अॅलर्जीफुड
Submitted by रश्मी. on 4 July, 2019 - 23:58
खरे तर इथे काय लिहावे समजेना म्हणून प्रश्न विचारतेय. हा धागा आरोग्य मध्ये हवा होता. पण हा आहाराशी संबंधीत असल्याने इथे पाककृतीत विचारतेय. माझ्या मैत्रिणीच्या धाकट्या मुलीला कसलीशी अॅलर्जी झालीय. अंगावर खूप खाज येते. स्किन स्पेशालीस्ट ला दाखवल्यावर त्यांनी २ महिन्याकरता दूध व त्याचे पदार्थ, आंबवलेले पदार्थ जसे इडली, डोसा, अप्पे, केक, ब्रेड, पिझ्झा, बर्गर वगैरे, तळलेले पदार्थ, तेलबिया म्हणजे शेंगदाणे- त्याचे कुट, काजू, पिस्ते, बदाम तसेच बेसन बंद करायला सांगीतले आहे.
शेअर करा