वा! मस्त लेख.
व्वा! मस्त लेख.
छान लिहीले आहे!
छान लिहीले आहे!
सुरेख!
सुरेख!
वेगळा अनुभव, चांगला मांडलाय.
वेगळा अनुभव, चांगला मांडलाय.
पुन्हा एक वेगळा अनुभव !
पुन्हा एक वेगळा अनुभव ! सुरेखच
सुंदर जमलाय लेख. आणि घटनाही
सुंदर जमलाय लेख. आणि घटनाही विलक्षण.
तुम्हि तुमच्या मनाचि कोमलता
तुम्हि तुमच्या मनाचि कोमलता दाखवलित.छान अनुभव.
वेगळाच अनुभव आणि चांगल्या
वेगळाच अनुभव आणि चांगल्या तर्हेने मांडला आहे!
गोजिरी +१ काटदरे तर ग्रेट
गोजिरी +१
काटदरे तर ग्रेट आहेतच, पण परंडवालांचेही विशेष कौतुक.
तुमच्याही मनात "पक्षीमित्र" ला बोलावण्याचा विचार आला आणि तुम्ही त्यांनी दिलेल्या कल्पक सल्ल्याचा पाठपुरावा केलात, धन्य आहात तुम्ही!!!
लिहिले तर अतिशय सुरस आहेच, पण शेवटी दिलेल्या विश्लेषणाने ह्या प्रसंगाला वैज्ञानिक, सामाजिक, तात्विक असे बरेच अर्थ मिळाले.
तुमचे लेखन नेहमीच काहीतरी नवीन अनुभव घेऊन येते. छान!
नितीनचंद्र, तुमच्या शॉपमध्ये
नितीनचंद्र,
तुमच्या शॉपमध्ये मशीनं कुठली आहेत? अधिक अचूक प्रश्न म्हणजे ती मशीनं तीव्र विद्युच्चुंबकीय क्षेत्र (इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड) सोडतात काय? अश्या क्षेत्रांमुळे कधीकधी पक्षी बावचळल्यासारखे होतात. बर्याचदा दिशाज्ञानही हरवून बसतात. शेवटी भुकेमुळे काहीतरी ओळखीचे दिसले आणि बुद्धी ताळ्यावर आली असेही असू शकते.
आपला नम्र,
-गामा पैलवान
नितीनचंद्र, तुमच्या शॉपमध्ये
नितीनचंद्र,
तुमच्या शॉपमध्ये मशीनं कुठली आहेत? अधिक अचूक प्रश्न म्हणजे ती मशीनं तीव्र विद्युच्चुंबकीय क्षेत्र (इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड) सोडतात काय? अश्या क्षेत्रांमुळे कधीकधी पक्षी बावचळल्यासारखे होतात. बर्याचदा दिशाज्ञानही हरवून बसतात. शेवटी भुकेमुळे काहीतरी ओळखीचे दिसले आणि बुद्धी ताळ्यावर आली असेही असू शकते.
आपला नम्र,
-गामा पैलवान
श्री गामा पैलवान,
आमच्या शॉप मध्ये सर्व मशिन्स ही सिनसी मशिनींग - मिलींग - टर्निंग आहेत. माझ्या मते तरी ही मशिन्स मशीनं तीव्र विद्युच्चुंबकीय क्षेत्र (इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड) सोडत नसावित.
एका वेगळ्या विचारदिशेकरीता धन्यवाद.
मला हा प्रयोग माहित आहे. कबुतर चार किलिमिटर लांब नेउन सोडले तर ते बरोबर आपल्या मुळ जागी येते. काही शात्रज्ञांनी कबुतराला दिशा कशी समजते याचे उत्तर कबुतराच्या मेंदुत असलेले दिशा ज्ञान मॅग्नेटीक फिल्ड द्वारे होते असा निष्कर्श काढला. याची पुष्टी करण्यासाठी पुन्हा त्याच कबुतराला त्याच्या शरीरात मॅग्नेट्स लाऊन पुन्हा सोडले असता मात्र कबुतर मुळ जागी येऊ शकले नाही.
