पुणे
मायबोलीकर मनीषला भेटण्यासाठी गटग
तर, मायबोलीकर मनीष पुण्यास सुट्टीनिमित्त येत आहे.
त्याला भेटण्यासाठी गटग करण्याचे आयोजिले आहे.
तरी सर्वांनी अवश्य येण्याचे करावे. धन्यवाद. कृपया. धन्यवाद.
स्नेहाधार प्रकल्पाच्या मदतीसाठी "शोध कवितेचा"
स्नेहाधार प्रकल्पाच्या मदतीसाठी "शोध कवितेचा" स्नेहालयाच्या पुणे टिम ने २८ जून रोजी आयोजित केला आहे.
देणगी प्रवेशिका रु. २५०/- फक्त.
प्रवेशिकेसाठी सम्पर्कः सचिन मदने : ९० ११०३ ३०११ (पेठ भाग)
ज्योति एकबोटे: ९० ११६३ ७२०० ( कोथरुड)
प्रदिप काका कुलकर्णी: ९८ २२४० ६६९२ ( सेनापती बापट रस्ता)
विक्रम देशमुख: ९८ ५०९३ ३६५४ ( औन्ध)
शशिकान्त सातभाई: ९८ २२०४ ९४९३ ( कर्वेनग))
अजित थदानी: ३२९१ ४७५३ ( रिटेलवेअर सॉफ्टटेक सातारा रोड - सकाळी १० ते ६)
सायकल राईड - ५
अखिल मायबोली विना पेट्रोल / डिझेल वाहन प्रसारक मंडळ घेऊन येत आहे पाचवी राईड.
याआधीच्या काही rides मुळे उत्साह द्विगुणित झालेल्या सायकलप्रेमी माबोकारांनी यावेळी पुणे - महाबळेश्वर सायकल ride चा घाट घातला आहे. इच्छुकांनी जरूर यावे.
मुलींसाठी पुण्यातील सेवाभावी संस्था/शाळा
मला काही माहिती हवी आहे, जर कोणी देऊ शकल तर त्याबद्दल आभार.
माझ्या ओळखी मध्ये एक कुटुंब आहे. त्यांनी मुलगी दत्तक घेतली होती , ज्यांनी तिला दत्तक घेतली ते नवरा आणि बायको दोघेही आता हयात नाहीत. त्या मृत व्यक्तीची बहीण सध्या या मुलीची कायदेशीर पालक आहे.
गेले दोन वर्ष ती मुलगी पुण्यातील "आपलं घर" या संस्थेमध्ये होती. या वर्षी आठवी मध्ये ती नापास झाली आहे.
तीच वागणं हट्टीपणाच आहे आणि ती संस्थेमधील लोकांना त्रास देते व त्याचं ऐकत नाही.
म्हणून संस्थेने मुलीला घेऊन जायला सांगितल आहे.
इथे कोणाला पुण्यातील इतर सामाजिक संस्था/शाळा माहीत आहेत का ज्या या मुलीला दाखल करून घेतील?
सायकल राईड - ४
सेल्फ प्रॉपेलर्स घेऊन येत आहेत आणखी एक राईड !
मागच्या राईड मध्ये ठरवल्याप्रमाणे शिरवळला जाता येईल. पण शिरवळ ते माझे घर राउंड ट्रीप १३५ किमी आहे. भर उन्हात सायकल चालवतना खूप थकवा जाणवतो हे मागच्या आठवड्यात आपण अनुभवले त्यामुळे त्याकडे ही दुर्लक्ष करता येत नाही. कमीतकमी खेड शिवापूरपर्यंत जाऊ. तिथे मावळ प्रसिद्ध कैलास भेळ आहे.
साधारण ११ च्या आत घरी परतायचेच असे ठरवून पुढे अंदाज घेऊन कुठून परतायचे ते ठरवू. रूट मध्ये कात्रज चढण आणि बोगदा आहे त्यामुळे सायकलला लाईट आवश्यक!
वेळ ५ वाजता दिली आहे. जर ५ / ५:३० वाजता सर्व निघालो तर नक्कीच पुढेही जाता येईल.
सायकल राईड - ३
अखिल मायबोली विना पेट्रोल / डिझेल वाहन प्रसारक मंडळ घेऊन येत आहे तिसरी राईड.
तर ठरवा कुठे जायचे ते.
पर्याय १. बोपदेव घाट
पर्याय २. लोनावळ्या जवळपास
साधारण ५० + किमी जाऊन येऊन करू. लोनावळ्याकडे जायला मला आणि अमितला आवडेल, पण ती राईड मग १००+ होईल. वाटल्यास अलिकडूनही वापस येता येईल.
ज्यांनी मला विचारले त्यांना रविवारच जमणार आहे. त्यामूळे रविवारी ठरवत आहे.
नक्की खोटं...
खोटं बोलतेस तू..
आठवत नाही म्हणतेस..
कँटिनमधे बसून मारलेल्या गप्पा..म्हंटलेली गाणी..वडापाव..
तासंतास उगीच अनोळखी रस्त्यांवर मारलेल्या चकरा,
ब्लू गॅलरीत बसून मांडलेला बार्बेक्यू आणि ओल्ड मंक,
ब्लॅकजॅक, ब्लफ, रमी..
माय किचन, सिंफनीमधली काराओके नाईट,
शूटस, मीटिंगस, स्वतःचा विषय सोडून अटेंड केलेली लेक्चरस,
रात्ररात्र ढग घेऊन दूर-भूर भटकणं..
अये यार धिस इज एन्डलेस,
कायच्या काई..
पागल आहेस का जरा?
नक्कीच खोटं बोलतेस तू..
आठवत नाही म्हणतेस..
आवाहन : कै. सुचेता जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काव्यस्पर्धा... (पुणे)
कविता पाठविण्यासाठी पत्ता:- अ. अ. जोशी, १२ बी, दुर्वांकूर, वृंदावन हौसिंग कॉम्प्लेक्स, कोथरूड, पुणे ४११०३८. महाराष्ट्र. ईमेल : suchetanantprakashan@gmail.com
नमस्कार,
सायकल राईड - २
सायकल राईड - २
पहिल्या राईड नंतर अनेक जणांनी विचारणा केली की दुसरी राईड कधी? तर घेऊन येत आहोत. दुसरी राईड. हा पेपर थोडा(साच) अवघड आहे. एक छोट्टासा घाट मध्ये आहे. :)
ता २३ फेब.
दिवस रविवार
वेळ : सकाळी साडेसहा (परत :) )
ठिकाण : थोडे अवघड पण तरीही जमेल असेच.
चांदणी चौक ( चौकाकडे जाणार्या रस्त्यावर पण बायपास वरच थांबायचे.)
राईड १ - चांदणी चौक ते पिरंगुट. ( चौक ते पिंरगुट १२ किमी)
राईड २ - पिरंगुट ते आनंदगाव (ज्यांना समोर जायचे त्यांच्यासाठी) पुढे ८ ते ९ एक किमी.
एकुण अंतर (चांदणी चौकापासून ) २१-२२ किमी वन वे.