कला

ओरिगामी

Submitted by अवल on 23 January, 2013 - 01:32

आपल्याला माहिती, येत असलेल्या ओरिगामीच्या वस्तू इथे टाकूयात.
जमलं तर त्यांची कृती ही.
लिहून/ चित्रातून/ व्हिडिओची लिंक देऊन.
सुरुवातीला चुकून हा वाहता धागा झाला होता. त्यामुळे काहींच्या कलाकृती वाहून गेल्या, क्षमस्व __/\__ कृपया आपल्या कलाकृती टाकाल?
काहींनी मस्त लिंक्सही दिल्या होत्या, त्याही पुन्हा द्याल?
तसदीबद्दल दिलगीर !

शब्दखुणा: 

अक्रोडची समई

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 22 January, 2013 - 23:41

साहित्यः
९ अक्रोड
फेव्हीकॉल किंवा फेव्हीस्टीक
बेस साठी गोल पुठ्ठा किंवा थर्माकोल
ग्लिटर
सुरी

कृती:
चार अक्रोड अख्खेच ठेऊन पाच अक्रोड बरोबर मधून काढून घ्या. त्यातील गर सुरीने काढून वाट्या करुन घ्या. (मधला खाऊ मुलांना देऊन किंवा तुम्ही खाऊन फस्त करुन टाका :स्मित:)

विषय: 
शब्दखुणा: 

हेअर पीन क्रोशे स्टोल

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 13 January, 2013 - 23:39

हा थोडा वेगळा प्रकार. हेअर पीन वर आधी अशा शेंगा विणून घेतल्या

DSC02018.JPG

जितकी लांबी स्टोलची हवी तेवढ्या लांब केल्या.

DSC02019.JPG

मग त्या एकमेकांना जोडल्या.

DSC02022.JPG

मग सगळ्या रंगांच्या शेंगा जोडल्यावर त्याला बॉर्डर केली.

DSC02026.JPG

तयार झालेला स्टोल Happy

विषय: 
शब्दखुणा: 

फोटोग्राफी स्पर्धा

Submitted by ssaurabh2008 on 9 January, 2013 - 20:25

दर आठवड्याला एक वेगळा विषय देऊन त्यावर फोटोग्राफी स्पर्धा घेता येईल का इथे ?
त्यामुळे फोटोग्राफर्सना प्रोत्साहनही मिळेल आणि आपल्यालाही वेगवेगळ्या फोटो पाहता येतील. Happy

ज्येष्ठ सभासदांनी कृपया यावर विचार करावा.

स्कार्फ

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 5 January, 2013 - 03:17

नेटवर शोधतांना सापडलेलं डिझाईन आणि घरात असलेल्या लोकरी वापरुन केलेला स्कार्फ Happy ह्यात ४१ चेन्स घालून सुरवात केली आणि नंतर पॅटर्न घातला.

हे नेटवरचं डिझाईन

chevron-chart-fixed.jpg

हा मी केलेला स्कार्फ

DSC02009.JPG

हा क्लोज अप

विषय: 
शब्दखुणा: 

नव वर्ष

Submitted by चाऊ on 31 December, 2012 - 01:42

अखंड कालप्रवाहाच्या प्रवासात एक वर्ष सरले
आठवणी, सुख - दुखा:च्या, एवढेच मनी उरले
बरेच काही घडले, घरात, गावात आणि जगात
हुरहुर मनी, बरेच काही करायचे राहीले

वाटते सगळेच झाकोळले ह्या नव्या जगात
व्यवहार सगळा उरला, वाटे निराशा, तरीही
कृतज्ञतेने देऊ धन्यवाद त्या जगदीशाला
असंख्य कण मोदाचे जगताना सापडले

सावली संकटांची उगाच वाटते मोठी
कोसळतो वाटता, हात सावरणारेही आले
नीट मांडा जमाखर्च, असेल थोडे गमावले
तरीही पहा आठवून खूप काही मिळवले

हसुनी करुया स्वागत नव्या वर्षाच्या दिनकराचे
ठरवूया, ह्या वर्षी खूप भले चांगले करायचे
मिळूनी सगळे बनू आपण नवीन तेजोमय भास्कर

शब्दखुणा: 

नव वर्ष

Submitted by चाऊ on 31 December, 2012 - 01:42

अखंड कालप्रवाहाच्या प्रवासात एक वर्ष सरले
आठवणी, सुख - दुखा:च्या, एवढेच मनी उरले
बरेच काही घडले, घरात, गावात आणि जगात
हुरहुर मनी, बरेच काही करायचे राहीले

वाटते सगळेच झाकोळले ह्या नव्या जगात
व्यवहार सगळा उरला, वाटे निराशा, तरीही
कृतज्ञतेने देऊ धन्यवाद त्या जगदीशाला
असंख्य कण मोदाचे जगताना सापडले

सावली संकटांची उगाच वाटते मोठी
कोसळतो वाटता, हात सावरणारेही आले
नीट मांडा जमाखर्च, असेल थोडे गमावले
तरीही पहा आठवून खूप काही मिळवले

हसुनी करुया स्वागत नव्या वर्षाच्या दिनकराचे
ठरवूया, ह्या वर्षी खूप भले चांगले करायचे
मिळूनी सगळे बनू आपण नवीन तेजोमय भास्कर

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कला