ट्युमर - शतशब्द कथा

Submitted by शब्दबम्बाळ on 18 March, 2019 - 00:21

"सगळी तयारी झाली आहे डॉक्टर, हे सिटीचे रिपोर्ट्स आणि त्यानुसार पेशंटच्या डोक्यावर मार्क पण केला आहे" डॉक्टर विनय ख्यातनाम सर्जन डॉक्टर डिसुझाना सांगत होते .
स्ट्रेचरवरती झोपवलेल्या पेशंटच्या आजूबाजूला वेगवेगळी मशिन्स ठेवलेली होती त्यातून येणारे बिप्स वातावरणात अजून थोडा ताण निर्माण करत होते.
"हम्म, ट्युमर क्रिटिकल ठिकाणी आहे, जराशी चूक पेशंटला कायमचा अधू करू शकते! अत्यंत काळजीपूर्वक आपल्याला हे ऑपरेशन करायचं आहे, लेट्स स्टार्ट" रिपोर्ट्स पुन्हा एकदा पाहात डिसुझा म्हणाले.
.
.
.
मार्क केलेल्या जागी कवटीला ड्रिल मारायचे काम संपले होते, ब्रेन टिश्यूजकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहत डिसुझा म्हणाले, "रिपोर्ट्सच्या जागेवर ट्युमर दिसत नाहीये"
तेवढ्यात घामाघूम झालेला वॉर्डबॉय धावतच आला! "डॉक्टर स्ट्रेचरची अदलाबदल झालीये...."

(अन्यत्र पूर्वप्रकाशित)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults