सोळा आण्याच्या गोष्टी - 'भाकडकथा ' - किल्ली

Submitted by किल्ली on 4 September, 2019 - 09:05

"तिच्या डोळ्यात पावसाळी ढगांसारखे मळभ दाटले होते"
"तिच्या डोळ्यांच्या गहिऱ्या डोहात उदासीचे काळेभोर पाणी साचले होते"
"तिचे डोळे दुःखामुळे खवळलेल्या समुद्राप्रमाणे भासत होते"

“भयानक उपमा सोडून दुसरं काही लिहिता येत नाही का तुला?”

“माझ्या लिखाणातील घटना प्रत्यक्षात खरोखर घडतात. “

“काहीतरी भारी लिही, हे उदासी प्रकरण is too downmarket!”

“काय सुचावं ह्यावर माझं नियंत्रण नाहीये. अज्ञात शक्ती माझ्याकडून लिहून घेते.”

“What rubbish! कारणं नकोत. आजच fresh script लिहून झाली पाहिजे.”

धाडकन दार आपटून ती आत निघून गेली.

“काहीही फेकतो हा.
ह्याने लिहिलेलं खरं झालं असतं तर चमत्कारांच्या भाकडकथा प्रत्यक्षात घडल्या असत्या.”

---------------------------------------------------------------------------------------------------------------

तिने सताड खिडकी उघडली आणि पंख फडफडवत खिडकीबाहेर झेप घेतली!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकसे एक संवाद आहेत !
'काय सुचावं ह्यावर माझं नियंत्रण नाहीये. अज्ञात शक्ती माझ्याकडून लिहून घेते' Lol हे खास !!
कथा आवडली ! Happy

छान !

छाने Happy

नाही आवडली.
अज्ञात शक्ती लिहून घेते... आणि ती बर्डवूमन असणे.. जम्या नही.

open ended , गृहीतकांवर आधारित रहस्यकथा /शशक लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
बरेच interpretations काढता येतील.
तिचे Birdwoman असणे हे त्यापैकी एक , जे लिहिताना माझ्या डोक्यात नव्हतं.

आता विचार केला होता ते सांगते
(कदाचित माझा thought अधुरा/ चुकीचा असू शकतो किंवा बरोबरही असेल.)

लेखकाचा असा विश्वास आहे कि तो जे लिहितो, किंवा त्याच्याकडून जे काही लिहिलं जातं ते खरं होतं.
आज त्याच्याकडून काही फ्रेश लिहिलं जात नाहीये उदास छटा असणारी वाक्ये कागदावर/स्क्रीनवर उमटत आहेत जे अर्थातच तिच्या पसंतीस उतरत नाहीये. तिचं असं म्हणणं आहे की लिहिलेलं खरं झालं असतं तर परीकथा( ज्यांचा उल्लेख ती भाकडकथा असा करते) त्याही खऱ्या झाल्या असत्या.
कथेतील शेवटचं ट्विस्ट देणारं वाक्य 'ती ' स्वतः एक परी आहे हे सूचित करतं.
----------------------
हे interpretation वाचकापर्यंत पोचलं नाही, ह्याचा अर्थ प्रयत्त्न फसला म्हणायचा.
-----------
आपल्या प्रतिक्रियांचे आणि सूचनांचे स्वागत आहे. Happy

लिहीलं असेल, तिला परी बनवल असेल Biggrin
you never know!!
ती कशी रुडली बोल्ते त्यच्याशी, आधीही ओरडली असेल, मग रागात भरात त्याच्याकडून (किंवा अज्ञात शक्ती कडून ) तिच्याबद्दल परी आहे असं लिहीलं गेलं असेल.
[माझ खरं वाटत नाही ना, बघच आता, इति अज्ञात शक्ती Lol Do not underestimate the power of अज्ञात शक्ती, never!! ]

आपल्या प्रतिक्रियांचे आणि सूचनांचे स्वागत आहे.>>> शशक वाचताना कॉमन सेन्स जागा झाला पाहिजे... पण या कथेत स्पेशल सेन्स ची गरज होती..
ज्यांना एकदा वाचून कळली, त्यांच्याकडे स्पेशल सेन्स आहे समजायला हरकत नाही.. Happy

धन्यवाद पद्म Happy
पुढच्या वेळेला शशक लिहीताना कॉमन सेन्स ला ट्रीगर देण्याचा प्रयत्न करीन Happy

अरेच्चा परी आहे होय ती Lol Lol मला शेवट वाचून बर्डमॅन सिनेमाचा शेवट आठवला म्हणून ती बर्डवूमन वाटली.

मला लेखक फेकू (किंवा अंधश्रद्धाळू) वाटला, ही त्याला उडवून लावतेय 'असं कुठे असतं का?' म्हणत पण ही स्वतःच 'बाहेरच्या, जादुई जगातून' आलेली आहे.

मलाही आधी कथा कळाली नव्हती.
आतापर्यतच्या वाचलेल्या/ मुवीत बघितलेल्या पर्या फक्त गोड गोड होत्या.म्हणुन असेल कदाचित.. Happy

मलातर ती Vampire वाटली, पण जर ती परी असेल तर नाही आवडली कथा, कारण खाष्ट परी हे मला रुचतच नाही

धन्यवाद VB, मन्या Happy
मलातर ती Vampire वाटली>> असु शकेल, सर्व शक्यतांचा विचार करु आपण Happy
Vampire हे assumption घेउन कथा logical होत असेल तर मला मान्य आहे, फक्त तुम्हाला ते स्पष्ट करता आले पाहिजे Proud

का माहीती का, पण माझ्या कल्पनेतील पर्‍या जरा वेगळ्या आहेत ( हे वाचा https://www.maayboli.com/node/67213) Lol
कदाचित breaking the sterotypes विचारसरणीचा प्रभाव असेल Happy

मी कथा वाचताना जास्त विचार करत नाही, अन प्रतिसाद फक्त माझे मत आहे, तुमच्या मताला चुकीचे म्हणत नाहीये, फक्त मला अशी परी आवडत नाही, म्हणून जर ती परी आहे तर मला नाही आवडली , इतकेच.

पहिल्यांदा समजली नव्हती.
आता पटली नाही.

हे म्हणजे असं झालं की मी येथे शंभर शब्द लिहिणार, वाचकाने ते हवे तसे जुळवावे, हवी तशी कथा बनवावी आणि वाचावी.
Lol

हे म्हणजे असं झालं की मी येथे शंभर शब्द लिहिणार, वाचकाने ते हवे तसे जुळवावे, हवी तशी कथा बनवावी आणि वाचावी.>> ५* होटेल मधल्या चहासारखं आहे हे शाली जी Biggrin customization मिळतंय ना ?
Proud
Light 1 ::

Pages