कविता पाठविण्यासाठी पत्ता:- अ. अ. जोशी, १२ बी, दुर्वांकूर, वृंदावन हौसिंग कॉम्प्लेक्स, कोथरूड, पुणे ४११०३८. महाराष्ट्र. ईमेल : suchetanantprakashan@gmail.com
नमस्कार,
कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धेचे यंदाचे ५वे वर्ष. दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता या स्पर्धेसाठी मागविल्या जातात. त्या कवितांचे काव्यलेखनाचे परीक्षण केले जाते. त्यातील पहिल्या १५ ते २० कवितांचे प्रत्यक्ष काव्यवाचन त्या त्या कवीने सादर करायचे असते. त्यानुसार ५ क्रमांक काढले जातात. आतापर्यंत जवळपास २०० कवींनी यात सहभाग घेतला आहे. आतापर्यंत व्यक्ती, पाणी, निसर्ग संतुलन, माणुसकी असे विषय गेले ४ वर्ष दिले होते.
या स्पर्धेत शक्यतोवर जालावरील प्रतिथयश म्हणजे अगदीच नियमित लेखन करणार्या कवींनी भाग घेऊ नये ही विनंती. मात्र सूचना जरूर कराव्यात. आपल्याला माहित असणार्या आणि भाग घेण्याची इच्छा असणार्या कवींना आपण ही माहिती जरूर सांगू शकतो.
स्पर्धेत भाग घेणार्यांसाठी :
१) स्पर्धेसाठी "प्रेम" या विषयावर आधारीत दोन स्वरचित कविता पाठवाव्यात.
२) दिनांक ११ मार्च २०१४ पर्यंत कविता नमूद केलेल्या पत्यावर पोचाव्यात. जर इच्छुक कवी मायबोलीवरीलच असेल तर संपर्कातूनही कविता देऊ शकता.
३) काव्यलेखनाच्या गुणांकनाप्रमाणे पहिल्या जास्तीत जास्त २० कवींना कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात येईल.
४) मोठी बक्षिसे देण्यासाठी आम्ही कोणताही फंड गोळा करायचा नाही असे ठरविले आहे. त्यामुळे केवळ स्मृतीचिन्हाच्या स्वरूपातच सन्मानित करण्यात येते.
५) कवींमध्ये एकप्रकारे काव्यमैत्री व्हावी हा उद्देश स्पर्धेमागचा आहे.
६) क्रमांक काढताना जात, धर्म, संप्रदाय, वय, शिक्षण, इ. कोणत्याही गोष्टीचा विचार केला जात नाही. फक्त काव्यात्मकता पाहिली जाते.
७) कविता पाठविणार्या कवींनी स्वतःचीही काव्यक्षेत्राबद्दलची माहितीही पाठवावी.
ही स्पर्धा या वर्षी साधारणपणे मार्चच्या शेवटच्या शनिवारी/रविवारी होईल. नक्की झाल्यावर कळवेनच.
कळावे,
आपला
अ. अ. जोशी