कणिक १ वाटी
दूध पाऊण वाटी
तूप अर्धी वाटी
मीठ चवीपुरते (हे आधी थोडेच घालावे. पास्ता सिझनिंगमध्ये मीठ असते.)
ओरेगानो सिझनिंग ( फोटो बघा)
चिली फ्लेक्स (फोटो बघा)
तळण्याकरता तेल
गरज ही शोधाची जननी असते म्हणे. पण जननी ही शोधाची जननी जास्त करून असते.
शाळेकरता खाऊ हा विषय नेहमीच ऐरणीवर असतो. तर या विषयावर मनोमन सखोल चिंतन करून ही एक नाविन्यपूर्ण पाककृती वाचकांसमोर ठेवताना आस्मादिकांस अतिशय आनंद होत आहे. चाणाक्ष वाचक या पाककृतीची जननी सशलचा हा बाफ आहे हे ओळखतीलच. (लब्बाड कुठले! अशानं आम्ही नाही जा!)
तर पावसाळी संध्याकाळची रम्य वेळ होती. धरीत्री हिरवा शालू नेसून मावळत्या सूर्यास निरोप देण्यास तयार होती. अशा वेळी मनस्वी आणि स्वच्छंद अशी मी माझी हलकीशी चार तासांची झोप काढून उठले. नवरा म्हणाला सुद्धा की "तू पटकन फ्रेश हो, मी मस्त वाफाळती कॉफी बनवतो." कॉफीचा कप हातात देता देता तो म्हणाला की "आज एक माणूस रागावलंय हं!" अन त्यानं लेकीकडे इशारा करून सांगितलं की तिला शाळेच्या डब्याकरता काहीतरी वेगळं हवंय. अरेच्चा! म्हणून का आमच्या संसारवेलीवरचं फूल रुसून बसलंय! "वेडाबाई!" मी तिच्या टपलीत मारून गालातल्या गालात हसले आणि म्हटलं "अशा सोनियाच्या दिवशी आमची राणी का बरं रुसली?"
अन अचानक माझं वेडं मन पाककृतींच्या विशाल गगनात भरारी मारू लागलं. सोनिया - इटली - इडली - रवा - गहू - कणिक अशा रंगिबेरंगी फुलांवर विहरत ते सरतेशेवटी शंकरपाळे या फुलावर विसावलं. सोनियापासून सुरू झालेला हा प्रवास शंकरपाळ्यांवर संपला ही सूचकता लक्षात घेऊन आस्मादिकांनी मग एक शक्कल लढवली आणि या पाककृतीचा जन्म झाला.
*********************************************************************************************************
दूधात पाणी घालून एक वाटीभर करावे. हे मिश्रण गरम करावे. तूप गरम करून घ्यावे. आणि दूध तूप एकत्र करावे. त्यातच पास्ता सिझनिंग, चिली फ्लेक्स आणि मीठ घालावे. मग त्यात मावेल इतकी कणिक घालून फार सैल नाही आणि फार घट्ट नाही असे मुलायम भिजवून घ्यावे.
सिझनिंग जरा जास्त घालावे लागते कारण तळल्यावर त्याची चव जरा कमी लागते.
नेहमीच्या शंकरपाळ्यांप्रमाणे पोळपाटावर जाडसर पोळी लाटून , सुरीनं शंकरपाळ्यांच्या आकारात कापून गरम तेलात मंद आचेवर तळाव्यात. टिश्शूवर काढून मग गार झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भराव्यात.
(No subject)
एक माणुस अगदी फॉर्मात हं! आहे
एक माणुस अगदी फॉर्मात हं! आहे ब्बुव्वा!
शब्दखुणांत सोनिया
शब्दखुणांत सोनिया गांधी??
अॅडमिन, धावा!!
*
फारेण्डा,
ध्राव! धरित्रीच्या शालू पासून संसारवेलीच्या फुलासकट अगदी अगं वेडाबाई पर्यंत सगळा मसाला आहे बघ नमनालाच!
*
देवा रे देवा.. क्या करने का
देवा रे देवा.. क्या करने का रे बाबा इस शंकरपा़ळे का??
मामी, अप्रतिम हो पाकृ.
मामी, अप्रतिम हो पाकृ. आवडली.
हा धुंद फुंद आषाढात श्रावणासारखा उनपावसाचा खेळ खेळणारा ऋतु संपायच्या आधी तुझ्या कोमल हातांनी ही पाकृ परत एकदा कर.
करताना त्यात दळदार किसलेले नाजूकसे पांढरेशुभ्र चीज घाल आणि पांढुरके दूध जरा कमी कर.
अजून सुंदर लागेल.
