Submitted by अमित M. on 29 May, 2014 - 07:38
ठिकाण/पत्ता:
महाबळेश्वर व्हाया पसरणी घाट
अखिल मायबोली विना पेट्रोल / डिझेल वाहन प्रसारक मंडळ घेऊन येत आहे पाचवी राईड.
याआधीच्या काही rides मुळे उत्साह द्विगुणित झालेल्या सायकलप्रेमी माबोकारांनी यावेळी पुणे - महाबळेश्वर सायकल ride चा घाट घातला आहे. इच्छुकांनी जरूर यावे.
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शुक्रवार, May 30, 2014 - 19:30 to रविवार, June 1, 2014 - 07:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
लै भारी !
लै भारी !
अभिनंदन मंडळी, सविस्तर वर्णन
अभिनंदन मंडळी, सविस्तर वर्णन आणि अजून फोटो येऊदे.
आणि पुढचा बेत पण इथे टंका की राव
वा... पहिलीच पोस्ट राइड पुर्ण
वा... पहिलीच पोस्ट राइड पुर्ण झाल्याची मस्त वाटलं फोटो बघुन.. जरा सविस्तर लिहा ना.. वाचायला आवडतं
जबरीच..
जबरीच..
अभिनंदन! आम्ही अजून १० किमी
अभिनंदन!
आम्ही अजून १० किमी वरच अडकलोत.
अरे वा. सहीच की.. अभिनंदन...
अरे वा. सहीच की.. अभिनंदन...
अभिनंदन! सविस्तर लिहा.
अभिनंदन! सविस्तर लिहा.
केदार, हार्पेन, साती, चीमुरी,
केदार, हार्पेन, साती, चीमुरी, हिम्स्कुल, मृदुला, मयुरेश अनेक धन्यवाद !
साती अहो मंडळ पुढे घ्या कि आतां १०,२० ,३० हळू हळू वाढवा
हार्पेन अरे फोटो मुद्दाम नका टाकू असा सायकल ग्रुप चा फतवा निघालाय कारण त्यामुळे ह्या वीकेंडची मेगा राईड Overshadow होईल अशी स्वाराना काळजी आहे आणि आता सन्घाचा आदेश म्हणल कि तो मलापण पाळायला हवाच ना !
फोटो नका टाकू पण वृत्तांत तर
फोटो नका टाकू पण वृत्तांत तर टाका..
फोटो नका टाकू पण वृत्तांत तर
फोटो नका टाकू पण वृत्तांत तर टाका..>>>>>>>> +१
>>>> आम्ही अजून १० किमी वरच
>>>> आम्ही अजून १० किमी वरच अडकलोत. <<<<
मी मात्र गेले दोन आठवडे ३.२ किमी रोज ऑफिसला जातो येतोय सायकलने!
अन स्ट्रावा वर त्याचे मोजमापही घेतोय. अॅवेरेज २०/२२ किमी, मॅक्सिमम ३३ किमी, कमीत कमी वेळ ९ मिनिटे १० सेकन्द, जास्तीत जास्त वेळ १५ मिनिटॅ वा कितीही.....!
दोनतिन महिने झाले की मी पण १० किमीवर पोहोचेन.
अन मग हळू हळू महाबळेश्वरदेखिल गाठेन! नक्किच.
व्वा! ग्रेट! अभिनंदन
व्वा! ग्रेट! अभिनंदन सगळ्यांचे..
(यापुढे काही मी तर काही बोलूच शकत नाही..)
आमित आरे वृतांत तारी लिही की!
आमित आरे वृतांत तारी लिही की! आणि माराठीत बोल ते ओव्हरशॅडो वगैरे माला काय्येक कळ्ळे नाही..
आणि होतच आसेल तार होऊदे की....
तर मुद्दा हा आहे की मी हर्पेन, हार्पेन नाही
मुजरा स्विकार करा,
मुजरा स्विकार करा, राजे.
सगळ्यांचे अभिनंदन!!!!!!
फोटो नका टाकू पण वृत्तांत तर टाका..>>>>>+१०००
हर्पेन
वेळेअभावी थोडक्यात
वेळेअभावी थोडक्यात व्रुत्तान्त देत आहे ...अशुद्धलेखनाबद्दल माफी असावी.
पुण्यातुन किरण, मनोज, रोहित आणि पिन्गु (भारत) हे लोक पहाटे ठिक ५ वाजता बायपास ला भेटले. ह्या सगळ्याना खरच हात जोडले पाहिजेत कारण कितीतरी वेळा लवकर झोपा सान्गुन सुद्धा मावळे झोपेपर्यन्त १-२ वाजले होते त्यात आदल्या सायन्काळी पिन्गुने माझ्या सायकलचा पुढचा गीयर ३ च्या खाली पडत नाही अशी गोड बातमी सान्गुन माझी हवा टाईट केलि होतिच. त्याला हटकल्यावर आइन्वेळी काहितरी मारामारी करुन त्याने तो प्रश्ण मिटवला. दरम्यान माझी सायकल आमच्या पुणे - सातारा राईड नन्तर सातारीच होती. म्हणुन मी सातारा - महाबळेश्वर अशी राइड करणार होतो अणि बाकिच्याना सुरुर फ़ाट्याला भेटणार अस ठरल. त्यामुळे Timing म्याच होण फ़ार महत्वाच होत. मी सातार्याहुन ठिक ८:३० ला निघालो. शनिवार सकाळ... Highway वर रहदारी तुरळकच होती. पण सर्वात महत्वाच अस कि वातावरण मस्त होत. तुफान वेगाने रायडीन्ग्चा अनुभव घेतला. बाकी पुण्याहुन येणर्या टोळीच्या सम्पर्कात होतोच. साधारण १०:३० च्या सुमारास अम्हि सुरुर फ़ाट्याला भेटलो. टोळीने शिरवळला अधीच नाष्टा उरकला होता त्यामुळे अजिन्क्य होटेलचा मस्त गर्मागरम वडापाव फ़क्त मलाच मिळाला.
