स्नॅक्स
कॅरमलाइझ्ड मखाणे
रव्याचे कटलेट्स.
वेज बर्गर्/अलू टिक्कि बरगर(फोटो सहित)
रुमझुम
कणकेची (गव्हाच्या पिठाची) धिरडी
साहित्य: गव्हाचे पीठ (कणिक), तिखट, मीठ, हळद, बारीक किसलेला लसूण, जिरेपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती:
१) एका मोठ्या बाउलमध्ये गव्हाचे पीठ (कणिक) घेऊन त्यात थोडी हळद, तिखट, मीठ, कोथिंबीर, लसूण घाला. मग त्यात पाणी घालून दोस्याच्या पिठाइतके दाट मिश्रण बनवा.
२) तयार मिश्रणाची छान पातळ धिरडी तेल लावलेल्या निर्लेप तव्यावर खोल डावाने घाला. झाकण ठेवा.
३) धिरडी दोन्ही बाजूनी चांगली भाजून घ्या आणि तूप/बटर घालून आवडेल त्या चटणी बरोबर वाढा.
(चटणी शिवायही तितकीच छान लागतात. म्हणून चटणी नसली तर नुसत्या तूपाबरोबरही छान लागतात.)
चविष्ट पावभाजी कशी जमवावी?
पावभाजी करताना उत्तम जमण्याकरताा टिप्स, कोणते मसाले वापरावेत ह्याबद्दल चर्चा करा. जर पावाभाजी करण्याची मुख्य पाककृती हवी असेल तर ती पावभाजी रेसिपी इथे आहे.
१००% होम मेड पिझा.
पोह्यांची उकड
नवीन काय "खाऊ"? (खाद्य उत्पादने)
हल्ली बाजारात सगळीकडे बरेच नवीन तयार खाद्यपदार्थ येतात. जसे वेगवेगळ्या प्रकारचे चिप्स, कॉर्न चिप्स, कुरकुरे, चिवडे, वड्या, गोळ्या, बिस्किटे, चॉकलेट्स इ. याबद्दल इथे माहिती लिहिणे अपेक्षित आहे. 'स्नॅक्स' किंवा थोडक्यात चहाबरोबर आणि (कधीतरी) येताजाता तोंडात टाकायचे पदार्थ.
लिहा तर मग, लहानांपासून थोरामोठ्यांपर्यंत सर्वांसाठी तुम्हाला आवडलेल्या खाऊची माहिती. प्रकार, ब्रॅन्ड, कुठे मिळेल इ. लिहावे. भारतातील आणि परदेशातीलही पदार्थ लिहिले तरी चालेल.