"तिच्या डोळ्यात पावसाळी ढगांसारखे मळभ दाटले होते"
"तिच्या डोळ्यांच्या गहिऱ्या डोहात उदासीचे काळेभोर पाणी साचले होते"
"तिचे डोळे दुःखामुळे खवळलेल्या समुद्राप्रमाणे भासत होते"
“भयानक उपमा सोडून दुसरं काही लिहिता येत नाही का तुला?”
“माझ्या लिखाणातील घटना प्रत्यक्षात खरोखर घडतात. “
“काहीतरी भारी लिही, हे उदासी प्रकरण is too downmarket!”
“काय सुचावं ह्यावर माझं नियंत्रण नाहीये. अज्ञात शक्ती माझ्याकडून लिहून घेते.”
“What rubbish! कारणं नकोत. आजच fresh script लिहून झाली पाहिजे.”
धाडकन दार आपटून ती आत निघून गेली.
“काहीही फेकतो हा.
ह्याने लिहिलेलं खरं झालं असतं तर चमत्कारांच्या भाकडकथा प्रत्यक्षात घडल्या असत्या.”
---------------------------------------------------------------------------------------------------------------
तिने सताड खिडकी उघडली आणि पंख फडफडवत खिडकीबाहेर झेप घेतली!
छान. बर्डवूमन आहे का ती!
छान. बर्डवूमन आहे का ती!
खरेच गूढ्कथा आहे. आवडली.
खरेच गूढ्कथा आहे. आवडली.
मस्त ! मला गुढकथा फार आवडतात.
मस्त ! मला गुढकथा फार आवडतात.
छान आहे
छान आहे
एकसे एक संवाद आहेत !
एकसे एक संवाद आहेत !
हे खास !!
'काय सुचावं ह्यावर माझं नियंत्रण नाहीये. अज्ञात शक्ती माझ्याकडून लिहून घेते'
कथा आवडली !
छान आहे
छान आहे
बरिये
बरिये
छान !
छान !
छाने
छाने
मला समजली नाही.
मला समजली नाही.
नाही आवडली.
नाही आवडली.
अज्ञात शक्ती लिहून घेते... आणि ती बर्डवूमन असणे.. जम्या नही.
मला समजली नाही. +१
मला समजली नाही. +१
मुझे भी नही कळ्या...
मुझे भी नही कळ्या...
open ended , गृहीतकांवर
open ended , गृहीतकांवर आधारित रहस्यकथा /शशक लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
बरेच interpretations काढता येतील.
तिचे Birdwoman असणे हे त्यापैकी एक , जे लिहिताना माझ्या डोक्यात नव्हतं.
आता विचार केला होता ते सांगते
(कदाचित माझा thought अधुरा/ चुकीचा असू शकतो किंवा बरोबरही असेल.)
लेखकाचा असा विश्वास आहे कि तो जे लिहितो, किंवा त्याच्याकडून जे काही लिहिलं जातं ते खरं होतं.
आज त्याच्याकडून काही फ्रेश लिहिलं जात नाहीये उदास छटा असणारी वाक्ये कागदावर/स्क्रीनवर उमटत आहेत जे अर्थातच तिच्या पसंतीस उतरत नाहीये. तिचं असं म्हणणं आहे की लिहिलेलं खरं झालं असतं तर परीकथा( ज्यांचा उल्लेख ती भाकडकथा असा करते) त्याही खऱ्या झाल्या असत्या.
कथेतील शेवटचं ट्विस्ट देणारं वाक्य 'ती ' स्वतः एक परी आहे हे सूचित करतं.
----------------------
हे interpretation वाचकापर्यंत पोचलं नाही, ह्याचा अर्थ प्रयत्त्न फसला म्हणायचा.
-----------
आपल्या प्रतिक्रियांचे आणि सूचनांचे स्वागत आहे.
धन्यवाद ॲमी, प्राची, रश्मी,
धन्यवाद ॲमी, प्राची, रश्मी, बोकलत , कुमार, आनंद., मधुरा, Mmmmm , ललिता-प्रीति, शाली, आसा, अमितव , पद्म
त्याने आधी कधी तिला पंख फुटले
त्याने आधी कधी तिला पंख फुटले वैगेरे लिहिलं होतं का?
लिहीलं असेल, तिला परी बनवल
लिहीलं असेल, तिला परी बनवल असेल
Do not underestimate the power of अज्ञात शक्ती, never!! ]
you never know!!
ती कशी रुडली बोल्ते त्यच्याशी, आधीही ओरडली असेल, मग रागात भरात त्याच्याकडून (किंवा अज्ञात शक्ती कडून ) तिच्याबद्दल परी आहे असं लिहीलं गेलं असेल.
[माझ खरं वाटत नाही ना, बघच आता, इति अज्ञात शक्ती
आपल्या प्रतिक्रियांचे आणि
आपल्या प्रतिक्रियांचे आणि सूचनांचे स्वागत आहे.>>> शशक वाचताना कॉमन सेन्स जागा झाला पाहिजे... पण या कथेत स्पेशल सेन्स ची गरज होती..
ज्यांना एकदा वाचून कळली, त्यांच्याकडे स्पेशल सेन्स आहे समजायला हरकत नाही..
धन्यवाद पद्म
धन्यवाद पद्म

