Submitted by रमा. on 3 March, 2014 - 22:37
खोटं बोलतेस तू..
आठवत नाही म्हणतेस..
कँटिनमधे बसून मारलेल्या गप्पा..म्हंटलेली गाणी..वडापाव..
तासंतास उगीच अनोळखी रस्त्यांवर मारलेल्या चकरा,
ब्लू गॅलरीत बसून मांडलेला बार्बेक्यू आणि ओल्ड मंक,
ब्लॅकजॅक, ब्लफ, रमी..
माय किचन, सिंफनीमधली काराओके नाईट,
शूटस, मीटिंगस, स्वतःचा विषय सोडून अटेंड केलेली लेक्चरस,
रात्ररात्र ढग घेऊन दूर-भूर भटकणं..
अये यार धिस इज एन्डलेस,
कायच्या काई..
पागल आहेस का जरा?
नक्कीच खोटं बोलतेस तू..
आठवत नाही म्हणतेस..
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
small is beutiful
small is beutiful