गोजिरी +१ काटदरे तर ग्रेट
गोजिरी +१
काटदरे तर ग्रेट आहेतच, पण परंडवालांचेही विशेष कौतुक.
तुमच्याही मनात "पक्षीमित्र" ला बोलावण्याचा विचार आला आणि तुम्ही त्यांनी दिलेल्या कल्पक सल्ल्याचा पाठपुरावा केलात, धन्य आहात तुम्ही!!!>>>>>> +१००
खूपच वेगळ्या पद्धतीने हाताळलात तुम्ही हा प्रश्न - खरे एच. (ह्यूमॅनिटी) आर. मॅनेजर शोभताय....
मनापासून धन्यवाद.
श्री पुरंदरे, धन्यवाद !
श्री पुरंदरे,
धन्यवाद ! इतक्या कौतुकाला मी नक्कीच पात्र नाही.
नितीनचंद्र, खरोखर तुम्ही आणि
नितीनचंद्र,
खरोखर तुम्ही आणि परंडवाला यांनी चाकोरीबाहेर जाऊन हे प्रकरण धसास लावलेत. काटदरे यांचेही परिश्रम प्रशंसनीय आहेत.
असो.
मला वाटतं की विद्युच्चुंबकीय क्षेत्रांचा माणसावरही परिणाम होत असावा. मला एकदा एका तीर्थस्थानी चकवा लागला होता. तिथे भुताखेताची वस्ती असणं अशक्यच आहे. बहुधा जोरदार विद्युच्चुंबकीय क्षेत्राचा एखादा स्रोत जवळपास असावा. कदाचित असाच काही प्रकार त्या घारीच्या बाबतीत घडला असेल. हे क्षेत्र अगदी कमी जागेत अतितीव्र असू शकते. अश्या प्रकारे केंद्रित झालेल्या क्षेत्राचा प्रभाव जवळच इतरत्र जाणवत नसावा.
हा माझा केवळ तर्क आहे. मात्र तरीही मी एक गोष्ट सुचवू इच्छितो. आपण आपल्या शॉपमधल्या EMF (electro-magnetic fields) ची तपासणी करून घ्यावी. विशेषत: त्या घारीजवळच्या भागाची. कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून केलेली बरी. निदान 'हेल्थ अँड सेफ्टी'वाल्या लोकांशी बोलून तरी घ्यावे.
आ.न.,
-गा.पै.
उत्तम लिहिलय तुम्ही. मलाही
उत्तम लिहिलय तुम्ही. मलाही लहानपणचा १ प्रसंग आठवला.
आमच्या झोपायच्या खोलीत एकदा १ घुबड कावळ्यांच्या पाठलागापासून बहुधा उडत आत आलं होतं. आम्ही खिडकी उघडुन खोलीचा मुळ दरवाजा बंद केला होता जेणे करून ते घरभर फिरणार नाही. ते खूप घाबरलं होतं आणि खोलीभर उडुन शीट करत होतं.
अर्धा दिवस थांबल्यावरही ते गेलं नाही तेंव्हा आमच्या नेपाळी वॉचमनने त्याला टॉवेलात धरून बाहेर सोडलं. सोडल्याक्षणीच कावळ्यांनी परत काव्काव सुरू केली. मग ते अगदी दूर एका बाल्कनीच्या अवघड कोपर्यात रात्रीपर्यंत बसून राहीले.
आम्ही पुन्हा पुन्हा पहात होतो खिडकीतून. अखेरीस सकाळी ते दिसले नाही म्हणजे मध्यरात्री गेले असावे.
मा. गामापैलवान, आपल्या शंकेला
मा. गामापैलवान,
आपल्या शंकेला इमेलने उत्तर दिले आहे.
वेगळाच अनुभव. आमच्याकडे
वेगळाच अनुभव. आमच्याकडे रात्री लाईट गेले असताना कधी-कधी पाखरू शिरायचे अन गोल गोल घरभर घिरट्या घालायचे. बाहेरचे दार, दोन्ही खिडक्या उघड्या ठेवल्यावर सुध्दा त्याला ५-१० मिंट लागायची बाहेर जायला.
सुरेख वाटली.
सुरेख वाटली.