पुढच्या वेळेला शशक लिहीताना कॉमन सेन्स ला ट्रीगर देण्याचा प्रयत्न करीन
अरेच्चा परी आहे होय ती मला
अरेच्चा परी आहे होय ती
मला शेवट वाचून बर्डमॅन सिनेमाचा शेवट आठवला म्हणून ती बर्डवूमन वाटली.
मला लेखक फेकू (किंवा अंधश्रद्धाळू) वाटला, ही त्याला उडवून लावतेय 'असं कुठे असतं का?' म्हणत पण ही स्वतःच 'बाहेरच्या, जादुई जगातून' आलेली आहे.
मलाही आधी कथा कळाली नव्हती.
मलाही आधी कथा कळाली नव्हती.
आतापर्यतच्या वाचलेल्या/ मुवीत बघितलेल्या पर्या फक्त गोड गोड होत्या.म्हणुन असेल कदाचित..
मलातर ती Vampire वाटली, पण
मलातर ती Vampire वाटली, पण जर ती परी असेल तर नाही आवडली कथा, कारण खाष्ट परी हे मला रुचतच नाही
धन्यवाद VB, मन्या
धन्यवाद VB, मन्या


मलातर ती Vampire वाटली>> असु शकेल, सर्व शक्यतांचा विचार करु आपण
Vampire हे assumption घेउन कथा logical होत असेल तर मला मान्य आहे, फक्त तुम्हाला ते स्पष्ट करता आले पाहिजे
का माहीती का, पण माझ्या कल्पनेतील पर्या जरा वेगळ्या आहेत ( हे वाचा https://www.maayboli.com/node/67213)

कदाचित breaking the sterotypes विचारसरणीचा प्रभाव असेल
मी कथा वाचताना जास्त विचार
मी कथा वाचताना जास्त विचार करत नाही, अन प्रतिसाद फक्त माझे मत आहे, तुमच्या मताला चुकीचे म्हणत नाहीये, फक्त मला अशी परी आवडत नाही, म्हणून जर ती परी आहे तर मला नाही आवडली , इतकेच.
म्हणून जर ती परी आहे तर मला
म्हणून जर ती परी आहे तर मला नाही आवडली , इतकेच.>> ओके
आतापर्यंत वाचलेल्या शशक मध्ये
आतापर्यंत वाचलेल्या शशक मध्ये बेस्ट
धन्यवाद साजणी
धन्यवाद साजणी
पहिल्यांदा समजली नव्हती.
पहिल्यांदा समजली नव्हती.
आता पटली नाही.
हे म्हणजे असं झालं की मी येथे शंभर शब्द लिहिणार, वाचकाने ते हवे तसे जुळवावे, हवी तशी कथा बनवावी आणि वाचावी.

हे म्हणजे असं झालं की मी येथे
हे म्हणजे असं झालं की मी येथे शंभर शब्द लिहिणार, वाचकाने ते हवे तसे जुळवावे, हवी तशी कथा बनवावी आणि वाचावी.>> ५* होटेल मधल्या चहासारखं आहे हे शाली जी
customization मिळतंय ना ?

::
Customization! कविता छानेय..
Customization!
कविता छानेय..
Pages