शशक

सोळा आण्याच्या गोष्टी - 'भाकडकथा ' - किल्ली

Submitted by किल्ली on 4 September, 2019 - 09:05

"तिच्या डोळ्यात पावसाळी ढगांसारखे मळभ दाटले होते"
"तिच्या डोळ्यांच्या गहिऱ्या डोहात उदासीचे काळेभोर पाणी साचले होते"
"तिचे डोळे दुःखामुळे खवळलेल्या समुद्राप्रमाणे भासत होते"

“भयानक उपमा सोडून दुसरं काही लिहिता येत नाही का तुला?”

“माझ्या लिखाणातील घटना प्रत्यक्षात खरोखर घडतात. “

“काहीतरी भारी लिही, हे उदासी प्रकरण is too downmarket!”

“काय सुचावं ह्यावर माझं नियंत्रण नाहीये. अज्ञात शक्ती माझ्याकडून लिहून घेते.”

“What rubbish! कारणं नकोत. आजच fresh script लिहून झाली पाहिजे.”

धाडकन दार आपटून ती आत निघून गेली.

विषय: 
शब्दखुणा: 

सोळा आण्याच्या गोष्टी - खिडकीबाहेरचं जग! - मन्या ऽ

Submitted by मन्या ऽ on 4 September, 2019 - 07:10

खिडकीबाहेरचं जग!

ती आपले पाणीदार डोळे किलकिले करुन खिडकीबाहेरच जग बघण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती.

शाळा-ऑफिसात जाणार्यांची गडबड,रस्त्यावरची वर्दळ, फेरीवाले हे सारं तिला एकदातरी जगता यावं. असं वाटे; पण बाहेरच्या दुनियेत मात्र तीच अस्तित्व नव्हतं..

ती आजही नेहमीप्रमाणे किरणची वाट बघत होती. खरं तिला किरणच्या सहवासात स्वतःचा जीव नकोसा होई.

किरणचं तिला नको असताना उगाच जवळ घेणं, बोलतं करायचा प्रयत्न करणं.हे सारं तिला अजिबात आवडत नसे.तरी ती सहन करी.फक्त झोक्यावर बसण्यासाठी.

सोळ्या आण्याची गोष्टी - "ती " - रश्मी..

Submitted by रश्मी. on 4 September, 2019 - 05:41

वेळेवर येणे याला जमणारच नाही ! संतापाने पुटपुटत सोन्या , शंकुच्या नावाने शिमगा करत येरझारा घालत होता. त्याला कसलिशी चाहूल लागली आणी त्याने वळुन डावीकडे पाहीले. डोळे भक्कन मोठे झाले, तोंडाचा आ झाला, हातपाय थरथरु लागले . समोरुन ती तिच्याच धुंदीत चालत येत होती. उजळ वर्ण, वार्‍यावर उडणारे मऊशार केस, डौलदार चाल चेहेर्‍यावर आत्मविश्वास झळकत होता. सोन्या स्तब्ध होऊन तिला नजरेने पित होता.

काय रे? मला उशीर झाला ना ! असे म्हणत शंकु मागुन आला आणी तो पण नजर विस्फारुन त्या सौंदर्यवतीकडे बघु लागला.

विषय: 

माझं घर - शतशब्द कथा

Submitted by शब्दबम्बाळ on 21 March, 2019 - 13:22

"आये, माझं घर निबंद लिहायला लावलाय म्याडमनी! उद्यालाच द्यायचाय... सांग की काय लिहू..." परश्या वैतागलेल्या स्वरात आईला सांगत होता.
"आत्ता! मी काय सांगू? लिही की तुझं तू! परीक्षेला काय मी येनारे व्हय लिहून द्यायला!" आईने पण आवाज वाढवत उत्तर दिलं.
"मी लिहलता की मग, पन..." खाली बघत परश्या बोलला.
"पन काय मग?" आईचा प्रश्न.

विषय: 
शब्दखुणा: 

ट्युमर - शतशब्द कथा

Submitted by शब्दबम्बाळ on 18 March, 2019 - 00:21

"सगळी तयारी झाली आहे डॉक्टर, हे सिटीचे रिपोर्ट्स आणि त्यानुसार पेशंटच्या डोक्यावर मार्क पण केला आहे" डॉक्टर विनय ख्यातनाम सर्जन डॉक्टर डिसुझाना सांगत होते .
स्ट्रेचरवरती झोपवलेल्या पेशंटच्या आजूबाजूला वेगवेगळी मशिन्स ठेवलेली होती त्यातून येणारे बिप्स वातावरणात अजून थोडा ताण निर्माण करत होते.
"हम्म, ट्युमर क्रिटिकल ठिकाणी आहे, जराशी चूक पेशंटला कायमचा अधू करू शकते! अत्यंत काळजीपूर्वक आपल्याला हे ऑपरेशन करायचं आहे, लेट्स स्टार्ट" रिपोर्ट्स पुन्हा एकदा पाहात डिसुझा म्हणाले.
.
.
.

विषय: 
शब्दखुणा: 

तिहेरी शतशब्दकथा - लाडका - लाडका - लाडकी

Submitted by अंड्या on 22 September, 2013 - 06:59

लाडका

तो सर्वांचाच लाडका होता.. तीन भावांत शेंडेफळ म्हणून आईचा लाडका.. आपले नाव हाच काढणार म्हणून बापाचा लाडका.. अभ्यासात हुशार म्हणून शिक्षकांचा लाडका.. आणि मित्रांच्या ग्रूपची, बोले तर जान होता.. शांत स्वभाव आणि लाघवी बोलणे, कामानिमित्त जिथे जाईल तिथे आपली छाप पाडणारच.. ऑफिसमधल्या बॉसचाही लाडका न झाल्यास नवलच..!!

एक दिवस पुढे आलेल्या पोटावरून हात फिरवत बायको म्हणाली, इथेही आईपेक्षा बाबाच जास्त लाडके होणार वाटते.. तो फक्त हसला, तशी पुढे म्हणाली, "आता माझ्या बाबांचाही लाडका जावई होणार आहेस, नातवंड देण्यात पहिला नंबर लावला म्हणून दिवाळीला तुला बाईक घेऊन देणार आहेत.."

विषय: 

Pages

Subscribe to RSS - शशक