केळद
धुवांधार पावसातल्या लोभस घाटवाटा – मढे अन् उपांड्या घाट
धुवांधार पावसातल्या लोभस घाटवाटा – मढे अन् उपांड्या घाट
...एके दिवशी तापलेल्या मातीवर धुळीची वावटळं उमटू लागतात, पाचोळा सैरभैर उडू लागतो, काळ्या ढगांचा काळोख दाटून येतो, विजांचं तांडव सुरू होतं, मृदगंध दरवळू लागतो, अन् वळवाच्या पावसाचे टप्पोरे थेंब पडू लागतात
– टप्प-टप्प-टप्प... ताड-ताड-ताड... धों-धों-धों...
मायबोली भटक्यांचा "सह्यमेळावा"
७ वर्षापुर्वी मी जेव्हा नुकताच मायबोलीवर आलो होतो.तेव्हा मायबोलीच्या माध्यमातूनच जमलेले एक टोळके भटकंती करायला जात असत... खरे तर याबद्दल आधी माहितच नव्हते पण नंतर मायबोलीवर नुकतीच ओळख झालेल्या इंद्रधनुष्य (इंद्रा) ने या ग्रुपबद्दल सांगितले.. दुर्दैवाने मला कधी त्यांच्याबरोबर जाणे जमले नाही.. जिएस, दिनेशदा, गिरिराज, आरती इत्यादी मंडळीबरोबर भटकंती करायची राहूनच गेली..
भटक्यांचा सह्य मेळावा...
सह्य मेळावा संपन्न झालेला आहे.
*******************************************
नमस्कार मंडळी,
मुंबई, नाशिक आणि पुणेकर भटक्यांचा सह्य मेळावा शनिवार १३-जुलै-२०१३ रोजी मढे घाटात आयोजीत करण्यात आलेला आहे. सगळ्या भटक्यांनी शनिवारी रात्री नसरापूर - वेल्हे मार्गे केळदला जमायचे आहे. रात्रीचा मुक्काम केळदच्या शाळेत करायचा आहे.
दुसर्या दिवशी रविवारी १४-जुलै-२०१३ला केळद - मढे घाट - कर्णवाडी मार्गे शिवथर घळ गाठायची. दुपारचे जेवण करुन मुंबईकर महाड मार्गे परतणार आहेत. तर नाशिक आणि पुणेकर वरंधा मार्गे परतणार आहेत.