इथुन अम्ही वाई ला कुच केल. रस्त्यावर झाडानी छत्र धरल्याने ग्रीन तोप मधुन हा प्रवास निश्चितच सुखदायक आहे. मजल दरमजल करत आम्ही वाईत दाखल ज़ालो आणि आमचा तळ वाईत नातुन्च्या फ़ार्म Houseवर पडला. अगोदर प्ल्यान केल्याप्रमाणे आम्ही १२-२ च्या प्रखर उन्हात सायकल चालवणार नव्हतो म्हणुन वेळेवर जेवण उरकुन नातुन्च्याच जागेत आम्ब्याच्या झाडाखाली बेन्च्वर आडवे झालो. ठीक २ वाजता तिथुन बाहेर पड्लो अन पसरणी घाटाने छद्मि हसत आमच स्वागत केल. १०-१२ किमी चा हा घाट एरवी चढायला ठिक आहे पण ह्या उन्हात ...??!!! तब्बल १-१.५ तास अम्ही तो लाम्ब सडक घाट चढत होतो आणि मस्त भाजून निघत होतो. पण हार मानली तर ते आम्ही कसले!!. टेबल Landला थाम्बायचा अनावर मोह टाळुन अम्ही पाचगणी गाठुन समोर महबळेश्वर कडे मोर्चा वळवला.
सन्ध्याकाळचे ५ वाजले होते आणि महाबळेश्वर आता फ़क्त १२-१३ किमी होत आणि इथे आम्हाल समजल कि महबळेश्वरला आमची रहायची सोय होउ शणार नव्हती आणि बाकीच महाबळेश्वर बूक होत आता नियोजीत कार्यक्रमात बदल करुन पाचगणीतच मुक्कामाच स्थान शोधण भाग होत. नशिबाने जवळच एका प्रशस्त रूम मधे आम्ची राहाण्याची सोय झाली. रात्रि मस्त चिकन रस्सा असा बेत होता... पुढे काय घडल ते वेगळ सान्गायला नको दुसर्या दिवशी सकाळि जरा निवान्त उठुन, आवरुन अम्ही तयार झालो. पाचगणी - महाबळेश्वर हा रस्ता रायडीन्ग्ला भन्नाट आहे. अल्हाददायक हवेत स्ट्रौबेरी अणि लेन्डी जाम्भळ खात खात महाबळेश्वर चा सोपस्कार माबोकरानी अशाप्रकारे पार पाडला.
पसरणी घाट सतरा किमी
पसरणी घाट सतरा किमी आहे
भन्नाट ट्रीप...... मस्त.
साधारण किती अंतराला अमुक इतका वेळ लागला वगैरे वेळापत्रकाचा/अंतराचा तपशील द्याकि जरा, संदर्भाकरता उपयोगी पडेल.
१९८० चे आधी सातारा ते वाई बरेच वेळा व्हायचे. अन कॉलेज बुडवुन सातारा ते पाचवड अन परत तर नियमित व्हायचे!
मस्त वर्णन
मस्त वर्णन
धन्यवाद आमित, मी आपला वेगळा
धन्यवाद आमित, मी आपला वेगळा धागा शोधत होतो
आदल्या रात्री महाबळेश्वर
आदल्या रात्री महाबळेश्वर गाठतो कि नाही याची शंका वाटत होती, नॉर्मली २० किमी मारणारे आम्ही आज १२० ची मजल मारणार होतो.अनुभव फारच एक्साईटींग होता.त्यात घाटाचे पाणी प्यायचे होते.ट्रीप फूल टू धमाल झाली.
फोटो नक्की टाकेन मेगा राईड नंतर ..
मला रस्ता खूप आवडला रस्त्यात जांभळाची खूपशी झाडे आणि हाताला जांभळाच्या डहाळ्या लागतील या उंचीवर , भरपेठ जांभळे खाल्ली. स्टॉबेरी चाखली. अमित ,मनोज,पिंगू आणि रोहीत आणि मी असा आमचा चमू
पसरणी घाटाला प..स...र..णी घाट का म्हणतात हे तिथे सायकल मारल्यावरच कळते.एखादा अजगर अंग पसरुन झोपावा तसा हा घाट लांबच लांब पसरलेला आहे.
मी सेकंड हँड सायकलच्या शोधात
मी सेकंड हँड सायकलच्या शोधात आहे.
लिम्बु अहो मेगा रईड ल सगळे
लिम्बु अहो मेगा रईड ल सगळे डीटेल्स देतो नक्कि !!
हर्पेन कशाला गरीबाची चेष्टा दादा
जिप्सी धन्यवाद.
आनन्द्यात्री साय्कल बद्दल कळवतो काहि सम्जल्यास.
आनंदयात्री माझा रणगाडा पडला
आनंदयात्री माझा रणगाडा पडला आहे. एकदा येऊन बघून जा.
हे खरेतर जाहिरातींमध्ये
हे खरेतर जाहिरातींमध्ये टाकायला हवे पण येथे चटकन पाहिले जाईल म्हणून येथे टाकत आहे.
माझ्या मावसभावाला त्याची सायकल विकायची आहे. खालील लिंकमध्ये तपशील आहेत.
http://www.bikeszone.com/forum/viewtopic.php?f=8&t=16980#p169460