आणि हो लाडके, जरा तेलाचे चटके कमीच दे त्या पाळ्यांना. केतकीसारख्या डौलदार रंगावर तळल्यास त्या तर तुमच्या संसारवेलीचे फूल अगदी खूश होऊन आनंदी गाणे गाईल.
आणि तुझ्या संसाररथाचा चक्रधर स्वामीही आपल्या अन्नपूर्णेच्या पाकनिपूणतेवर प्रसन्न होईल.
बै, पाककृती ल्हिती की ललितलेख
बै, पाककृती ल्हिती की ललितलेख पाडती?
इटालियन शंकरपाळे, इब्लिस आले
इटालियन शंकरपाळे, इब्लिस आले आहेतच आता उदयनसुध्दा येणार आणि मग संघवाले, सनातनवाले येणार.
मामी, एवढ्या सर्वांना पुरेल ना?
मामी आणि साती
मामी आणि साती
पाककृती नि प्रस्तावना दोन्ही
पाककृती नि प्रस्तावना दोन्ही भारीयेत!!
(No subject)
आता क्वात्रोची वडे पण येऊदेत
आता क्वात्रोची वडे पण येऊदेत
आलो मी ....... बोला
आलो मी ....... बोला माने........
वॉव, ललितपाकृ जामच खुसखुशीत
वॉव, ललितपाकृ जामच खुसखुशीत
साती, केतकी वर्ण वगैरे अगदी अगदी
खरंतर सगळेच प्रतिसाद तुझ्या ललितपाकृच्या दुधात साखर घालणारे
(No subject)
मस्त मस्त...मला खावेसे
मस्त मस्त...मला खावेसे वाटताहेत अभ्भी के अभ्भी
सुरेख! मामी भरपूर धन्यवाद. (
सुरेख! मामी भरपूर धन्यवाद. ( पस्तिशीतल्या बाईला मामी म्हणणे अंमळ जड जातेय, पण आय डीच भारी घेतलाय)
ईटालीयन सिझनींगची आयडीया आवडली. दी बेस्ट.
(No subject)
पस्तिशीतल्या बाईला मामी
पस्तिशीतल्या बाईला मामी म्हणणे अंमळ जड जातेय >>>
साती, सखे, तुझ्या प्रेमळ सुचना कित्ती कित्ती आवडल्या म्हणून सांगू!
सह्हीए मामी. लगे रहो इब्लिस,
सह्हीए मामी. लगे रहो
इब्लिस, साती
रश्मी, तू मामीची स.मै!
रश्मी, तू मामीची स.मै!
शंकरपाळे नवीन नाहीत पण
शंकरपाळे नवीन नाहीत पण प्रस्तावना भारी आहे
मामी, साती, चांगला
मामी, साती, चांगला प्रयत्न,
तुम्हांस म्हणून सांगतो, शंकरपाळे किरमिजी सारख्या अतिडौलदार रंगावर तळायचे असतात बरे! आणि ते तुम्हा सखीद्वयांचे 'किनई' आणि 'गडे' ह्या दोन शब्दांविना असलेले संवाद..... देवा! किती ते नवखेपण!
मामी, वत्सला. साती डॉक वाटत
मामी, वत्सला.:फिदी: साती डॉक वाटत नाही, चक्क रसिक कवयत्री वाटत आहे.:स्मित:
मला हिमस्कूल यान्चा पण प्रतीसाद लय भारी ( बाबुराव आपटेचा) वाटला.:फिदी:
मस्त प्रस्तावना
मस्त प्रस्तावना
अरे देवा ...
अरे देवा ...
पार्वतीने वाचली पाक्रू तर
पार्वतीने वाचली पाक्रू तर शंकर पळे होइल
पाक्रु भारीच, मामीचे लिखाण चार चांद लगा दिये
मस्त. शब्दखुणा 'सोनिया गांधी'
मस्त. शब्दखुणा 'सोनिया गांधी'
मामे बरं, तळायच्या ऐवजी बेक
मामे
बरं, तळायच्या ऐवजी बेक केल्यास तर कसं काय? युरोपीअन स्टाईलकडे जास्त झुकेल ना मग? हेल्दी पण.
इडलीवरून रवा आठवणे ठीक आहे,
इडलीवरून रवा आठवणे ठीक आहे, पण त्या रव्यावरून एकदम गव्हाचं झाड पकडायचं म्हणजे भारीच भिरभिरतं बै मन तुझं!
जौद्या! शंपा, सॉरी, इशंपा चांगले दिसताहेत. जरा कमी तळलेस तर सोनियाचे दिसतीलच.
मस्तं! शंकरपाळे सदर्न इटालियन
मस्तं!
शंकरपाळे सदर्न इटालियन दिस्ताहेत.
Pages