नुकताच नेटवर आमीर खानने पीके चित्रपटासाठी केलेले पोस्टर पाहिले आणी धक्काच बसला ! पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण नक्की कुठे घेऊन जाणार आहे आपल्याला? परंपरा, प्रतिष्ठा आणी अनुशासन असलेली आपली संस्कृती खाऊजा च्या लाटेपुढे हतबल होत आहे का ? म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो. हाच ट्रेंड मराठीत आला आणी स्वजो ने असेच पोस्टर केले तर? त्यात बजेट नाही म्हणून हातात टू इन वन च्या ऐवजी आयपॉड नॅनो घेतता तर? अरेरे, कुठे ते अंगभर कपडे घालून वर निळा स्वेटर घालणारे आमच्या वेळचे नायक आणे कुठे हे खुदालाही डरवणारे आजकालचे नायक!
१ हेच का ते अच्छे दिन ?
स्वातंत्र्यपुर्व काळात नॅशनल हेराल्ड नावाचे वृत्तपत्र सुरु करुन स्वातंत्र्य चळवळ तेवत ठेवण्याचे काम या वृत्तपत्राकडे सोपविण्यात आले होते. याच गृपचे उर्दू वृत्तपत्र 'कौमी आवाज" या नावानी तर हिंदी वृत्तपत्र "नवजीवन" या नावानी निघत असत. त्या काळात नेहरू हे एक प्रमुख नेते असल्यामुळे त्यानाच या गृपचे अध्यक्ष करण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतर नेहरु पंतप्रधान झाल्यावर शासकीय मदत देऊन या गृपला प्रचंड मोठे केले. कवडीमोल भावात जमिनी व अत्यल्प दरात कर्ज अशी बरसात होऊ लागली व त्यामुळे हेराल्ड फुगत गेला. हा झाला इतिहास...
आता वर्तमान...
पंचवीस वर्षांपूर्वी उघडकीला आलेल्या बोफोर्स घोटाळ्याने आज पुन्हा डोके वर काढले. अमिताभ बच्चन निर्दोष असल्याचे उघडकीला आले तर माजी पंतप्रधान राजीव गांदी यांनी कशा प्रकारे सोनिया गांधींचे सुहृद असलेले क्वात्रोची यांना कसे वाचवले ते ही उघडकीला आले.
या घोटाळ्यात कुणाची पापे झाकण्यात आली तर कुणाला विनाकारण गोवलं ते इथे पहा: